डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई व्हायचं की नाही हा क्युरिऑसिटीतून काढलेला धागा होता .. त्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध नाही . आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त स्त्रियांना त्यांचा या बाबतीतला अनुभव विचारणारा एकही धागा आधी निघालेला नाही , त्यामुळे तोच तोच विषय कसा ....

नालायक अपत्य असण्याचं गिल्ट नको आहे .. जी एक गोष्ट करायची अजिबात क्षमता नाही तीच कर्तव्य म्हणून वाट्याला आली आणि जमली नाही तर भयंकर गिल्ट वाटणार आहे .. लोक वाईट म्हणतील ते निराळंच की काय ही वडलांची सेवा करत नाही .>>>>

वडील आजारी आहेत का किंवा आजारी पडणार ही लक्षणे आहेत का? की आजारी पडले तर मला सेवा करावी लागेल .... हा विचार नैराश्य देतोय???

Yancha adhicha lekh depression Ani atacha yacha mdhe khup tafavat aahe ...tya lekha baddl aalelya comment Ani aatacha comments yat suddha difference ahe ... So aadhi yacha shodh ghya .. ki nakki kahi issue ahe ki asch charchela visay deun ... Madam gelya varg sodun ...

अहो radhanisha , लोकांच्या एक्स्पेक्टेशन साठी जगाल तर वाईट अवस्था होईल... स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगाल तर कायम आनंदी रहाल.

आजारी नाहीत , बरे आहेत ... सेवा करावी लागणार ह्याची नाही , सेवा जमणार नाही ह्याची भिती वाटते .

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...>>>>

सॉरी, पण असे प्रत्यक्षात होत नाही.

(हे प्रमोशन नाही)
मनःशक्ती ची प्रकाश प्रार्थना आणि हवन प्रार्थना नक्की ऐका.
श्रीनिवास ठाणेदार यांचं ही श्री ची इच्छा पुस्तक नक्की वाचा
पु ल देशपांडे यांचं काय वाटेल ते होईल पुस्तक नक्की वाचा.
फ्रेंडस आणि किम्स कन्व्हिनियन्स नक्की पहा
हे फिक्स नाहीत. पण फिक्स मिळेपर्यंत मदत नक्की होईल.

सेवा करावी लागणार ह्याची नाही , सेवा जमणार नाही ह्याची भिती वाटते>>>

मग जे अजून घडलेच नाहीये किंवा घडेलच याचीही शाश्वती नाहीये ते कल्पनेत घडवून त्याची काळजी करायची हा रिकामपणाचा खेळ का बरे खेळावा?? हे मानसिक अनारोग्याचे द्योतक आहे का कसे हे मला माहित नाही पण हातात काही काम घेतलेत तर हे प्रकार बंद होतील हे निश्चित.

असो. तुम्ही सल्ला घेत आहातच. तुम्हाला सुखी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा!!

आताच्या इंटरनेट युगात माहितीचा साठा आपल्यावर आदळत असतो तेव्हा आपण सोप्या गोष्टी किचकट(complicated) करतो.

जे तुमच्या हातात नाही त्याचा जास्त विचार करू नका, जे तुमच्या हातात आहे(जे तुम्हाला शक्य आहे) ते १००% मन लावून करा.

आपल्या हातून चुका होतील म्हणून घाबरु नका व प्रत्येक चुकीतून बोध घ्या,
आणि लोक काय म्हणतील याचा विचार तर अजिबात करू नका.

एक समजत नाही - Caregiving व आनुषंगिक भाव-भावनांचीची भीती वाटते तर थेट तोच धागा काढायचा ना. आहे सांभाळणे कठीण, पडते बाईवर अशी मुलांची-पालकांची जबाबदारी. नाही जमत प्रत्येकीला. वहिन्या-जावा-नणंदा व त्यांचे शेजारी व त्यांचे कुत्र ही बोलतात आपल्याला. देवानं दोन कान तेवढ्यासाठीच दिले आहेत. जमेल ते करायचं. बाकी दुसर्‍या कानाने बाहेर... म्हणून मरणावर कशाला धागे काढायचे... खोदा पहाड, निकला चूहा...
फालतूच मला अ‍ॅडमिनसाठी भूपाळी गायला लावली.

उर्मिला म्हात्रे +१
माबोवरची बरीच मंडळी कायम रोमात का असतात हे आता थोडंफार कळायला लागलंय.

राधानिशा तुम्ही overthinking करता असं वाटतंय.स्पष्ट शब्दातच सांगते. रागावू नका.
लोक काय म्हणतील याचा विचार करू नका.

आज प्रोडक्शन आहे अन मला कसंतरीच होतंय.. काहीच करावसं वाटत नाही.. असं उगीच नॉन्प्रॉडक्टीवपणे वाट बघत किती उशीर थांबावं लागणार (घरातच..!) हा प्रश्न खायला उठलाय.. सगळं सोडुन नवीन स्प्रिंट कधी सुरु होइल असे विचार मनात येत आहेत..

राधानिशा,
पहिला प्रतिसाद सायकॅट्रिकच्या दवाखान्यात बसून लिहिला होता. आजच्या सेशन नंतर बरं वाटलं तेंव्हा आताचा प्रतिसाद लिहितेय.
डिप्रेशन फार मोठा आजार आहे. त्यावर ट्रीटमेंट ही घेतलीच पाहिजे. क्युअर होईला किती वेळ लागेल ते आजार किती मोठा आहे त्यावर अवलंबून आहे पण पेशन्स ठेवावेच लागणार. Result नक्की मिळेल.
स्वतः बद्दलच 'स्वार्थी आहे, जबाबदारी नको' इत्यादी वाटणं हे आपली जडण घडण कशी आहे यावरही अवलंबून असतं पण खरंच सांगते वेळ पडली की सगळं निभावून नेता येतं. आणि कुठे तरी आपण जबाबदारी नकोच हे ठासून म्हणत राहिलं की ती पडतही नाही. सुप्त मन आपली इच्छा पूर्ण करतंच. स्वानुभवातून सांगतेय.
सध्या बाकी सगळे विचार बाजूला ठेवून हे सांगत राहा की मी ठरवलं तर मला जे नकोय ते करावं लागणार नाही. एकदा ते साध्य झालं की पुढची स्टेप म्हणजे पोजिटिव्ह थिंकिंग पण तिथे पर्यंत पोहचायला वेळ लागणार. असू देत!
खरंच औषध घ्याच.. आहे तेवढं आयुष्य आनंदाने जगणं हा आपला हक्क आहे.
ते जगताना छोटं छोटं ध्येय ठेवा आणि त्यावरच फोकस करा. पुढचा विचार अजिबातच नको.
ज्यांनी फक्त डिप्रेशन असलेली माणसं पहिली आहेत त्यांना हे सगळं नाही कळणार. जो यातून जातोय तो रिलेट करू शकेल. तेंव्हा सगळ्या प्रतिसादातून तुम्हाला हवंय ती पॉजिटीव गोष्ट फिल्टर करून घ्या, बाकीचं सगळं इग्नोरा.

बाकी कोणाला कितीही निगेटिव्ह वाटो, अंतिम सत्य हेच आहे की आपली वेळ आली की आपल्याला जावं लागणार आणि वेळ येत नाही तोपर्यंत आहे तसं जगावंच लागणार तर आहे तेवढं आयुष्य चांगलं आनंदात जगुयात. काय म्हणता ?

कोणी तरी कुठे तरी माझा प्रतिसाद कोट करून तो न आवडल्या बद्दल लिहिलेलंही मगाशी ओझरतं वाचलं तर त्यांना आणि त्यांच्यासारखा विचार करणाऱ्या प्रत्येकाला एकच सांगेन Do not judge , Please!

जी , तुझे प्रतिसाद आवडले पण आचरणात आणता येणं महा मुश्किल आहे. पण मी नक्की प्रयत्न करेन आणि कधी ना कधी तिथं पर्यंत पोहचेनच <3

{आजारी नाहीत , बरे आहेत ... सेवा करावी लागणार ह्याची नाही , सेवा जमणार नाही ह्याची भिती वाटते }
कितपत जमेल अशी भीती मलाही वाटायची.
वेळ आली तेव्हा निभावून नेता आलं.
मदतही मिळाली.
असं वाटण्यात काही वावगं नाही. पण त्याबद्दल फार विचार करू नये.

रिया, बिग हग! तुझ्या पहिल्या प्रतिसादात तुच positive thinking विषयी लिहिलंयस ना! मग तुझ्या दुसर्‍या प्रतिसादाचा शेवट सकारात्मक कर ना! For me, for you! Positive affirmations देत राहूयात Happy
मला असं काहीसं वाचायला आवडेल -
जी , तुझे प्रतिसाद आवडले पण आचरणात आणता येणं महा मुश्किल आहे. पण मी प्रयत्न करेन!

जगण्यात एक प्रचंड अ‍ॅडव्हान्टेज आहे. जगणारा माणुस कधी पण मरु शकतो पण मरणारा कधी पण जिवंत होउ शकत नाही.

ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली व 21 व्या वर्षी आपले विहित कार्य समाप्त झाले आहे असे समजून समाधी घेतली.
>>
त्या काळात कोणी मोठा माणुस निर्वतला की समाधी घेतली असेच म्हणत. खरा मृत्यु कुठे रेकॉर्ड आहे का?
ज्ञानेश्वरी आणि चांगदेव पासष्ठी कमित कमी २० वेळा नीट वाचुन काढली आहे यामुळे नक्की सांगते की यात कुठे ही डिप्रेशन दिसत नाही.
मुक्ताबाईने समजावले त्यावेळी कदाचित आले असेल पण ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळी नक्की नव्हते.

तुम्ही जर लेटेस्ट आयटीबी थियरी ऑफ कॉन्शस युनिव्हर्स वाचली तर ती डिरेक्टली चांगदेव पासष्ठी वरुन घेतलेली वाटते.
याबद्दल कोणी लिहित नाही हे सर्प्रायझिंग आहे.

काही रेफरन्सेस

https://www.pbs.org/video/does-consciousness-influence-quantum-mechanics...

https://www.youtube.com/watch?v=Jo-ZT8HS9Hk

https://www.amazon.com/Case-Against-Reality-Evolution-Truth/dp/039325469...

https://www.youtube.com/watch?v=-bAHZlEhefw

पहिलं खमकं होतं म्हणून अधिक आली नाहीत...>> Rofl Rofl
मग जे अजून घडलेच नाहीये किंवा घडेलच याचीही शाश्वती नाहीये ते कल्पनेत घडवून त्याची काळजी करायची हा रिकामपणाचा खेळ का बरे खेळावा??>>>+१
आजारी नाहीत , बरे आहेत ... सेवा करावी लागणार ह्याची नाही , सेवा जमणार नाही ह्याची भिती वाटते .>>> असे तुम्हाला वाटते, प्रत्यक्षात वेळ आल्यावर आपण तसेच वागतो असे नाही. आणि स्वत:ला तरी कशाला रोग व्हावा? म्हणजे आपण बेड वर पडून रहायचे, दुसऱ्याकडून सेवा करून घ्यायची हे तरी कशाला हवे आहे?
असे वाईट विचारांचे स्वप्नरंजन करण्यापेक्षा मागच्या पानावर जिज्ञासा यांनी दिलेली यादी वाचा त्यावर विचार करा.

ते पण नको आहे हो .... उरलेली वर्षं शांतपणेच जायला हवी आहेत दोघांची .. पण आजार होणारच असं जर कुठे इनएविटेबल असेल नियतीत तर फक्त तो त्यांना नको मला होऊ दे असं नियतीला म्हणते कारण सेवाकर्त्याची भूमिका मला जमणारी नाही ... it's selfish ..

कोणालाच काही होणार नसेल तर छानच की .. विनाकारण मला आजारी पाड असं कोण का मागेल ..

सेल्फलेस डीड नसतं असं कोण त्या आपल्या ह्यांनी म्हणून ठेवलंच आहे!
सेल्फलेस लोकं ह-म-खा-स भोंदू असतात. मला स्वार्थी लोकांवर भरवसा वाटतो.

पण आजार होणारच असं जर कुठे इनएविटेबल असेल नियतीत तर फक्त तो त्यांना नको मला होऊ दे असं नियतीला म्हणते कारण सेवाकर्त्याची भूमिका मला जमणारी नाही ... it's selfish ..>> जर कल्पनाच करायची आहे तर मग त्यात inevitability कशाला आणायची. Why not imagine that your entire family will have a happy healthy life! वचने किम् दरिद्रताम्! जसे आपले राजकारणी वचने देण्यात कद्रूपणा करत नाहीत तसेच आपणही सर्व छान घडेल असेच म्हणावे. जर कधी या विचारांच्या downward spiral मध्ये अडकल्याचे लक्षात आले तर लगेच उलट विचार करून बघावा.
थोडी डॉक्टरांची मदत, थोडी औषधांची मदत, थोडी घरचे, मित्र मैत्रिणी यांची मदत आणि last but not the least स्वतःला मदत असे सगळे घेऊन यातून बाहेर यायचे आहे. यात जितकी स्वतः स्वतःला मदत कराल तितका बाकीच्या मदतीचा अधिक उपयोग होईल. असे विचार येतातच. That's okay. पण जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्या विचारांना सगळं चांगलं होईल या दिशेने वळवता येतंय का ते बघा.

Pages