नको तो कमर्शियल ब्रेक!

Submitted by सरनौबत on 6 November, 2020 - 00:49

मार्चपासून कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. भीषण परिस्थिती आणि वाढत्या लॉकडाऊन मुळे यंदा आयपीएल (IPL) होईल असे अजिबात वाटले नव्हते. संयोजकांनी मोठ्या धीराने UAE मध्ये यंदाचा हंगाम आयोजित केला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी असल्याने रेकॉर्डेड जल्लोष वगैरे तयारी केली. कोरोनाचे सावट असूनही सुदैवाने आतापर्यन्त सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आहे. एरवी सतत चालू असलेल्या क्रिकेट मॅचेस कोरोनामुळे अनेक महिने थांबल्या होत्या. आयपीएल च्या निमित्ताने आवडते खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळाले. काही मॅचेस अत्यंत चुरशीच्या झाल्या. आम्हा क्रिकेटप्रेमींची चांगली करमणूक झाली. मागचा दीड महिना सुरु असलेला हा सोहळा लवकरच संपणार म्हणून जरा वाईट वाटतंय. पण दुःखात सुख शोधावं असं म्हणतात. आयपीएल संपणार त्याचे दुःख आहे. पण त्यातील कमर्शियल ब्रेक मध्ये लागणाऱ्या अतिशय सुमार दर्जाच्या जाहिरातींपासून सुटका मिळणार त्याचा आनंद देखील आहे.

ह्या वैतागवाडीची मालिका CRED नामक जाहिरातींनी सुरु झाली. अनिल कपूर, माधुरी, बप्पी लाहिरी वगैरे मोठमोठ्या सेलिब्रिटीज कसली तरी ऑडिशन देताना दिसायचे. ते नक्की काय करत आहेत आणि धड काय बोलत आहेत ते शेवटपर्यंत कळू शकले नाही. CRED हे नक्की काय प्रकरण आहे ते शक्यतो कळू देऊ नये अशी खबरदारी घेऊन बनवलेल्या थुकरट जाहिराती! इतका खर्च करून बनवलेल्या ह्यापेक्षा वाईट जाहिरातींची मालिका दुसरी कुठलीच नसेल. ज्या लोकांनी CRED ऍप पूर्वी डाऊनलोड केलं असेल ते अश्या जाहिराती बघून अनइन्स्टॉल करतील नक्कीच. एखाद्या पार्टीत सगळेच सुटाबुटात असताना एखादा अतिशय वाईट कपडे घातलेला माणूस लक्ष वेधून घेतो त्यानुसार लोकांचं लक्ष जावं म्हणून अश्या मुद्दाम सुमार जाहिराती केल्या असाव्यात.

"म्युच्युअल फंड्स सही है" च्या जाहिराती सुद्धा अगदीच वाईट आहेत. परंतु त्या मागच्या वर्षी देखील इतक्याच खराब होत्या, त्यामुळे वाईटपणात का होईना; पण त्यांनी सातत्य राखले आहे. HDFC च्या शर्मन जोशीची जाहिरात देखील अगदी बेक्कार! किमान HDFC कडून असल्या जाहिरातीची अपेक्षा नव्हती. मोठमोठे सेलिब्रिटीज आणि ऍड एजन्सीज घेऊन अशा जाहिराती बनवून पैश्याचा अपव्यय का करतात, देव जाणे!
अजून एक डोक्याला शॉट ऍड म्हणजे WhiteHat Jr च्या "कोडिंग सीखे". इतक्या लहान वयात पोंरानी दंगा करणे आणि हुंदडणे सोडून कोडिंग शिकायचं? कोडिंग शिकवण्यापेक्षा ह्या लहान पोरांना जाहिराती बनवायला शिकवले तर ती सुद्धा ह्यापेक्षा बऱ्या जाहिराती बनवतील. कुठे गेल्या कॅडबरी ची "कुछ स्वाद है जिंदगी मै" किंवा फेव्हिकॉल च्या सगळयाच अतिशय क्रिएटिव्ह आणि मनोरंजक जाहिराती बनवणाऱ्या एजेन्सीज? ही लोकं पण कोडिंग करायला लागली काय, हे मला न सुटलेलं "कोडं" आहे.

पूर्वी मोबाईल कंपन्यांच्या जाहिराती बऱ्या असायच्या. विशेषतः व्होडाफोन चे पग आणि नंतर झुझु च्या जाहिराती. आता व्होडाफोन चे vi झाल्याच्या जाहिराती बोअर वाटतात. त्यांच्या नेटवर्क प्रमाणे जाहिरातीदेखील इष्ट स्थळी पोहोचत नाहीत. "जियो धन धना-धन " मध्ये वेड्यासारखे नाचणारे रणवीर-दीपिका देखील बघवत नाहीत. पूर्वी पानपराग (बारातियोंका स्वागत...) आणि माणिकचंद (ऊंचे लोग ऊँची पसंद) बघायला छान वाटायच्या. आता कमला-पसंद च्या जाहिरातीत भारत-ऑस्ट्रेलिया मॅच का दाखवतात ते समजले नाही. पूर्वी सोनी मॅक्स वर आयपीएल असायचं तेव्हा आयपीएल मॅचेसच्या जाहिराती, थीम सॉंग्स आणि स्टुडिओ अतिशय मनोरंजक वाटायचं. आता आयपीएल स्टार स्पोर्ट्स वर यायला लागल्यापासुन एकंदरीतच क्रिएटिव्हिटी प्रचंड खालावली आहे. त्याला अनुसरून प्रयोजकांच्या जाहिरातीदेखील त्याच सुमार दर्जाच्या झाल्या आहेत.

चांगला फलंदाज आऊट झाल्यावर वाईट वाटतं त्यापेक्षा "आता ब्रेक मध्ये असल्या फालतू जाहिरातींचा भडीमार सुरु होणार" ह्या कल्पनेने नकोसे होते. अनेकदा कोहली किंवा धोनी लवकर आऊट झाल्यावर लगेच त्यांच्याच MRF किंवा Oppo च्या जाहिराती दाखवतात; त्यामुळे कमाल चिडचिड होते. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट मध्ये ह्या कंटाळवाण्या जाहिरातींचा भडीमार अजिबात सहन होत नाही. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट ची घोषणा करताना अंपायर जेव्हा हाताने आयताकृती आकार काढून दाखवतात तेव्हा ती सूचना आपल्यासारख्या दर्शकांसाठी आयताकृती रिमोट घेऊन चॅनल बदलण्याची असते. त्यामुळे रिमोट कायम हाताशी ठेवावा लागतो. जरा जाहिराती सुरु झाल्या कि मी झी मराठी किंवा कलर्स मराठी लावतो. पूर्वी कुठल्याही सिरियल्स बघायचो नाही, पण आता आयपीएल च्या नकोश्या वाटणाऱ्या ब्रेक मुळे "माझ्या नवऱ्याची बायको", "अग्गबाई सासूबाई" आणि "शुभमंगल ऑनलाईन" बघणे बरे वाटते. मराठी सिरियलमधील ब्रेक मध्ये महागुरू सचिनची हातात बटाटेवडा धरलेली तिरुमला ऑइलची जाहिरात लागते. पण आयपीएल मधील जाहिरातींपेक्षा ही देखील आता सुसह्य वाटायला लागली आहे. वासरांत लंगडी गाय शहाणी!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल कपूर, माधुरी, बप्पी लाहिरी वगैरे मोठमोठ्या सेलिब्रिटीज कसली तरी ऑडिशन देताना दिसायचे. ते नक्की काय करत आहेत आणि धड काय बोलत आहेत ते शेवटपर्यंत कळू शकले नाही. >>>>> + १००००००

क्रिकेट, किंवा इतरही खेळांच्या, प्रक्षेपणात येणार्या जाहिराती ह्याच मूळात रसभंग करणारयाच असतात पण नाईलाजाने सहन कराव्या लागतात ! मागे एका खुल्या चर्चेत मीं सुरेश सरैयाना विचारलं होतं, ' निदान, सामन्याच्या आत्यंतिक उत्कंठा असलेल्या भागात 4-5 षटकं जाहिराती न दाखवण्याची तरतूद काँट्रॅक्टमधे करायला काय हरकत आहे ?' त्यावर त्यानी हंसून तें शक्य नसल्याचं सांगितलं. नंतर, खाजगीत ते मला महणाले, ' भाऊ, टीव्हीवर कळतं तरी. पण मीं रेडिओवर काॅमेंटरी करताना षटकाचे पहिले दोन-तीन चेंडू बाॅकसमधे माझी काॅमेंटरी सुरूं असायची तरीही प्रक्षेपण मात्र जाहिरातींचंच चालू असायचं !!

हो त्या CRED च्या जाहीराती शॉट आहेत डोक्याला. त्यातही गडबड गोंधळ मोठा आवाज असेल तर हा त्रास दरवेळी इरीटेट करतो.
त्यात आणखी वेगळे टेंशन हे की पोरांनी विचारले बाबा हि कसली अ‍ॅड आहे तर त्यांना काय सांगायचे? आधीच आपल्याला शष्प कळलेले नसते. उगाच अज्ञान उघड होते.

त्या व्हाईट हॅट ज्युनिअर वर तर केस टाकायला हवी. त्या बायजुस फायजुसवर सुद्धा. बघू नका त्यात आमीर वा शाहरूख आहेत. टाका केस. ईथे पोरगी बोलते की शाळा करायची गरज नाही, मला हे अ‍ॅप डाऊनलोड करून द्या किंवा या क्लासेसना घाला, मी ईथे शिकते. अर्थात यात तिचीही चूक नाही. सध्या शाळाही तश्याच ऑनलाईन झाल्याने तिला दोन्हीतला फरक समजवणे अवघडच

मला सध्या या आयपीएलमधीच एकच जाहिरात आवडली. ती टीशर्टची मोठी ऑर्डर आल्यावर ती बाई त्या माणसाला बोलते, पता नही कैसे, पर ईस साल कुछ तो अच्छा होना था.. फार गोड हसते आणि त्या माणसचाही चेहरा बोलका.. बॅकग्राऊंड म्युजिकही छान आहे Happy

"क्वालिफाय झाला नाहीत तर CRED च्या जाहिराती बघाव्या लागतील" अशी धमकी कोच ने दिली असती तर CSK आणि RR सुद्धा अजून चांगले खेळले असते

आजकाल युट्युबवर झोमॅटोने अगदी वीट आणला आहे.एखादे सुरेल गाणे चालू असताना मध्येच यांची जाहीरात लागुन रसभंग करतात.पुर्वी काही व्हिडियोलाच जाहीराती असायच्या आता प्रत्येक ठिकाणी जाहिरात दाखवून वीट आणतात.

HD चॅनेल असेल तर जाहिराती नसतात ना मॅच मध्ये .
बाकी ते अनिल कपूर आणि माधुरी का नाचत होते मलाही कळालं नाही Happy

आयपीएल आणि झूझू च्या सुरवातीच्या जाहिराती खूपच मस्त होत्या, वाजले कि बारा वर नाचणारा झूझू

@ श्रद्धा - HD नवीन आलं होतं तेव्हा जाहिराती HD फॉरमॅट मध्ये नसल्याने दिसायच्या नाहीत. ते सुख क्षणभंगुर ठरलं. आता HD वर नॉर्मल चॅनेल प्रमाणेच जाहिराती असतात .

@ ऋन्मेऽऽष - चुरगळलेला टीशर्ट, केसांची पोनी घातलेला Byju वाला शाहरुख डोक्यात जातो. सुदैवाने सलमान ची एकही जाहिरात नाही ते बाकी बरंय.

मैगी बैन झाले आणि वापसीनंतर, 'मा के प्यार जैसा मैगी' ने जी परत सुरुवात केली.तसेच 'मा माने डेटॉल का धुला'.
ऑल आउट ची जाहिरात, 'टफ होना जरूरी है'.
मॉम्स मैजिक बिस्कीट..यावरुन आई भोळी असते हे दाखवायचं असतं कि काय माहीत नाही.
तसेच पिझ्झा ,पास्ता,चोकोज,किन्डर जॉय,कैडबरीज या जाहिरातींचे दुष्परिणाम म्हणजे,मुलांना तोच खाऊ हवा असतो.
माझी अडीच वर्षाची मुलगी पिझ्झा खायला नाचत असते आणि तेच घरचे जेवण खायला ना करतात.

आवडला विषय! आयपीएल बघत नाही पण एकंदरीत खूप जाहिराती सुमार असतात टीव्हीवरच्या. आणि इतक्या वेळा लागतात की जरा बऱ्या असल्या तरी बोअरच होतात.

@वावे - खरंय. प्रयोजकांच्या जाहिरातींचा इतका भडीमार होतो कि बऱ्या असल्या तरी लवकरच कंटाळवाण्या होतात.

सलमान ची आहे की ती दलबदलू ad

आधी thumbs up करायचा आता पेप्सी विकतो

Dream11 च्या नाही गेल्या डोक्यात... बऱ्या होत्या

शाहरुखला बघून किळस येतो बायजू च्या ad मध्ये

Mutual fund ऐवढे सही आहेत तर जाहिरातींचा इतका भडीमार कशासाठी?

Bornvita ची आई मुलाची ad irritatating आहे

रच्याकने अमिताभ आणि त्या नोवेल कोरोना बाईने तर अतिशयोक्ती केली आहे.... प्रत्येक call वर ऐकल्याने कान पकले आता

प्लेअर्सच्या गल्ली क्रिकेटच्या मस्त होत्या...
ईतना फास्ट नही चलता बूम बूम.. तेरा मिनी ओवर...
भाई हात को लगता तो वो देता.. नही लगा तो तू देगा..

शाहरुखला बघून किळस येतो बायजू च्या ad मध्ये
>>>>
+७८६ मलाही
एकदा नेहा धुपिया म्हणालेली
ईण्डस्ट्री मे सिर्फ दो चीजे बिकती है.. सेक्स ऑर शाहरूख !
त्यामुळे शाहरूखला वापरून हल्ली काहीही विकायचा प्रयत्न चालतो

हां, त्याच ड्रीम 11 च्या ads
हाथ लगा, वन टीप वन hand
सगळ्याच़ छान

Thumps up ने सल्लू ला replace केला रणवीर सिंह ने पण बाकी जाहिरातीच्या पॅटर्न मध्ये toch फालतूपणा आहे
थोडक्यात नई ' बोटल' मे पुराना माल

छान लिहिलंय.
मला अजूनही कळलेलं नाही ते क्रेड म्हणजे नक्की काय उपयोगी app आहे?

पूर्वी फार कमी लोक मीडियात करियर करायला जायचे. हल्ली मास कॉम ,मीडिया मेनस्ट्रीम झालाय आणि म्हणून दर्जा खालावला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

मला अजूनही कळलेलं नाही ते क्रेड म्हणजे नक्की काय उपयोगी app आहे?

CRED हे एक credit card वापरणाऱ्यांसाठीचे app आहे, ज्यात आपले Credit cards लिंक केले की त्याचे बिल किती आहे, कधी भरायचे आहे त्याचे notifications मिळतात. आपण CRED app मधूनच क्रेडीट कार्ड बिल भरू शकतो. त्यातूनच बिल भरले की काही points मिळतात, जे redeem करून आपण cashback किंवा discount मिळवू शकतो. पण एक महत्वाचे, जर आपला CIBIL score ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच CRED account उघडता येते.

-: ही जाहिरात नाही! :-

मधे कुठेतरी हेमा मालिनीचा फॅमिली फोटो पाहिला व त्यात कुठे ' केंट वाॅटर पयुरिफायर' दिसला नाहीं म्हणून खूपच नवल वाटलं ! Wink

CRED ही काय भानगड आहे?

सध्या IPL च्या दरम्यान येणाऱ्या CRED च्या अत्यंत थुकराट जाहिराती बघून तुम्ही बेक्कार पकला असाल, अन ही नेमकी काय भानगड आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढे वाचा!

CRED हे आपल्या क्रेडिट कार्डांच्या outstanding balance च्या म्हणजे कार्डावर देय असलेल्या रकमेच्या पेमेंटची सुविधा देणारं ऍप आहे. आता आपल्या क्रेडिट कार्डाला देय असलेली रक्कम आपण थेट त्यांना चेकने किंवा ऑनलाईन देऊ शकतो, मग हे ऍप का वापरायचं? तर हे ऍप वापरून आपण रक्कम भरली तर ते आपल्याला काही पाँइंट्स देतात, ते वापरून आपण त्यांच्याच मार्केटप्लेसवरून डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकतो.

हे सगळं करण्यात CRED चा काय फायदा? ते का करतायत हे सगळं. आय मीन मी (म्हणजे उदा. हपापाने) क्रेडिट कार्डला (म्हणजे उदा. गपापाला) देय असलेले पैसे भरले तर क्रेड मला का बोनस देतंय? हपापाचा माल गपापाला गेल्यावर क्रेडला का आनंद होतोय?

तर सध्या हे करण्यात क्रेडला काहीही फायदा होत नाहीये, उलट ते भरपूर पैसे उधळत आहेत. या वर्षात जाहोराती आणि इतर खर्च पकडून त्यांनी तब्बल ६४ कोटी रुपये उधळले आहेत. मग ते हे सगळं का करत आहेत?

तर ज्यांच्याजवळ क्रेडीट कार्डे आहेत अन जे क्रेडिट कार्डांद्वारे खर्च करतात अशा लोकांचा प्रचंड मोठा डेटाबेस आणि कम्युमिटी तयार करण्याचा त्यांचा विचार आहे असं दिसतंय. सध्या त्यांचे तीसेक लाख युजर्स आहेत, त्यांना तीन-चार कोटी लोकांचा असा डेटाबेस तयार करायचा आहे. तो तयार करण्यासाठी ते अमाप पैसे उधळत आहेत.

एकदा हा डेटाबेस, ही कम्युनिटी तयार झाली की ते पुढील पद्धतीने पैसे कमावू शकतील:

१. आपल्या जवळ तयार झालेला 'कोण, किती, कसं, कुठे, कधी खर्च करतं' हा डेटा विकणे
२. ह्या कम्युनिटीला विकता येतील अशी प्रॉडक्ट्स आपल्या ऍपमध्ये दाखवणे वर त्या विक्रीवर कमिशन घेणे
आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे,
३. आपण आपले क्रेडिट कार्ड ड्यूज वेळेत भरावेत म्हणून आपल्याला स्वस्तात कर्जे (line of credit) उपलब्ध करून देणं. (याविषयी वेगळी सविस्तर पोस्ट लिहावी लागेल)

ते करतायत ह्यात गैर, चुकीचं, बेकायदेशीर काहीही नाही. बाजारात एक मोठी संधी दिसत आहे त्याचा ते नव्या पद्धतीने फायदा घेत आहेत.

मात्र क्रेडीट कार्डे असोत वा क्रेड ह्यांच्या आपल्याला कळत नकळत कर्जे देऊन अफाट खर्च करायला लावण्याच्या आणि नंतर त्या कर्जांच्या सापळ्यात अडकवण्याच्या खेळींना बळी पडायचं का नाही हे ठरवणं आपल्या हातात आहे.

तर क्रेड ही नव्या युगाची नवी ऍप बेस्ड सावकारी बनेल अशी लक्षणं दिसतायत.

सावध रहा!!

(बाकी माझे अत्यंत लाडके असलेले माधुरी दिक्षित आणि अनील कपूर ह्यांच्याकडून काहीतरी भंगार काम करून घेतलंय म्हणून क्रेडच्या जाहिराती मला आवडत नाहीच. पण तो वेगळा विषय आहे!)

पोस्टलेखक - प्रसाद शिरगावकर

(माझा नाट्यलेखनातला गुरू Girish Jayant Joshi ह्याने फोन करून क्रेड विषयी अनंत प्रश्न विचारले म्हणून जरा शोधाशोध करून ही पोस्ट लिहिली!)

शाहरुखला बघून किळस येतो बायजू च्या ad मध्ये
>>>>
+७८६ मलाही>>>>>

हे काय वाचलं मी Happy
आयडी बदलायचा राहिला की राव, चुकून ओरिजनल आयडीने पोस्ट झालं का?

जाई पैसे कमवण्यासाठी आजुन एक मुद्दा

एकदा का डेटाबेस तयार झाला की CRED ला विकुन टाकणे.

ह्या कंपनीच्या मालकाची frecharge नावाची मोबाईल चार्ज करण्याची कंपनी होती ती त्याने snapdeal ला ही कंपनी ४० मिलियन डॉलर (३०० कोटी) ला विकली. त्यामुळे snapdeal ला सगळा डेटा मिळाला . संदर्भ. : moneycontrol.

सध्या जरी ही कंपनी काहीही कमवत नसेल तरी एकदा का डेटा बेस तयार झाला की एका दमात सगळे पैसे मिळतिल.

म्युचल फंड कही आहे चे पण असे आहे. स्टॉक मार्केट कुठेही जाउदे . त्याचे कमिशन तर मिळणार .

म्यूचुअल फंड आणि फुकट पैसे मिळणे ह्यात लोकाचा interest असल्याने ह्या जाहिरतीचा भडिमार होत आहे.

@जाई - क्रेड पोस्ट बद्दल धन्यवाद. मी देखील प्रसादच्या फेसबुकवर वाचली होती.

@भाऊ नमसकर- मधे कुठेतरी हेमा मालिनीचा फॅमिली फोटो पाहिला व त्यात कुठे ' केंट वाॅटर पयुरिफायर' दिसला नाहीं म्हणून खूपच नवल वाटलं !>>>>> कृत्रिम चेहरा आणि ऍक्टिंग बघवत नाही आता. पण तिच्या मुलींपेक्षा अजूनही बरी दिसते.

Pages