दिवाळी अंकासाठी बनवलेली मिनिएचर्स

Submitted by jui.k on 15 November, 2020 - 10:45

खास यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी बनवलेली क्ले मिनिएचर मॅग्नेट्स..
गरमा गरम भाजलेलं मक्याचं कणीस!
PicsArt_10-27-12.41.02.jpgPicsArt_10-27-12.43.24.jpg
स्टॉल वरची मोठ्या तव्यावरची खूप सारे बटर घालून बनवलेली पाव भाजी
PicsArt_10-26-09.53.53_0.jpgPicsArt_10-26-09.56.08_0.jpgPicsArt_10-26-09.44.55.jpg

चॉकोलेट पेस्ट्रीज आणि ब्लु लगून मोकटेल
PicsArt_10-23-04.34.34.jpg

Mocktail आणि बिअर
PicsArt_10-27-12.49.51.jpg

शब्दांश प्रकाशनाच्या स्पंदन 2020 दिवाळी अंकासाठी माझे मिनिएचर घेतल्याबद्दल अर्चना गवस चौधरी आणि किल्ली यांचे खूप आभार! Happy
लिंक्स- https://youtu.be/WeGtiaMC-rc
https://drive.google.com/file/d/1uQ-JAgtehZN4fglqBOGIGO59nHZ7mp7Z/view?u...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर
कणीस भाजलेलं कसलं खतरा जमलंय

सुपर्ब!! भाजलेलं कणीस व कोळशाची शेगडी एकदम झकास.

भाजलेले कणीस, फुललेले निखारे, पावावर चोपडलेल्या बटरची तकाकी , काळी कुळकुळीत लोखंडी कढई सगळंच अप्रतिम. शब्द तोकडे पडतायत प्रशंसा करायला.

फारच भारी!!
ग्लासेस कसले दिसतायत!!

जुई , एक छोटसं निरिक्षण नोंदवते .
काहि गोष्टी out of proportion वाटतायेत .
म्हणजे लिंबाची फोड आणि कांदा बरोबर म्हणता येईल पण त्या मानाने मग पाव लहान वाटतोय . (किन्वा पावाच्या मानाने ते दोघे मोठे वाटताय)
लिम्बाची फोड , थाळीच्या हिशोबात बरीच मोठी आहे .

बीअर पीचर (ग्लास) आणि मॉकटेल ग्लास , किन्वा मॉकटेल ग्लास आणि पेस्ट्री . किन्न्वा एकत्र ठेवलेत म्हणून तसे वाटत असतील .
प्लीज रागावू नये . सहज जाणवलं म्हणून सांगितले..

स्वस्ति यात राग कसला.. मी अजूनही शिकतेय सगळं.. पुढच्या वस्तू बनवताना साईझ आणि प्रॉपोरशन कडे नक्की लक्ष देईन.. थँक्स तुमच्या honest प्रतिक्रियेसाठी.. Happy