बांद्रा वेस्ट - १८

Submitted by मिलिंद महांगडे on 24 November, 2020 - 01:25

‘ ट्रींsssग ...  ट्रींsssग....’ बराच वेळ मोबाईल वाजत राहीला.  दोघेही दमल्यामुळे  मेल्यासारखे झोपले होते. पुन्हा ‘ ट्रींsssग ...  ट्रींsssग....’  रॉड्रीक झोपेतुन उठुन डोळे बारीक करत इकडे तिकडे बघु लागला.  त्याला आधी समजलंच नाही की तो कुठे आहे.?  मग त्याच्या हळुहळु लक्षात आलं की त्याचा मोबाईल वाजतोय. पण तो कुठे आहे ते त्याला समजेना. त्याने कसाबसा तो शोधला.  एलीनाचा कॉल होता. 

" हॅलो जानु .... हाऊ आर यु?  " 

" रॉडी .... किती वेळ मी फोन ट्राय करतेय ? आणि तु अजुन झोपेतच आहेस?  " पलीकडुन तिचा चिडका स्वर आला.  

" सॉरी यार... काल झोपायला उशीर झाला.  तु बोल ना.  " 

" नथिंग सिरीयस,  असाच फोन केला. व्हॉटस युअर टुडेज् प्लान...? ” 

" सॉरी हनी. आय हॅव सम इम्पॉरटंट वर्क. विल मीट टुमोरो...?" 

" तु पहील्यासारखा मला वेळ देत नाहीस.  यु हॅव चेंज्ड... " बायकांना कितीही वेळ द्या तो त्यांना कमीच वाटतो. आणि ही त्यांची पेटंट कंम्लेंट असते.  रॉड्रीकला ह्या सगळ्याचा कंटाळा आला होता.  आधीच त्याचं भविष्य अंधारात होतं.  त्यात आता हीची कटकट. पण तो काहीच बोलला नाही. नुसता शांतपणे ऐकत राहीला. 

"हॅलो,  हॅलो रॉडी,  आर यु देअर? " समोरुन काहीच रिप्लाय येत नसल्याने तिने विचारले. 

" या …. आय ऍम हिअरींग.  " 

" आर यु ओके....?  " त्याच्या सुरांवरुन तिला प्रथमच तो काळजीत असल्यासारखा वाटला. एलिना तशी कटकटी नव्हती . ती फक्त  नेहमी रॉड्रीकच्या मागेपुढे करीत असे. तसं बघायला गेलं तर रॉड्रीक एक नंबरचा आळशी  आणि घाणेरडा ! .  त्याच्या घरात नेहमीच सर्वत्र पसारा असायचा.  कपडे कसेही ठेवलेले , बूट कुठेही टाकलेले ,  कोणतीही वस्तू जागेवर म्हणून सापडायची नाही . मग तो उगाचच चिडचिड करायचा . त्याच्या अगदी उलट एलिना होती .  ती टापटीप राहणारी मुलगी होती . जिथली वस्तू तिथे !  त्या दोघांतल्या ह्या फरकामुळे त्यांच्यात नेहमीच छोट्या मोठ्या कुरबुरी  व्हायच्या . पण एलिना समजूतदार होती . ती त्याला नेहमीच सांभाळून घ्यायची .  आणि आताही फोनवरच्या त्याच्या सुरांवरून  तिने रॉड्रिक  काळजीत असावा हे बरोबर ओळखले . 

“ या , आय एम  ओके  . आय  विल मीट यु टुमोरो  इविनिंग . ” असं  म्हणून त्याने फोन कट  केला. 

घड्याळात  पाहिलं , सकाळचे ११ वाजून गेले होते.  बाजूच्या खुर्चीत मॉन्ट्या बसल्या बसल्याच झोपला होता . त्याने मॉन्ट्याकडे पाहिलं . बिचारा आपल्यामुळे उगाचच ह्या सगळ्या प्रकरणात अडकला  होता. आणि एकदाही त्याने आपल्याला त्याबद्दल दोष दिला नाही . तो नेहमी मदतच करत राहिला .  दोस्त असावा तर असा !  आपलं  ह्या प्रकरणात काहीही होवो , मॉन्ट्याला काही होता कामा नये हे त्याने आधीच ठरवलं  होतं .  फक्त  त्याच्या ह्या कठीण काळात तो बरोबर असावा असं  मात्र त्याला वाटत होतं  हे नक्की . !   शांतपणे  झोपलेल्या  मॉन्ट्याला उठवायचं  त्याच्या जीवावर आलं  होतं . पण तो त्याला उठवायला जाणार तेवढ्यात त्यालाच जाग आली . 

“ अरे , किती वाजले ?  आयला जाम उशीर झाला रे . ” घड्याळात बघत तो खडबडून  उठला . “ मला उठवायचा नाय का यार …!   ”

“  इट्स ओके , तू तुझं  आवरून घे . आपल्याला निघायला पाहिजे आता . ” 

“ हो … हो…   मी लगेच आवरतो … ” म्हणत मॉन्ट्या लगेच उठून पळालाच ! दोघे घराबाहेर पडले तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. 

“ काहीतरी खाऊ रे … मला  जाम भूक लागलीय  ” मॉन्ट्या कसनुसं तोंड करून  म्हणाला . 

दोघे एका साउथ  इंडियन  रेस्टोरंट   मध्ये गेले  आणि येथेच्छ तिथल्या पदार्थांवर तुटून पडले .  

“ रॉडी , आता काय करायचं  ?  ” सांबारचा भुरका मारता मारता मॉन्ट्या विचारू लागला . 

“  आपल्याला आता परत त्या नोटेचा  शोध घ्यायला पाहिजे  ”

“ म्हणजे परत त्या बार  मध्ये जावं  लागेल  ? ” 

“ राईट . अँड  एज अर्ली  एज  पॉसिबल ” 

“ हो बाबा , उरकतो  … ” म्हणत मॉन्ट्या  पटापट  समोरच्या ताटातलं संपवू लागला . ते लगेच निघाले . मॉन्ट्याने  रिक्षा केली आणि ते दोघे  करिष्मा बार पाशी येउन पोहोचले .  रात्री ऐन बहरात असलेला करीष्मा बार सकाळी सुस्तावलेला वाटत होता. जत्रा संपुन गेल्यावर जस उजाडं चित्र दिसतं तसं सगळीकडे दिसु लागलं. बारमधे कोणीच गिऱ्हाईक नव्हते. तो ऑर्केस्ट्रा बार असल्याने दुपारी सर्वत्र सामसुमच होती. एकदोन वेटर इकडेतिकडे फिरत होते.  

" मॅनेजरला भेटु आधी.  " 

" तो तरी कुठे आहे ?  तो संध्याकाळी येणार. " 

" हम्म्म ... अरे बॉस,  मॅनेजर कब आएगा. ? " मॉन्ट्या ने एका वेटरला विचारलं 

" वो शामकु आता... अबी कोई नय... " म्हणत तो निघुन गेला. 

" आयला,  आता काय करायचं?  चल मागच्या बाजुला जाऊन बघु.  काल जिथे नोट पडली होती तिथे... " रॉड्रीक म्हणाला.  

" तुला वाटतंय की तिथे ती नोट असेल ...?  " 

" बघायला काय हरकत आहे?  " 

दोघेही बारच्या मागच्या बाजुला गेले. काल जेव्हा तो महाकाय सत्तु त्या दोघांना घेऊन जात होता ,  तेव्हा रॉड्रीकने ओझरती ती नोट पाहीली होती. पण आता तिथे काहीच नव्हतं. आणि अजुनपर्यंत ती नोट तशीच तिथेच पडुन राहील हे मात्र अगदीच अशक्य होतं. 

" एज् एक्सपेक्टेड... " रॉड्रीक सहज आजुबाजुला पहात म्हणाला. 

" इतका वेळ ती नोट इथेच कशी राहील. ?  पण आता कुणाला विचारायचं?  " 

" आय थिंक,  वेटर लोकांपैकीच कुणीतरी ती पडलेली नोट उचलली असल्याची पॉसीबिलीटी आहे. " रॉड्रीकने लगेचच एका वेटरला हाक मारली.  " अरे बॉस,  कल रात यहां पे कुछ दस के नोट गिरे थे.  किसीने देखा क्या? तुमने देखा ?  " 

" मालुम नय " म्हणत तो वेटर निघुन गेला.

आणखी एक दोन जणांना त्यांनी विचारलं पण ' मालुम नय 'च्या पुढे वेगळं काही ऐकायला मिळालं नाही. दोघेही वैतागले. " जाऊ दे आपण संध्याकाळी मॅनेजरला विचारु. " मॉन्ट्या म्हणाला.  

" तो तरी आपली काय मदत करणार ?  तो पण ' मालुम नय ' असंच म्हणणार.  " रॉड्रीक निराश झाला. 

" टेन्शन नको रे घेऊ. चल.  " ते दोघे निघणार तेवढ्यात मागुन एक आवाज आला , " ओ साब,  आप दोनो कल रात इदर आये ते ना ?  " त्यांनी चमकुन मागे पाहीलं तर एक २० -२५ वर्षांचा पोऱ्या त्यांना विचारत होता. तो त्या बारमधला वेटरच होता. बारच्या नावाचा चॉकलेटी रंगाचा जाडाभरडा शर्ट त्याच्या अंगावर होता. 

" हा .... तु कल था क्या. ?  अरे छोटु ,  हमारे कुछ नोट बार के पिछे गिरे थे.  तुने देखे क्या ? "  रॉड्रीकने विलंब न लावला त्याला विचारुन टाकलं.  

" मैने देका. कुच गुंडे लोक आये ते.  ओर तुमको ले गये. " 

" हां  बराबर है. लेकीन कल दस रुपय के कुछ नोट यहां गिरे थे. तुने देखे होंगे. " रॉड्रीकला आता थोडी आशा वाटु लागली. 

" हां देके ते. मै वो उटाने बी वाला ता.  " 

" फिर ...?  " 

" वो साली,  नाझनीन  बिच मे टपक गयी. "  

" कौन नाझनीन ?  " 

" अरे वो कल रात यही पे थी ना. वो एक लडके के साथ  बैठी थी. " बारच्या त्या पोऱ्याने कोपऱ्यात एका टेबलाकडे बोट दाखवले ... 

" अरे हां .... ती काय ?  अरे काल नाय का त्या रिक्षावाल्याचा भाऊ एका आयटमला घेऊन बसला होता. बरोबर... तीचं नाव नाझनीन  का ?  " मॉन्ट्या रॉड्रीकला म्हणाला. 

" हां वहीच. उसनेही उटाया वो पैसा. "   त्या पोऱ्याला भलताच राग आलेला दिसला. 

" वो अभी है क्या ?  " 

" नय. वो रातको आती है ... दो चार टुमके लगाती है और बैट जाती है किसी के सात. पक्की कामचोर है. " 

" वो रहती कहां है मालुम है तेरेको. ?  "  रॉड्रीक घाईघाईने म्हणाला. 

" वैसे तो मेरेको ठिकसे मालुम नय... कुछ याद नय.... " बोलताना तो थोडासा घुटमळला. परंतु त्याच्या बोलण्यावरुन असं वाटंत होतं की त्याला नक्की  माहीत होतं की ती बारबाला नाझनीन कुठे रहाते. मॉन्ट्याला त्याच्या म्हणण्याचा मतीतार्थ लगेच कळला. त्याने लगेच आपले पाकीट काढले... त्यातुन पन्नास रुपयांची नोट काढुन त्याच्यासमोर नाचवली.  " अब याद आ रहा है कुछ....?  " ती नोट पाहुन त्याचे डोळे चमकले.  " वो सांताक्रुज मे किदर तो रैती है... " एवढं बोलुन त्याने ती नोट खिशात टाकली. 

" सांताक्रुज मे किधर...?  " रॉड्रीक विचारु लागला. त्यावर तो पोऱ्या आणखीन थोडा वेळ घुटमळला. ' आयला,  पोरगं चालु दिसतंय... ' मनातल्या मनात म्हणत मॉन्ट्याने पुन्हा पाकीटाला हात घातला. त्यातुन पुन्हा एक पन्नासची नोट काढली अन् त्या पोऱ्याला म्हणाला. ,  " देख,  ये पचास ले और पुरा एड्रेस बता. नही तो वो पचास भी देदे... समझा क्या ?  " ही मात्रा बरोबर लागु पडली. त्याने ती नोट घेतली आणि सगळा पत्ता सांगितला. ' सब पैसेका खेल है... ' रॉड्रीकने विचार केला. 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच , एक छान वेबसिरीज बनेल यावर.
कृपया कथा पूर्ण करा. क्रमशः कथा पूर्ण झाल्याशिवाय वाचणे सोडून दिले आहे. या कथेचा एक भाग वाचला आणि उत्सुकतेपोटी सगळे वाचून काढले . लेखन शैली अप्रतिम आहे. कथा समोर घडल्यासारखी वाटते.
तुम्हाला अनेक शुभेच्छा .