दिवा लागो दारामध्ये

Submitted by द्वैत on 13 November, 2020 - 03:23

दिवा लागो दारामध्ये

दिवा लागो दारामध्ये
उजळू दे अंतरंग
गळू देत लोभ सारे
जडो श्रमाचा व्यासंग

फराळाची गोड चव
जिभेवर उतरू दे
कुणासाठी द्वेषबुद्धी
तीळभर ही नसू दे

क्रोध आणि असूयेचे
फुटू देत बार सारे
धैर्य लाभो काळजाला
दुखातही हासणारे

वाढू देत नातीगोती
स्नेह फुलो संध्याकाळी
जोडुनिया ठिपक्यांना
जशी सजते रांगोळी

सदा राहो देहात ह्या
उत्सवाचे हे चैत्यन्य
प्रकाशात विवेकाच्या
जीवनाचे हो मांगल्य

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह...