डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो जिज्ञासा........ तुम्ही म्हणता तेही खरंच. पण घाटपांडेंची प्रतिक्रिया वाचुन मला असं सहज वाटलं की हे असंही असु शकतं. तोपर्यंत हा विचार माझ्या मनाला शिवलाही नव्हता.

उलट घोर डिप्रेशन आल्यावर भिंत चालल्या सारखे वाटणे किंवा रेड्याच्या रेकण्यात वेद ऐकु येणे अशी लक्षणे दिसु शकत असतील.>>>> डीजे हे illusions चा भाग असू शकतो पण डिप्रेशन मधे असे इल्युजन्स होतात का हे सायकियाट्रिस्ट सांगू शकतील. दुसरा मुद्दा येतो की ज्ञानेश्वरांच्या साहित्यात असे काही संकेत दिसतात का? ते पुन्हा इंटरप्रिटेशनवर अवलंबून आहे. आत्महत्येची प्रवृत्ती हे कमकुवतपणाच लक्षण आहे असा एक गैरसमज समाजात आहे. त्यामुळे त्याला प्रतिष्ठा नाही. अनेक थोरामोठ्यांच्या आत्महत्येबद्द्ल मग मौन राखले जाते. उदा. साने गुरुजी. पण निहिलिझम वा निरर्थकतावाद या तात्विक संकल्पनेतून देखील ही प्रेरणा येवू शकते.
https://en.wikipedia.org/wiki/Nihilism

जगायची ही सक्ती आहे या मंगला आठलेकर यांच्या पुस्तकात अशा अनेक संकल्पनेचा उहापोह आहे.

सुशांत झाला आता ज्ञानेश्वरांवर चालू द्या केस. टीआरपी ची सोय होईल वर्षभर.

पण भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद हे सगळे इतरांना देखील दिसलेले चमत्कार आहेत ना? मग ते केवळ ज्ञानेश्वरांचे भ्रम असे कसे म्हणता येईल? माझ्यासाठी या गोष्टी घडल्या किंवा नाही हे गौण आहे. या अफवा पण असू शकतात.
प्रकाश सर, तुमच्या मते इच्छामरण आणि आत्महत्या एकच आहे का? मला वाटतं की दोन्हीत फरक आहे. आत्महत्या हा मानसिक संतुलन ठिक नसताना घेतलेला निर्णय असतो पण इच्छामरण हे माणूस मानसिकदृष्टय़ा सक्षम आणि निरोगी असताना घेतलेला निर्णय असतो (असला पाहिजे). We shouldn't be mixing these up.

सुशांत झाला आता ज्ञानेश्वरांवर चालू द्या केस. टीआरपी ची सोय होईल वर्षभर > Wink

चालवली, रेड्याच्या मुखातून वेद हे सगळे इतरांना देखील दिसलेले चमत्कार आहेत ना?>>
१. आता ज्ञानेश्वरांना कोण प्रतिप्रश्न विचारणार...
२. ते म्हणाले भिंत चालली तर चाललीच म्हणायचे.. रेड्याने वेद म्हटला तर म्हटलाच म्हणायचे असे उपस्थितांना वाटले नसेल कशावरुन..?
३. एखाद्याच्या डिप्रेशनचा इतरांवर प्रभाव पडु शकतो का..?
४. भिंत चालवली किंवा रेड्याने वेद म्हटले हे प्रकरण ईतर कुणाच्या डिप्रेशनचे पीक तर नसावे ना..?

मलाही असेच वाटते. आयुष्य म्हणजे एक शिक्षा आहे असेच वाटत रहाते.
मला असे वाटते भित्रा स्वभाव असेल तर मनाच्या कोपर्यात आयुष्यातली साधी आव्हानेही खुप मोठी वाटतात व त्यांच्याशी झगडताना माणुस थकून जातो ,लिटरली एक्झॉस्ट होतो.त्यातून नैराश्य येते.
डिप्रेशन म्हणजे मन भितीच्या सावटाखाली सतत असणे.यातून सुटकेचा मार्ग आहे पण खुप ट्रिटमेंट घ्यायला लागेल. लोक आनंदी असतात कारण ते भित्रे नसतात.अतिविचार करत नाहीत .
अति नकारात्मक विचार ==>सततची भीती==> मानसिक थकवा==>जगण्याची ईच्छा कमी होणे==> नैराश्य

ज्या प्रमाणे लोक अगदी जुन्या संतांंपासून ते गजानन महाराज / साईबाबा /सत्य साईबाबा ( ते हयात नसतानाही जाणवलेले चमत्कार) / इव्हन श्री श्री रविशंकर यांच्या बद्दलचे चमत्कार छातीठोक पणे सांगतात ते बघता भिंत चालवणे, रेड्याच्या तोंडून वेद हे लोकांनी सांगितलेले चमत्कार अधिक वाटतात.

उलट घोर डिप्रेशन आल्यावर भिंत चालल्या सारखे वाटणे किंवा रेड्याच्या रेकण्यात वेद ऐकु येणे अशी लक्षणे दिसु शकत असतील.>>>> Sad कुणी म्हणालं असतं ज्ञानेश्वर आद्य रोबॉटिक्स इंजिनीयर व न्यूरोसायंटीस्ट होते - सेल्फ ड्रायव्हिंग भिंत, जेनेटीकली मोडिफाईड रेडे, मेल्स विथ हॉट फ्लॅशेस (मांडे भाजण्यासाठी) असं काय काय शोधलं....ते जि म्हणते तसं दृष्टीकोनचा फरक हो...

बाकी अ‍ॅडमिन, धाग्याला टाळे लावायचे/उडवायचे मनावर घ्या. अस्थानी आत्महत्येला अवाजवी प्रतिष्ठा देणे सुरू आहे. हल्ली लोकांना हेल्पलाईन भरभर सापडत नाही तेव्हा असे विषय जरा जपून....

सर्वांना धन्यवाद ... हार्मोन्स , एनझाईम्स सगळं माहीत आहे .. तरी नशीब ब्रेकडाऊन्स थांबली आहेत , त्यात सगळीच एनर्जी जायची .. ती थांबल्यामुळेच जे काही एन्जॉय करणं मॅनेज करत आहे ते शक्य झालं आहे ... पण कधीकधी वाटतं आपण फक्त वेळ संपवत आहोत कसातरी .. this isn't by choice .. लादल्यासारखं वाटतं आयुष्य .. कधीकधी उत्साह असतो खूप , काहीतरी मिनिंगफुल करण्याचा आयुष्यात .. कधीकधी वाटतं काय फरक पडणार आहे काहीही केलं तरी .... सगळ्या फेजेस आहेत . आयुष्य वाईट नक्कीच नाही .. चाल्लं आहे .. जो वेळ छान जातो , तो जगत राहण्यासाठी ताकद देतो .. बाकी लॉंग टर्मचा किंवा आयुष्याचा परपज किंवा काय पदरात पडलं जन्माला येऊन किंवा was it worth it ? आजवर जो मिळाला तो आनंद - सुख आणि दुःख पारड्यात टाकलं तर कोणतं पारडं वर जाईल .. life was an imprisonment and I am seeking momentary pleasures in the prison and making it tolerable .. असले विचार थोडा त्रास देतात ..

खरंतर आयुष्य छोटं असावं असं मलाही कधीकधी वाटतं... Specially लग्न झाल्यापासून काय झालंय माहीत नाही पण मला सगळ्याच गोष्टींमध्ये अपयश येतंय.. लग्नाआधी मी शाळा, कॉलेज मध्ये अग्रेसर होती.. सतत फक्त यशच पाहिलं आहे.. आता मात्र फक्त अपयश पाहतेय...त्यामुळे कधीकधी खूप निराश वाटतं... पण याला depression म्हणतात हे माहीत नव्हतं...कदाचित मला येणारं depression mild आहे.. आणि ते विचार मी लगेच झटकून टाकू शकते किंवा दुसरं काही नवीन करण्याचा प्रयत्न करते... तरीही काही यशस्वी लोकांना पाहिलं की त्यांची स्वतःशी तुलना केली जाते मग पुन्हा वाईट वाटतं पण हेही माहीत असतं की त्या यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यातही काही ना काही दुःख असेलच... त्यापेक्षा आपण सुखी आहोत.. पण हे असं वाटण्याचं चक्रही सुरूच राहत.. क्या करे? दिल है की मानता ही नही... Happy

मला वाटते हे असले विचार येणे कॉमन असावे. आपण जगतोय का?, कश्यासाठी? कोणासाठी? वगैरे विचार अध्येमध्ये, त्या त्या क्षणी वा ठराविक काळापुरते प्रत्येकाच्याच मनात येत असावेत.

अगदी साधे आणि ईथलेच उदाहरण द्यायचे झाल्यास माझे आजवर ईथे ईतके धागे झालेत तरी आजही एखाद्या धाग्यावर प्रतिसाद नाही आले, लोकांनी पाठ फिरवली, कुठे माझे काही वागणे खटकून लोकांच्या टीकेच्या पोस्ट येऊ लागल्या तरी असे वाटते की आपण कोणालाच आवडत नाही, मग मायबोलीवर यायचे तरी कश्याला...
पण मग पुढचा एखादा लेख छान जमतो, धागा हिट जातो, वा सरळ लॉग आऊट करून पोराबाळांत रमतो आणि चटकन विचार बदलतात.

हेच प्रत्यक्ष जगण्याबाबतही होते, एखाद्या दिवशी घरातल्या जवळच्या व्यक्तींशी कलह होतो, मित्रांच्या ग्रूपमध्ये राडा होतो, ऑफिसात कलीग्सचे वाईट अनुभव येतातन्आणि तेवढ्यापुरते वाटते असे..

पण पुढचा चांगला अनुभव लगेच आपल्याला यातून बाहेर काढतो वा आधीचा कटू अनुभव विसरायला लावतो. मात्र जिथे कटू अनुभव वारंवार येतात अश्या जागेतून आपल्याला बाहेर पडता आले नाही तर मात्र नैराश्य डिप्रेशन फ्रस्टेशन वाढत जाण्याची शक्यता असते.

म्हणून जिथे मान सन्मान प्रेम मिळत नसेल अश्या जागी राहू नये फार काळ. मानसिक स्वास्थासाठी ते हानीकारक असते. माझ्यामुळे हि वेळ दुसरया कोणावर येऊ नये याचीही मी नेहमी काळजी घेतो. एखाद्यावर वैयक्तिक टिका करणे, अवहेलना वा साधे टोमणे मारणेही टाळतो.

लग्नानंतर आयुष्य फार बदलते.
स्पेशली पुरुषप्रधानसंस्कृतीतील स्त्रियांचे
त्यामुळे आपल्याच लग्नाआधीच्या आयुष्याशी कम्पेअर करूनही नैराश्य येत असावे बरेच जणांना वा जणींना.

रोज जसे जेवण घेतो तसे रोज थोडा थोडा आनंद घेतला पाहिजे. अन्नाप्रमाणे यातही कसदार आणि जंक फूड आहे. आयुष्याचा अर्थ वगैरे भानगडीत फार पडू नये. माणसाचा जन्म मिळालाय, आजच्या काळात बाकी प्राण्यांचे आयुष्य खडतर आहे. आपले आयुष्य फार सुखकर आहे तर त्याचा फायदा घेऊन ज्याची आवड आहे ज्याची पॅशन आहे असे काहीतरी शोधात राहिले पाहिजे. आणि काही सापडलं तर ते करत राहणे यातच आनंद आहे. हातातून नवनिर्मिती होत राहिली कि आपोआप बरे वाटते. काहीतरी करत राहण्यासारखे डिप्रेशन वर दुसरे जालीम औषध नाही.

औदासिन्य, विरक्ती, निरर्थकता, अनिच्छा या शब्दांच्या छटा तशा वेगवेगळ्या आहेत. 21 वर्षे हे काय आयुष्य संपवायच वय झालं का? असाही प्रश्न उपस्थित होउ शकतो? पण संजीवन समाधी याला एक वेगळीच अध्यात्मिक प्रतिष्ठा आहे. त्यात नैराश्याची छटा नाही. प्रत्यक्षात नैराश्य होते की नाही हे तपासण्याची सोय पण आता नाही. आपले विहित कार्य समाप्त झाले आहे असे समजून आपले आयुष्य आपण संपवण्याचा निर्णय घेणे यालाही एक तात्विक मूल्य आहे. जगण नकोस नाही पण पुरेसे झाले म्हणून स्वेच्छामरण पत्करणे यालाही एक तात्विक मूल्य आहे. जगण्याकडे पहाण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोण वेगवेगळे असू शकतात. तेच मृत्यु बाबत आहे.

मी येवढच म्हणेन

१. स्वतःसाठी जगता येत नसेल तर दुसर्‍यासाठी जगण्यामधे अर्थ सापडू शकतो.
२. स्वतःची तूलना दुसर्‍याबरोबर कधिही करू नका.
३. तुम्ही मानसोपचार तज्ञाची जरूर मदत घ्या.

मलाही माझं जगणं अर्थहीन वाटतं काही वेळा. नुसते प्रवाहाबरोबर चालले आहे असे वाटते. काही वर्षांपूर्वी पर्यंत हे खूप वेळा वाटायचे.
मग लक्षात घेतले की माझ्या आयुष्यात काही ध्येय नाहीये म्हणून असे असावे. पण ते नक्की काय आहे हे उमगत नाही.
असे असले तरी मनाला आशा आहे की एक दिवस मला नक्कीच उमगेल. तोपर्यंत मनात येणारे हे विचार त्रयस्थपणे बघायचे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करायचे.
खरंतर माझी एखाद्या कामात (वाचन, स्वयंपाक, ऑफिसचं काम, गायन, लेखन, रांगोळी, निवडणे इ. इ. काहीही) तंद्री लागली की वेळकाळाचे भान रहात नाही.

आता रेल्वे व हॉटेले सुरू झालीत... घराबाहेर एक racksack व त्यात फक्त आवश्यक तेवढे सामान घेऊन बाहेर पडा आणि नॉर्थ किंवा साऊथ कुठल्याही दिशेने unplanned प्रवास सुरु करा...रोजचा दिवस नवा असेल..मजा येईल..

कदाचित माझी जीवनेच्छा फार प्रखर आहे! मी कितीही वाईट मूडमध्ये किंवा भयानक परिस्थितीमधे असले तरी मला त्या वेळी बोअर, निराश वाटतं पण ते तात्पुरते. आयुष्याबद्दल मी नेहमीच आशावादी आहे! हे इतकं सुंदर आयुष्य संपवण्याचा विचार मी करूच शकत नाही. >>>>

जिज्ञासा, सहमत.... मला तर कधी वाटते आहे ते आयुष्य पुरणार आहे की नाही... मनाशी योजलेली कामे नीट मार्गी लागायला हवी, त्यासाठी वेळ पुरेल का असे वाटायला लागते Happy Happy

वरील लेखाशी सबंधित नाही पण, विषय निघाला आहे( आत्महत्या वगैरे वरम्हणून)
अवांतरः
ज्ञाशेश्वरा बद्दल बोलु शकत नाही. साने गुरुजींबद्दल बरीच माहिती वाचलेली.
घरात त्यांना( त्यांच्यातील त्यागवृतीला पुजणारे ) आजोबा होते. साने गुरुजी कथामाला सुद्धा आजोबा चालवत आणि आजोबा खुपच व्यथित झालेले साने गुरुजी गेले तेव्हा ( बाबांनी सांगितले).
त्यामुळे साने गुरुजींची आत्महत्या बद्दल माहिती, जेव्हा मी वाचली/ एकली तेव्हा माझं वय खुपच तरुण( लहान नाही) होते. तरीही बाबांनी, आत्महत्या वर केलेली चर्चा आठवली. कारण त्यांना मला नीट समजावून सांगायचे होते.
साने गुरुजींचे अतिशय संवेदनशील मन, त्यातून जगाला एकाच दृष्टीकोनातून ( जग सुंदर असावे, वगैरे) पाहणे मग त्यातून तसे पाहण्याची अपेक्षा फोल ठरणे, अति विचार करणे वगैरे वगैरे बरेच फॅक्टर होते.
आता, प्रत्येक आत्मह्त्या करण्याला वेगवेगळी परीमाणं लागू असु शकतात. काही वेळा, शारीरीक दृष्ट्याच तशी जडण असणे, शारीरीक संप्रेरकांचा अभाव( आनंदी खास करून) वगैरे असते.

लो थायरॉईड मध्ये, स्त्रीयांना कितीतरी अशी लक्षणं दिसतात, सारखं रडणं, मूड बदलणं वरचेवर, हताश असणं .. त्यामुळे योग्य सल्ला, मार्गदर्शन व उपचारांवर अवलंबून आहे.
विटॅमिन डी जरी, लो असेल तर होतं.

वैयक्तिक दृष्ट्या, मला तर अजुन सजणं/नटणं/ फिरणं करायला वेळ कमी पडतो. Proud
आणि, मला अजून कित्तीतरी देश बघायचे आहेत ...
हजारे ख्वायिशे ऐसी ... प्रकार आहे. ...
असोच.

प्रकाश सर, तुम्ही जे सांगताय त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि suicide आणि abatemen of suicide हे दोन्ही कायद्याने गुन्हे आहेत.
कोणत्याही प्रकारे अशा अनैसर्गिक मृत्यूचे समर्थन करणे विशेषतः एका पब्लिक फोरमवर मला योग्य वाटत नाही. याबाबत सी ने लिहिलेल्या पोस्ट्सशी मी सहमत आहे.
काही अत्यंत गुंतागुंतीच्या आजारांच्या बाबतीत इच्छामरणाचा विचार केला जातो हे मला माहीत आहे पण तो विषय इथे लागू होत नाही.

मलाही अजून बरेच देश बघायचे आहेत. आतापर्यंत दोनच बघितलेत. भारत आणि पाकिस्तान. बाकीचे कधी बघेन माहीत नाही. पण प्रश्न पडतो की नाहीच बघितले आणि मेलोच तसाच तर आयुष्य अपुरे राहील का? ते बघण्यासाठीच म्हणून रोजचे बाकीचे जगणे जगायचे आहे का?
मुले झाल्यावर मलाही वाटते की आता मुलांसाठी आपल्याला जगायला पाहिजे. त्यांचे योग्य पालनपोषण करणे आता आपली जबाबदारी आहे. पण मग कधी विचार येतो की ते आपले कर्तव्य आहे, ध्येय कसे असू शकते? आणि मेलोच फटकन तर काही त्यांचे आयुष्य थांबणार आहे का? ते चालू राहीलच निसर्ग नियमानुसार.. अब्जो पशूपक्षी, किडे-मुंग्या, जीवजंतू प्रजनन करतात आणि मरतात, कधी एवढा विचार करत नसतील जेवढे आपण माणसे करतो.
मुळात आयुष्याला काहीतरी ध्येय हवे हा हट्ट माणसाच्याच बुद्धीची उपज आहे की निसर्गातील बाकीचे जीवही असा विचार करत असतील?

स्वत:ला असे निसर्गातील एक सामान्य जीव समजले की विचारप्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होते. पण यापलीकडे आपली काही किंमत नाही यावर एकदा विश्वास ठेवला किंवा हे मान्य केले तर फार सोपे होते.

कोणत्याही प्रकारे अशा अनैसर्गिक मृत्यूचे समर्थन करणे विशेषतः एका पब्लिक फोरमवर मला योग्य वाटत नाही>>> मला चर्चा करणे अयोग्य वाटत नाही. विषय जीवन व मृत्यु या संबंधी आहे.जगण्याकडे पहाण्याचे प्रत्येकाचे दृष्टिकोण वेगवेगळे असू शकतात. तेच मृत्यु बाबत आहे. हे वर लिहिले आहेच

उलट घोर डिप्रेशन आल्यावर भिंत चालल्या सारखे वाटणे किंवा रेड्याच्या रेकण्यात वेद ऐकु येणे अशी लक्षणे दिसु शकत असतील.>>>>

भिंत चालताना व रेडा वेद बोलताना इतरांनी बघितले असणार ना?? मग डिप्रेशन नक्की कोणाला आलेले? ज्ञानेश्वरांना की ह्या घटना घडल्या त्या पाहणाऱ्यांना?

मी बालपणी संत ज्ञानेश्वर पाहिलेला त्यात भिंत सरकत निघालीय व त्यावर 4 भावंडे बसलीत असा एक सिन होता. रेड्याच्या सिनमध्ये तो देवळासमोर की कुठे उभा असतो व एक दोन ओळी म्हणतो. दोन्ही सिनमध्ये भरपूर पब्लिक आजूबाजूला दाखवलंय.

https://youtu.be/1Qs0Z6CecBg

https://youtu.be/o_htgyaYZgs

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही>>>> राधानिशा सध्या एक प्रोजेक्ट हातात घ्या. जे माहीत नाही ते माहिती करुन घेण्याचा. सायकियाट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट यांच्या शी चर्चा करा. ती ही माणसेच असतात. त्यांच्या अप्रोच मधेही मतभिन्नता दिसेल. पण तो ही एक माहितीचाच मार्ग आहे.

Pages