Submitted by द्वैत on 13 November, 2020 - 03:23
दिवा लागो दारामध्ये
दिवा लागो दारामध्ये
उजळू दे अंतरंग
गळू देत लोभ सारे
जडो श्रमाचा व्यासंग
फराळाची गोड चव
जिभेवर उतरू दे
कुणासाठी द्वेषबुद्धी
तीळभर ही नसू दे
क्रोध आणि असूयेचे
फुटू देत बार सारे
धैर्य लाभो काळजाला
दुखातही हासणारे
वाढू देत नातीगोती
स्नेह फुलो संध्याकाळी
जोडुनिया ठिपक्यांना
जशी सजते रांगोळी
सदा राहो देहात ह्या
उत्सवाचे हे चैत्यन्य
प्रकाशात विवेकाच्या
जीवनाचे हो मांगल्य
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता
छान कविता
छान ! दिवाळीच्या शुभेच्छा !
छान !
दिवाळीच्या शुभेच्छा !
खूप सुंदर कविता...
खूप सुंदर कविता...
वाह!!! फार सुंदर आणि समयोचित.
वाह!!! फार सुंदर आणि समयोचित.
समस्त मायबोली परिवाराला
समस्त मायबोली परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
वाह...
वाह...