पेप्पर रस्सम

Submitted by mrunali.samad on 19 August, 2020 - 08:43
paper rassam
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1. चिंच ( छोट्या लिंबाएवढी)
2. २ टोमॅटो
3. १/४ छोटा चमचा मेथी दाणे
4. कडीपत्ता
5. २ लाल सुक्या मिरच्या
6. 12-15 लसूण पाकळ्या(ठेचून)
7. मोहरी
8. हळद
9. हिंग
10. अर्धा छोटा चमचा काळी मीरे पावडर
11. अर्धा छोटा चमचा जिरं पावडर
12.कोथिंबीर.
13.तेल
14.मीठ

क्रमवार पाककृती: 

प्रत्येकाची रस्सम पद्धत वेगळी असू शकते.
माझी पद्धत माझ्या माहेरी हिट आणि सासरी सुपरहिट आहे. Happy
●पातेल्यात पाऊण ग्लास पाणी ,दोन टोमॅटो फोडी करून, चिंच आणि मेथी दाणे टाकून दहा मिनिटे उकळून घ्या.
●हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या.
●पातेले गैस स्टोव्हवर ठेवून गैस चालू करा.
●पातेल्यात अर्धा छोटा चमचा तेल टाका.
●तेल तापल्यावर मोहरी, ठेचलेला लसूण, कडीपत्ता, हळद,हिंग,सुक्या मिरच्या, जिरे पावडर,पेप्पर पावडर टाका.
●लगेच वर गाळलेले चिंच टोमॅटो चे पाणी टाका.
●हवे तितके पाणी टाका.
●मिठ आणि कोथिंबीर टाका.
●एक उकळी आली की गैस बंद करा.

टैंगी,स्पायसी रस्सम तयार.
गरमागरम भातात, चमचाभर तूप, एखादे पोरीयल(सूकी भाजी).
लंच तयार.

अधिक टिपा: 

ज्यांना गोड आवडते त्यांच्या साठी:-
जिरे पावडर, मिरे पावडर स्किप करा. जिरे फोडणीत टाका आणि जराशी साखर टाका. बाकी क्रुती सेम. टोमॅटो रस्सम तयार.
ज्यांना आवडत असेल त्यांनी चमचाभर शिजवलेली तुर डाळ टाकावी अजून एक रस्सम प्रकार तयार.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages