खाजा स्टेप बाय स्टेप

Submitted by Shreya_11 on 24 November, 2020 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
क्रमवार पाककृती: 

पाककृती एडिट कशी करायची ?
ते करायचा काही option नाही दिसला म्हणून हा नवीन धागा !

पाककृतीचा धागा

https://www.maayboli.com/node/74539

१. साखरेचा पाक , यात मी २ ड्रॉप्स yellow फूड कलर टाकला आहे त्यामुळे खाजाला अतिशय सुरेख रंग आला !

step1.jpeg

२. एकसारख्या आकाराच्या पोळया

step2.jpeg

३.पहिली पोळी तूप लावून कॉंर्नफ्लोअर टाकले आहे .

step3.jpeg

४. असे प्रत्येक पोळीवर तूप आणि कॉंर्नफ्लोर पसरावे . हा पाच पोळ्यांचा थर तयार ! शेवटच्या पोळीवर देखील तूप आणि कॉर्नफ्लोअर लावावे .

step4.jpeg

५. अशा प्रकारे रोल बनवावा .

step5.jpeg

६. तयार रोल .. हलक्या हाताने एकसमान दाबून घ्या .

step6.jpeg

७. सारख्या आकाराचे तुकडे

step7.jpeg

८.
step8.jpeg

९. एक piece घेऊन अशा पद्धतीने लाटावा

step9.jpeg

१०. लाटलेला खाजा

step10.jpeg

११. एका वेळेस ६ ते ७ pieces व्यवस्थित तळले जातात .

step11.jpeg

१२. तेल निथळून लगेच पाकात टाकावेत .. पाक सगळीकडून लागला कि लगेच बाहेर काढा
Ready to Eat !!!

step12.jpeg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर दिसत आहेत. ह्यात तूप साजूक वापरतात की वनस्पती? मी लहान असताना आईला करताना बघितल्याचं आठवतंय तेव्हा डालडा किंवा तत्सम वनस्पती तूप वापरत असत. म्हणून शंका आली.

धन्यवाद जाई !

@ मेधावि - हो हा चिरोटे चा एक प्रकार पण पाक नाही बनवत .. लाटायची पद्धत पण थोडी निराळी .. चिरोटेला वरून फक्त पिठीसाखर टाकते.

@अनया - धन्यवाद !! यात मी साजूक तूप वापरले आहे .. तेल वापरूनही एकदा try केले .. छानच होतात .. डालडा कधी वापरला नाही पण ते वापरून पण चांगले होतील !

खाजा ऐकूनच जगन्नाथ पुरी आठवलं... Happy

तूप आणि पिठ फक्त पहिल्या आणि शेवटच्या पोळीवर लावायचं की सर्व?

खरच खूप छान दिसताहेत...

Yummy

मस्त , सगळेच फोटो छान आहेत. करून खावेसे वाटतात. आता आई ला सांगायला पाहिजे Wink
आम्ही याला चिरोटे म्हणतो आणि पिठीसाखर असते त्याला खाजा

मस्त रेसिपी.
आम्ही सुध्दा याला चिरोटे म्हणतो. फक्त आकार चपट-गोल असतो. बाकी सेम.
थोडे पातळीवर लाटुन मग कडकडीत होईपर्यंत तळून काढले जाते.

साठ्याच्या करंज्या करताना, आई कंटाळली की असे खाजा नाहितर चिरोटे बनवून पीठ संपवायची. काही पाकात न बुडवता ठेवायची. अगोड खाजा चहा बरोबर खावून मी संपवायचे.

अप्रतिम. मी नक्की TRY करते. लोकडाऊन मध्ये बरेच पदार्थ मधुरा रेसिपी वरून शिकले आणि बनवून तिच्या फेबु वर पोस्ट पण केले.

धन्यवाद सामी , सिद्धि , वेका

@ झंपी - आमच्याकडे पण करंजी झाली कि शेवटच्या गोळ्यांचे चिरोटे हमखास ठरलेलं असायचे !!

@ Ajnabi - Thank you ! हो मी हि बनवले काही पदार्थ मधुरा रेसिपी बघून .. खाजा ची पण पाहिल्याचे आठवते पण आता शोधाशोध करूनही सापडतं नाहीये ...

सुंदर पा.क :थम्स अपः
आमच्या सा,बा ची ही सिग्नेचर डीश. मी पहक्त खायचे काम करते.