Submitted by सुप्रिया जाधव. on 15 October, 2020 - 03:31
पारदर्शी बाटलीत
बूच घट्ट लावून
कोंबलेल्या
मांत्रिकाच्या भुतांप्रमाणे
अवस्था झालीय मनातल्या विचारांची !
धडका मारूनही
बाहेर पडू शकत नाहीत
आतमधे स्वस्थपणे नांदूही शकत नाहीत !
अस्तित्व दाखवता येत नाही
स्वतःपासून पळताही येत नाही
विचारांचा ताबा घेणारा
पश्चात्तापाचा दुष्ट मांत्रिक
फार फार क्रूर असतो हेच खरं !!
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटच्या 4 ओळी मस्त !
शेवटच्या 4 ओळी मस्त !
धन्यवाद नादिशा
धन्यवाद नादिशा
सुंदर रचना...
सुंदर रचना...
नेहमीप्रमाणे सुंदर काव्यरचना.
नेहमीप्रमाणे सुंदर काव्यरचना..
वाह! आशयच सुंदर आणि मांडणी
वाह! आशयच सुंदर आणि मांडणी सुद्धा अचूक!
क्या बात है!!