भारतात, परतावे अथवा नाही?

Submitted by सामो on 18 November, 2020 - 02:05

माबोवरती निवासी-अनिवासी दोन्ही गटातले सुजाण आय डीज आहेत. विविध अनुभव घेतलेलेले आहेत, प्रत्येकाला आपापल्या स्थानिय परीघातील बलस्थाने, उणीवा, मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मांडण्याचे धाडस करते आहे. कारणं वैयक्तिक आहेत तशीच सांगता येण्यासारखीही आहेत. गेले अनेक वर्षे हा विचार होताच पण आता अधिक जोराने मूळ धरतो आहे. सांगता येण्यासारखी कारणे खाली मांडते.

प्रश्न- अमेरीकेचे नागरीकत्व मिळून आताबरीच वर्षे होतील. म्हणजे येतील जीवनाचा उपभोग घेउन खूप वर्षे होतील. इथे कधीच मन रमले नाही. आता जर मी (एकटी) भारतात परतले तर मला अ‍ॅडजस्ट होता येइल का? काय काय अडथळे येतील?

मी स्वतः एक यादी बनवलेली आहे ज्यामध्ये प्रोज आनि कॉन्स मांडलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला एकेक वजन दिलेले आहे. यात भारतात परतण्याकरता जे प्रोज आहेत ते सध्या तरी १३ एकक वजन राखून आहेत. न जाण्याच्या कारणांचे वजन आहे १७ एकक. म्हणजे न जाण्याचे पारडे जड आहे. असणारच कारण नवरा व मुलगी यायला तयार नाहीत. त्यांचयशिवाय मी एकटीच जाणार हाच एक नॉन-निगोशिएबल मुद्दा 'कॉन्स' मध्ये आहे. नॉन-निगोशिएबले म्हणजे अतिशय गंभीर/आवश्यक मुद्दा. या मुद्द्याला सर्वात जास्त वजन आहे. अन्यथा पारडे समसमान आहे.

(१) मला, घर नवीन घ्यावे लागेल. शक्यतो (९०%) पुण्यात घ्यायला आवडेल. घरांच्या किंमती, स्वारगेट्/डेक्कन/कोथरुड/औंध भागात काय आहेत कोणाला माहीती आहे का? १ बी एच के इज सफिशिअंट फॉर मी.

(२) जॉब शोधावा लागेल. मॅन्युअल टेस्टिंगला काही स्कोप आहे का? माझे वयही जास्त आहे. आता मी जवळजवळ पन्नाशीला आले आहे. २ ईयर्स शाय ऑफ फिफ्टी. किंबहूना म्हणुनच वाटतं - अब नही तो कब?

मुख्य म्हणजे असा निर्णय तुमच्यापैकी कोणी घेतला आहे का? किंवा तुमच्या परिचयात असा निर्णय घेतलेले कोणी आहेत का? त्यांचा काय अनुभव? ते कसे अ‍ॅडजस्ट झाले? मी साईड बाय साईड, युट्युब वर, ब्लॉग्जवरती तशा केसेसच्या मुलाखती/ माहीती वाचतेच आहे.

प्लीज डु नॉट मेक फन ऑर गिव्ह नी-जर्क रिस्पॉन्सेस. विचार करुन, उपयोगी पडावा याकरता, सल्ला द्या. दोन्ही स्वाती, अमा, वर्षा, अस्मिता, देवकी, मीरा,मृणाल, भरत, मानव,च्रप्स, ऋन्मेष, हीरा, अनु, सीमंतिनी, हर्पेन, रुपाली, किल्ली, आणि अन्य सर्व रेग्युलर्स. कोणाचे नाव राहीले असेल, तर माफ करा. पण सगळेच एक से बढकर एक हुषार , दयाळू, परखड, व्यवहारी आय डीज आहेत, त्यांचा अनुभव परीघही विस्तारीत अहे. म्हणुन इतका वैयक्तिक व अगदी अर्धा कच्चा प्रश्न मांडायचे धाडस करते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला परदेशी रहाण्याचा / परतण्याचा अनुभव नाही. पण इथे काही महत्त्वाचे नक्की मिळेल. पूर्वी झालेली चर्चा थोडी वाचली होती ---
https://www.maayboli.com/node/13157
बाकी / अधिक मुद्दे जाणकार सुचवतीलच

सामो, नक्कीच सेट व्हाल.
हल्ली एन आर आय ना कल्चरल शॉक बसावे असं फार काही पुणे मुंबईत राहिलं नाही.
मॉल आहेत, सर्व परदेशी दुकानांच्या ब्रँच आहेत. एन्जॉयच कराल इथे राहणे.
नोकरीबाबत, तुमचे सी टी सी कंपनी ना परवडणार नाही असे वाटते.फ्रीलान्स असाईनमेंट वाल्या साईट्स वरून काम घेणे जास्त सोपे जाईल.

कोथरुड १ बीएचके १.२ लाख. बाकी कोणी कधीच येणार नाही का घरी रहायला?. २ बीएचके १.५ लाख.
फक्त आत्ताचा विचार करण्यापेक्षा अजून ५वर्षानी/ १० वर्षानी/२० वर्षानी तुम्ही जीवनात कुठे असायला पाहिजे आणि तुम्हाला काय पाहिजे याचाही विचार करा, तुम्हालाच उत्तर सापडेल नक्की. शुभेच्छा.
एकदा निर्णय झाला की काहिही जमते.

भारतात परतायची कारणे दिली असती तर अजून क्ल्यारिटी मिळेल सल्ला देणाऱ्याना. अमेरिकेतील नागरिकत्व आणि कुटुंब सोडून येणार म्हणजे काही आध्यात्मिक ओढ आहे का ?

मन कुठेही लागू शकते किंवा लागू शकत नाही.... आपल्याला काय हवे आहे यावर मनाचे लागणे न लागणे अवलंबून आहे.

केवळ तिकडे मन लागत नाही आणि इकडे लागेल असे वाटते म्हणून येताय तर दोन मुद्दे लक्षात घ्या -

एक म्हणजे इकडे ज्या गोष्टींमुळे मन लागेल असे वाटतेय त्या गोष्टी 17 वर्षात पार बदलून गेल्या असण्याची 100 टक्के शक्यता आहे Happy Happy

आणि दुसरे हे इथे स्वतःचे घर, नोकरी सगळे परत करायचे म्हणजे तिकडचे दोर जवळजवळ कापून आल्यासारखे आहे. दोन महिन्यात इथेही मन लागायचे बंद झाले तर मग काय??

इथे येऊन सहा महिने भाड्याच्या घरात राहा, ते सहा महिने तिकडचे काम ऑनलाईन असेल तर सुरूच ठेवा आणि दरम्यान स्वतःचे व इथले पाणी जोखा हा सल्ला मी देईन. बरे वाटले तर अजून सहा महिने टेस्टिंग करा आणि मग निर्णय घ्या, कंटाळा आला तर घर परत करून टाटा बाय बाय करा.

मी गेले पाच महिने एका खेड्यात राहतेय, मुलीसकट. इथे येऊन राहायचे हे गेली 10 वर्षे ठरलेले होते पण जवळचे मित्रमैत्रिणी व घरचे मला कायम सांगायचे की दोन दिवस ठीक आहे पण तू खेड्यात कायम नाही राहू शकणार. तरीही आमचे पाच महिने निघाले आणि आता परत जायची इच्छा होत नाहीये. इथे येताना 'कंटाळा आला तर बोचके उचलून परत जायचे' हे कुठेतरी डोक्यात असणार, त्यामुळे कदाचित कंटाळा आला नसणार किंवा इथे यायची इच्छा प्रबळ होती म्हणून कंटाळा आला नसणार. परतीचे मार्ग बंद झालेले असते किंवा मनाविरुद्ध इथे यावे लागले असते किंवा तिकडे कंटाळा आला, कुठेतरी दुसरीकडे जाऊ म्हणून इथे आलो असतो तर कदाचित इथे मन रमले नसते. इथल्या उणिवा टोचायला लागल्या असत्या. आम्ही स्वतःच्या मर्जीने, इथेच यायचे म्हणून आलो त्यामुळे इथल्या उणिवा टोचत नाहीत.

माझं नाव नाही तरी प्रकाश टाकावा म्हणतो Lol
सगळ्यात आधी तर भारतात येण्याचे प्रोज आणि कॉन्स बघण्यापेक्षा मला भारतात का यायचंय? हे मनाशी पक्कं करा (आधीच पक्कं असेल, तर हा मुद्दा अस्थानी समजावा.)
त्यानंतर सरळ फ्लॅट घेण्यापेक्षा मस्तपैकी एखादा फ्लॅट किंवा घर भाड्याने घेऊन बघा. तिथे कमीत कमी तीन महिने तरी राहा. (पहिला महिना तर नावीन्यात जातो. सगळं कसं मस्त वाटतं. दुसऱ्या महिन्यात काही काटे दिसतात. तिसऱ्या महिन्यात दृष्टी साफ होऊन हिरवळ आणि काटे मस्त बायफरकेट करता येतात.) जर वाटलंच तर परत जाऊ शकाल, विदाऊट मच इन्व्हेस्टमेंट ऑर गिल्ट.
अजून एक. भारतात काय करायचंय त्याची टू डु लिस्ट बनवा. मनासारख काम मिळालं नाही, तर प्लॅन बी रेडी ठेवा.
असो. शुभेच्छा.

कोर्‍या कोर्‍या कागदावर जरी असलं छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं.... कागदावर वाटेल ते प्रोज-कॉन्स लिहीले तरी आपण सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो नि दुधाच्या पिशव्या चोरीला गेल्या तर किती त्रास.... किंवा सकाळी "उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद" सुब्बलक्ष्मी अवचितपणे ऐकू आलं तर किती आनंद.... हे कसं कुठल्या कॉलममध्ये मांडणार. कारणे काहीही असू दे, आलं आहे मनात नि थोडे पैसे बुडीत टाकायची तयारी असेल तर प्रायोगिक तत्त्वावर १-२ महिने एअर-बीन्बी/ पेईंग गेस्ट मध्ये राहून बघितलं असतं. जो काही निर्णय घेशील त्याला खूप शुभेच्छा...

आपण सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो नि दुधाच्या पिशव्या चोरीला गेल्या तर किती त्रास....>>>>

अरे देवा, पुण्यातले पेन्शनर सक्काळी सक्काळी फुले चोरतात हे माहीत होते, दुधाच्या पिशव्या पण?????

अमेरीकेचे नागरीकत्व मिळून आता ३ एक वर्षे तरी होतील. इथे २००३ साली आलो. म्हणजे येतील जीवनाचा उपभोग घेउन तब्बल १७ वर्षे होतील. इथे कधीच मन रमले नाही.>> परत यायचं बघू नका.. त्यापेक्शा १० महीने अमेरिकेत जाॅब आणि २ महीने भारतात सुट्टीसाठी येता येईल अशी काही तरी तरतूद करा.. तिकडची अर्निंग पावर आणि इकडचा आपल्या माणसांमधे रहाण्याचा निखळ आनंद, दोन्ही उपभोगता येईल. माझा तरी हाच विचार आहे.

का परत यायचं, ह्याच swot करून बघा एकदा?

जर हो, यायचंच असं झालं 5 6 महिने येऊन राहून बघा.

माझा जुना बॉस, अमेरिकेत 15 वर्ष राहून सिटिझनशिप घेऊन परतला. मुलांना इथला अनुभव द्यायचा म्हणून. 5 6 वर्ष झाल्यावर परत गेला, करण इथे काही पाश उरले नव्हते.

काहीही निर्णय झाला तरी अमेरिकन सिटीझनशीप सोडू नका Lol

(स्वगतः जिथे आपण जन्मलो, शिकलो, बरीच वर्षे राहिलो, भाषा शिकलो, आता परतताना गाठीशी चार पैसे असणार आहेत अश्या परिस्थितीत तिथे येऊन परत रमायला त्रास का होईल? जी लहान मुलं तिथेच जन्मली आहेत त्यांना होईल फारतर. धिस इज जस्ट होमकमिंग. काही महिने घालवल्यावर 'कधी नव्हतेच अमेरिकेत' असं व्हायला हरकत नाही.)

सामो,मला जे म्हणायचे होते ते साधना आणि अज्ञातवासी यांनी आधीच म्हणून झालेय.

तसेच्,वयाच्या ह्या टप्प्यावर(फार वय नसूनही) नव्याने घडी मांडणे जिकीरीचे निश्चित होईल.त्यात तुझे फॅमिली मेंबर्स त्या निर्णयाविरोधात आहेत.तिकडच्या सुविधा आणि इकडची परिस्थिती यात फार अंतर आहे.
तुझा निर्णय ठाम असेल तर तू निश्चितपणे कुठेही राहू शकशील.
तुमच्या परिचयात असा निर्णय घेतलेले कोणी आहेत का>>>>>>नाही. माझ्या काही नातलग परदेशातच रहाणे पसंत करीत आहेत.त्यांना ३५-३० वर्षे झाली आहेत.त्यांना जोडणार्‍या धाग्यालाच(आईला) परदेशाची आवड होती.आता आईही राहिली नाही.

तुला, तुझा निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा!

सामो तुम्हाला सल्ला द्यायला तशी बरीच लहान आहे मी.

तिकडून भारतातील वातवरण, सण वार, लग्न सोहळा कितिही छान वाटले तरी खूप वर्षानंतर इकडे आल्यावर खूप फरक पडतो. पूर्वी सारखे नातेवाईक मिसळत नाहीत आणि तुम्ही काय फॉरेनर असे ऐकून घ्यावे लागते. ओळखीचे कोणी भेटले की मग परत कधी जाणार असे विचारतात. परदेशात एखादे वर्ष राहणे आणि खूप वर्षे राहिलेले हा फरक खूप होतो.

माझा सल्ला इतकाच आहे की इथे येऊन 1-2वर्षे भाड्याने घर घेऊन रहा. घर विकत घेण्याच्या फंदात पडू नका. मगच फ़ायनल डिसिजन घ्या.

ते १७ आणि १३ प्रोज आणि काॅन्स पर्सनल नसतील तर देता येतील का..?
कारण तुम्ही कोणत्या निकषांवर विचार करताय हे कळू शकेल आणि त्या अनुषंगाने मायबोलीकरांना सल्ले सुचविता येतील..

अस्वच्छता, बेशिस्तपणा, भ्रष्टाचार, राजकारणी/ गावगुंड यांचा त्रास, पोलिस खाते, न्याय व्यवस्था यांची सद्य परिस्थिती हे सर्व विचारात घेतले असेल तर भारतात स्वागत आहे.

तुमच्या स्पेसिफिक प्रश्नांबद्दल
1 - कोथरूड , डेक्कन परिसरात कमीत कमी रुपये 10000 प्रति sq. Ft. Of salable area
2 - job as manual tester at this age - frankly, little difficult unless you carry a strong experience from a niche industry domain or application
तुमच्या कोणत्याही निर्णयाला शुभेच्छा!!

मला, घर नवीन घ्यावे लागेल. शक्यतो (९०%) पुण्यात घ्यायला आवडेल. घरांच्या किंमती, स्वारगेट्/डेक्कन/कोथरुड/औंध भागात काय आहेत कोणाला माहीती आहे का? १ बी एच के इज सफिशिअंट फॉर मी.>>>>>

जुने, रिसेलचे फ्लॅट ४५ ते ५० लाखात मिळतील. पण २० ते २५ वर्षे जुन्या फ्लॅट/ बिल्डिंग मधे राहणे त्रासदायक ठरू शकते.

तुम्ही लिहिलेल्या भागांमधे नविन १ बीएचके फ्लॅट जास्त मिळत नाहीत. आणि मिळाला तरी ८५ ते ९० लाखाच्या खाली मिळणे अवघड आहे.

माझ्या माहितीत एक जण अशी पुणे अमेरिका ये जा करते. नवऱ्याने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे पण हिने घेतलेले नाही. मुलं जन्माने अमेरिकन आहेत आणि आता कॉलेजमधे आहेत. मूळ पुण्यात रहात होते त्यामुळे घर आहे, नातलग मित्र परिवार आहे. नवरा जॉब करतो आणि ही करत नाही. काही महिने इकडे आणि काही तिकडे अशी येजा चालू असते. जमेल तेव्हा नवरा मुले देखील येतात. छान जमून गेले आहे तिला.
सामो, तुम्ही पुण्याच्या आहात का किंवा पुण्यात नातेवाईक/मित्रमैत्रिणी आहेत का? यापैकी काही एक जरी असेल तर पुण्यात राहणे सोपे जाईल. दुचाकी येत असेल तर फारच छान!
नोकरीतून sabbatical घेऊन इथे काही महिने येऊन राहून बघा. तुमचा तुम्हाला नक्की अंदाज येईल. भाड्याने घर घेणे हा सुरुवातीला उत्तम पर्याय आहे. घर घेण्याची किंवा नागरिकत्व सोडण्याची घाई करू नका. Test the waters first. तुम्हाला शुभेच्छा!

सामो! तुला एकेरीच नावाने संबोधते. वर सर्वांनी दिलेले प्रतिसाद , माहिती तुम्हांला योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतील असं वाटतं. मला साधनाताई आणि अज्ञातवासी यांचा प्रतिसाद आवडला. तू भारतात परतण्याची आणि न परतण्याची कारणे योग्य रित्या अभ्यासली असणारंचं! खरंतरं सतरा वर्षे म्हणजे खूप मोठा काळ आहे. आपल्या जन्मभूमीची, आपल्या माणसांची ओढ असणं ही नैसार्गिक भावना आहे. परंतु तरीही उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या भविष्याची सोय म्हणून आपल्याला स्थलांतर करावं लागतं. तू ज्या कारणांचा अभ्यास केला असशील ती मुलीला आणि पतीला पटतीलचं असं नाही. सतरा वर्षात तुमचं जीवन तिथे स्थिरस्थावर झालं असणारं. स्थिरस्थावर झालेले जीवन सोडून पुन्हा नव्याने नव्या ठिकाणी सुरुवात करणं सुरवातीला भावनिक तसेच व्यावहारीकदृष्ट्या कठीण जाऊ शकतं असं मला वाटतं. तू हा विचार नक्कीच भावनेच्या भरात करत नसणार! तुम्ही तिघांनीही (मुलीचे मत सुद्धा विचारात घ्यायला हवे ..असं माझं प्रांजळ मत आहे) भावना आणि व्यवहार ह्याचा योग्य समतोल सांधून तुम्ही आपल्या भविष्याच्या दृष्टीने विचार करूनच निर्णय घ्याल यात शंका नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासाठी व तुमच्या पुढील उज्वल, आनंदी भविष्यासाठी खूप शुभेच्छा!!

माझ्या दोन्ही कन्या यु एस मध्ये आहेत. सांस्कृतिक रित्या भारतापेक्षा अधिक समृध्द अनुभव आहे. आपले सर्कल बनवले आहे. त्यांना परत यायचे असेल तर फक्त आमचा पाश आहे, असा काही पाश नसल्यास इतर अनेक बाबतीत, तिथे सवय झाली असल्यास तो अनुभव अधिक समृध्द ठरेल, दोन एक वर्षांतून येत जा कारण इतर कुटुंबियांना स्थायिक म्हणून परत येण्यात स्वारस्य नाही. बाकी सुविधा, शिक्षण इ बाबतीत यु एस मधील वाईट गोष्टी इथे आपण पिक अप केल्या आहेत.
खरोखरच... आम्ही आईवडिल गेल्या नंतर, म्हणजे, जावयांचे व आम्ही दोघे, परत येण्याचे पाश नाहीत. अन आमच्या भेटी म्हणाव्यात तर त्या होतातच.

एकसे बढकर एक हुषार, दयाळू, परखड, व्यवहारी आयडीज मधे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद.

मन रमणे / रमवणे ही गोष्ट आपल्याला प्रयत्नसाध्य आहे असे मी मानतो.

इतकी वर्षे अमेरिकेत घालवल्यावर भारतात (त्यातून पुण्यात) परतू नये अशा मताचा मी आहे.

तळटीप - धाग्यात दिलेल्या (त्रोटक) माहितीवर आधारलेले मत आहे हे. अजून अधिक माहिती म्हणजेच इकडे यावेसे वाटण्याची कारणे कळली तर बरे पडेल

जवळच्या नातेवाईकांच्या ओढीने येणार असाल परत तर खरेच काही महिने टेस्टिंग करून पहा. पुर्वीचे बंध घट्ट असले तरी आता ते तसेच असतील असे नसते. बऱ्याचदा सारे विसविशीत झालेले असते.
भारतातली व्यवस्था प्रामाणिक माणसाला नाडणारी आहे, इथे साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावे लागते, प्रदुषण फार आहे. अमेरिकेतल्या डिग्निटीची सवय झाल्यावर इथले फालतू जिणे कितपत मानवेल सांगता येत नाही.
माझा सल्ला: तिथेच रहा.

Pages