गूढ अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 September, 2020 - 07:25

हा विरंगुळा धागा नाही. आणि हा अमानवीय अनुभवांचा धागा नाही.

आपल्याला सुरवातीला गूढ, अनाकलनीय असे वाटलेले, पण त्याचा नंतर आपसूक झालेला अथवा आपण छडा लावून केलेला उलगडा - म्हणजे सापडलेले / शोधलेले शास्त्रीय कारण - अशा अनुभवांबद्दल लिहायचे आहे. अशा उलगड्या अभावी कुणाला ते अमानवीय वाटले असण्याची शक्यता आहे.
अशा अनुभवांची देवाण घेवाण केल्याने कुणाला असे अनुभव येत असतील तर त्या व्यक्तीला त्याचे कारण कदाचित लक्षात येईल अथवा शोधायला दिशा मिळेल, हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.

कृपया आपले असे अनुभव इथे गंभीरपणे मांडावेत.

एक नमुद करु इच्छीतो की ज्यांना गंभीर अमानवीय अनुभव येतात त्यात तथ्य नाही असा कुठला दावा करण्याचा हेतु नाही. ज्यांना ते येतात ते त्यांच्या दृष्टीने पूर्ण खरे असतात आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे मांडलेले असतात. तेव्हा इतर कुणाचे तसे अनुभव सांगून, त्यामागील कारण मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे करु नये. मात्र तुमचे स्वत:चे जर तसे काही अनुभव असतील आणि त्यामागील कारण मिमांसा जाणुन घेण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करायची असेल तर करु शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉडी क्लॉक सेट झाली असेल हे मला सुद्धा पटत आहे पण जागे असताना सुद्धा नेमकी मी 12.00 वाजताच कसा मोबाईल किंवा वॉच पाहते याच कुतूहल वाटतं

मामी प्रयत्न करेल तसा. पण त्यावेळी अचानक जाग आल्यावर थोडी भीती वाटतेच. सुरवातीला नाही वाटली पण रोजच तस व्हायला लागलंय तर वाटतं आहे

कदाचित १२.०० वाजता कोणी कामावरुन घरी परत जात असेल तेव्हा कुत्री भुंकल्याने तुम्हाला जाग येत असेल. किंवा स्टेशनजवळ रहात असाल तर यावेळी जाणाऱ्या ट्रेनच्या आवाजानेही जाग येऊ शकते. अशा अनेक शक्यतादेखील असु शकतात. यात घाबरण्यासारखे काही नाही.

यात विशेष असे काहीच नाही. मनाचा एक खेळ आहे असे समजा. बऱ्याच लोकांना पहाटे उठल्याबरोबर शौचास जावे लागते, आणि काही कारणाने उठल्या उठल्या जाणे झाले नाही तर मग पॉट मोकळे होत नाही. (उदाहरण काही लोकांना विनोदी वाटू शकते, पण विनोद करण्याचा हेतू नाही.) आता याला कारण सुद्धा बॉडी क्लॉक असेच म्हणता येईल. पहाटे उठण्याचा आणि शौचास होण्याचा physiologically काहीही संबंध नसला तरी psychologically जोडल्या गेल्यामुळे असे घडते.

अगदी त्याचप्रमाणे, तुमच्या मनाने तुम्हाला ठीक १२ वाजता वेळ बघण्याची सवय किंवा आज्ञा दिली आहे असे समजा. आणि हो, ह्यात त्रासदायक असे काहीही नाही पण प्रयोग करायचा असेल तर स्वत:ला सांगून बघा कि आज ११ला झोपून पहाटे ६ ला उठायचेच आहे. ४-८ दिवसात हेही रुटीन सेट होते कि नाही बघा..

त्याहूनही सोपं, झोपताना कुणाला तरी मोबाईल मधलं घडृयाळ पुढे अथवा मागे असं काहीही करायला सांगा... तुम्ही ती वेळ तेव्हा पाहू नका झोपी जा, जेव्हा जाग येईल तेव्हा फक्त मोबाईल वरच वेळ पहा नी पुन्हा झोपी जा...१० - १५ दिवसानंतर हे करणं बंद करा...मग पहा नेमकी १२ ला जाग येतेय का ते?

Pages