आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.
--

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर जाऊन तोंड काळे करण्याऐवजी शेणा, भाजपाबरोबर गेली असती तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले नसते असे तुम्हाला वाटण्यामागे नक्की काय कारण आहे ?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर जाऊन तोंड काळे करण्याऐवजी शेणा, भाजपाबरोबर गेली असती तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले नसते असे तुम्हाला वाटण्यामागे नक्की काय कारण आहे ?
>>>>

सेना भाजप यांच्या समर्थकांचे एकमेकांवरचे कंबरेखालचे वार, गलिच्छ भाषेतील वाद, मी फेसबूकवर बघतो. या घटनेच्या आधीही दोन्ही पक्ष एकमेकांचा दुस्वास करायचे. भाजपावाले शिवसेनेला चिवसेना बोलायचे, शेणा बोलायचे, तर सेनेवाले भाजपाला कमळा बोलायचे. दोघांमध्ये नवरा कोण आणि बायको कोण यावरून वाद व्हायचे. (बायको म्हणजे दुय्यम हा पुन्हा एक सडका विचार. ते असो) पण एकूणच हे दोघे एकत्र येत स्थिर सरकार देण्याची सुतराम शक्यता नव्हती.

त्यामुळे आधी फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत नवीन सरकार द्यायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यांनीही दिड दोन दिवसाचे अस्थिर सरकार दिले.
त्या पार्श्वभूमीवर यांनी वर्षभराचे स्थिर सरकार दिले हे कौतुकास्पद वाटले ईतकेच.

बाकी सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी हे त्या एकूण घडामोडीनंतर भाबड्या जनतेलाही समजले हे तेवढे चांगले झाले. म्हणून माझे तर ठरलेले. सरकार कोणाचेही येवो. स्थिर झाले की पिझ्झा, वडापाव वा ढोकळा जे असेल ते मागवायचे आणि पार्टी करायची. शेवटी आपली निष्ठा देशाशी आणि राज्याशी असावी न की राजकीय पक्षाशी...

सेना भाजप यांच्या समर्थकांचे एकमेकांवरचे कंबरेखालचे वार, गलिच्छ भाषेतील वाद, मी फेसबूकवर बघतो. या घटनेच्या आधीही दोन्ही पक्ष एकमेकांचा दुस्वास करायचे. भाजपावाले शिवसेनेला चिवसेना बोलायचे, शेणा बोलायचे, तर सेनेवाले भाजपाला कमळा बोलायचे. दोघांमध्ये नवरा कोण आणि बायको कोण यावरून वाद व्हायचे. (बायको म्हणजे दुय्यम हा पुन्हा एक सडका विचार. ते असो) पण एकूणच हे दोघे एकत्र येत स्थिर सरकार देण्याची सुतराम शक्यता नव्हती.
--

मग शेणेला एवढी अक्कल निवडणुकी आधी,
भाजपा बरोबर युती करुन निवडणुका लढविते वेळी का नाही आली ?

दुर्दैवाने त्यांनीही दिड दोन दिवसाचे अस्थिर सरकार दिले >>> म्हणजे सुदैवाने ते टिकायला पाहिजे होते असे म्हणणे आहे का तुमचे?

मग शेणेला एवढी अक्कल निवडणुकी आधी,
भाजपा बरोबर युती करुन निवडणुका लढविते वेळी का नाही आली ?
>>>>

दोघांनाही नाही आली.
किंवा ती अक्कल असूनही स्वार्थ निवडणूका एकत्र लढवण्यातच होता दोघांचा जो त्यांनी साधला.

असे कसे
भाजपा करते ते राष्ट्रप्रेम
इतर करतात ते शेण

म्हणजे सुदैवाने ते टिकायला पाहिजे होते असे म्हणणे आहे का तुमचे?
>>>>

ते च असे नाही. कुठलेही सरकार असेना. कुठलेतरी एक सरकार स्थिर होणे हे जनतेचे सुदैव.

@ सुमित
प्लीज ते सेनेचा शेणा असा उल्लेख करणे टाळा ना.
अश्याने आपण भाजप समर्थक आणि सेना द्वेष्टी वाटता. आणि मग आपले विचारही एकतर्फी वाटतात.
असा कुठलाही झेंडा हातात घेण्यापेक्षा तटस्थपणे विचार करत राज्यासाठी काय योग्य आहे हे बघूया ना...

दोघांनाही नाही आली.
किंवा ती अक्कल असूनही स्वार्थ निवडणूका एकत्र लढवण्यातच होता दोघांचा जो त्यांनी साधला.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2020 - 11:55
--
दोघांनाही नाही आली असे कसे ?

मुळात महाराष्ट्रातील जनतेने सेना-भाजपा युतीला संपूर्ण बहुमत दिले होते व मुख्यमंत्री देवेंद फडणवीसांच्या नेतृत्वात युती सरकार स्थापन झाले असते.

मात्र ऐनवेळी 'मी मुख्यमंत्री होणार हे वचन पिताश्रींना दिल्याने, मला आता मुख्यमंत्री करा' असा धोषा लावत सेनेने असंगाशी संग केला, मग यात भाजपाचा काय दोष ? आणि मला नाही वाटत सेनेच्या नेत्यांनी ज्या पातळीवर जाऊन भाजपा नेत्यांवर टिका केली (अगदी मोदींचा बाप काढण्या पर्यंत) तशी टिका भाजपा नेते/समर्थकांनी केली असेल.

मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगणे गुन्हा आहे का ? की फक्त तो भाजपाच्या लोकांचाच अधिकार आहे ?

मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगणे गुन्हा आहे का ? की फक्त तो भाजपाच्या लोकांचाच अधिकार आहे ?
नवीन Submitted by BLACKCAT on 29 November, 2020 - 12:09
--

ते चूप रे,
आपल्याला ज्या विषयात गती नाही त्या मधे उगाच लुडबुड करु नये, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही ?

मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगणे गुन्हा आहे का ? की फक्त तो भाजपाच्या लोकांचाच अधिकार आहे ?
Submitted by BLACKCAT on 29 November, 2020 - 12:09
--

गुन्हा अजिबात नाही. मात्र मुख्यमंत्री व्हायची आपली लायकी आहे का, आपल्या मागे किती आमदारांचे पाठबळ आहे, साधे इतके कळू नये ? तो दिल्लीचा कजरीवाल, आध्रांचे मुख्यमंत्री पहिल्या, दुसर्‍या टर्म मुख्यमंत्री झाले ते ही संपूर्ण बहुमतात. आणि हे पेंग्विन बसलेय 'पिताश्रींना वचन दिले होते' म्हणत. Lol

हो का ? मग नितीश कुमारला कसे केले ?

मुख्यमंत्री व्हायला कसली लायकी लागते म्हणे ? आपल्या गटाच्या सगळ्या आमदारांनी हो म्हटले की झाले ना ? भाजपाचेही लोक असेच मुख्यमंत्री होतात ना ? की ते यूपीएससी देऊन होतात ?

>>मग आपले विचारही एकतर्फी वाटतात<<
ते एकवेळ परवडले पण ताकाला जाउन भांडे लपवणारे नको!
तू कितीही तटस्थेचा आव आणलास तरी तुझा राजकीय कल वरच्या लेखातून आणि प्रतिसादातून कळतोय तेंव्हा मित्रा उगाच वेड पांघरुन पेडगावला जाऊ नकोस!

तू कितीही तटस्थेचा आव आणलास तरी तुझा राजकीय कल वरच्या लेखातून आणि प्रतिसादातून कळतोय
>>>>

खरे तर हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
तो मी काढेनच.
पण तुर्तास ईतकेच म्हणेन की हे माझ्याशी नेहमीच होते. मी एका पक्षाबद्दल चांगले लिहिले की समोरच्या पक्षाचे भांडायला येतात. वा वाईट लिहिले की त्या पक्षाचे भांडायला येतात. मला सवय आहे याची Happy

प्रश्न तू कुणाबद्दल चांगले किंवा वाईट लिहण्याचा नाही पण "तटस्थतेचा" आव आणून दुसऱ्याला एकतर्फी म्हणण्याचा आहे!

बाकी तुझे चालू दे Proud

SAVE_20201129_142329.jpeg

मला ही तिघाडी पसंत असो वा नसो पण खरंच एक वर्ष झालं म्हणून माझ्याकडून अभिनंदन.

मनापासून मला दोन्ही कॉंग्रेसबरोबर गेली सेना हे आवडलं नाही.

राणे यांनी मात्र पचका करून घेतला, उ ठा मुख्यमंत्री होणारच नाहीत, मग अकरा दिवसांनी पडतील त्यापासून सप्टेंबर महिना सरकारचा अखेरचा महिना इथपर्यंत ठाम, ठासून सांगितलं. राणे यांना घेतलेलं मला पसंत नाहीच पडलं त्यामुळे त्यांचा पचका झाला हे कुठेतरी सुखावह वाटतं पण फडणवीस यांच्यासाठी वाईट वाटतं. असो अशा मिश्र भावना आहेत माझ्या. फडणवीस उगाच राणे यांना भाव देतायेत असं मनापासून वाटतं. राणे यांच्या मुलांनीपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेकदा अनुद्गार काढले, माफी मागितलेली ऐकिवात नाही, तरी भाजपने घेतलं त्यांना. शेवटी सत्ता सर्वांनाच महत्वाची. सावरकर वगैरे सगळ्यांसाठीच बोलण्यापुरते असं वाटतं मात्र.

युतीचं सरकार जास्त आवडलं असते. एखाद दीड वर्ष मुख्यमंत्रीपद सेनेला द्यायला काही हरकत नव्हती.

राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही पण आजतरी मुख्यमंत्री उ ठा याचं अभिनंदन.

>>पण खरंच एक वर्ष झालं म्हणून माझ्याकडून अभिनंदन.<<

न करुन कुणाला सांगतायत? जो पक्ष फुटेल त्याला भाजपामागे फरफटत जायला लागेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर निकाल काय लागू शकतो याचा अंदाज त्यांना आहे.
त्यामुळे जमेल तितके धकवून नेतायत.... झाले!

प्रश्न तू कुणाबद्दल चांगले किंवा वाईट लिहण्याचा नाही पण "तटस्थतेचा" आव आणून
>>>

अहो जर मी कोणालाही चांगले वा वा वाईट म्हणत असेल तर तो तटस्थपणाचा आव कसा झाला? याचा अर्थ मी कुठल्याही एका राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला नाही असेच होते ना? कधी पाहिलेय मला ईथे कुठल्या घोटाळेबाज नेत्याची वकिली करताना? कुठल्याही पक्षाचा तो का असेना मी विरोधच नोंदवतो. बाकी पक्ष कोणताही असो मुख्यमंत्री वा प्रधानमंत्री या पदाचा आदरच करतो. समोरच्याकडूनही तीच अपेक्षा ठेवतो. चूक आहे का?

जो पक्ष फुटेल त्याला भाजपामागे फरफटत जायला लागेल
>>>>

फरफटत का जावे लागेल?
चांगले मानाचे डिल करू शकतात ना भाजपाशी?

>>फडणवीस उगाच राणे यांना भाव देतायेत असं मनापासून वाटतं. <<

कुणी कुणाला भाव देत नाही.... भाजपामध्ये प्रत्येक नेत्याला एक रोल दिलेला असतो त्यानुसार तो तो नेता वागतो!
राणे आणि ठाकरे यांच्यात असलेल्या वितुष्टाचा भाजपा फायदा घेतेय.
तसाच फायदा फडणवीसांविरोधात खडसेंना वापरुन भविष्यात राष्ट्रवादी करुन घेणार असे दिसतेय!

>>तर तो तटस्थपणाचा आव कसा झाला? <<

आव आणलेला असला की दिसतोच रे!
भल्याभल्यांचे बुरखे फाटलेत इथे!

>>समोरच्याकडूनही तीच अपेक्षा ठेवतो. चूक आहे का?<<
चूकच!
समोरचा असू शकतो ना कुठल्यातरी एखाद्या पक्षाचा समर्थक.... त्याला तुझ्यासारखे बेगडी "तटस्थ" व्हायचा सल्ला देवू नकोस इतकेच!

राणे आणि ठाकरे यांच्यात असलेल्या वितुष्टाचा भाजपा फायदा घेतेय. >>> हो पण राणे आत्तापर्यंत तरी बोलाची कढी, बोलाचाच भात ठरले आहेत. यापुढे सत्ता गेली तर त्यांना क्रेडीट देऊ नये. त्यांनी शेवटी सप्टेंबर अखेर दिलेली मुदत Lol

Pages