वडापाव फॅन क्लब

Submitted by VB on 9 October, 2020 - 01:01

लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही Happy
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.

सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते Happy

असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.

*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाचा ब.व म्हणजे आंबट+गोड+तिखट चवीचा. आतलं सारण बिन हळदीचं. आवरण फोफसं पिवळं पिठूळ नसून पातळ आणि खरपूस लाल रंगाचं.

प्रभाच्या ब.व मधे बटाटा, आलं, लसूण, हि. मिरची, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि "साखर" असते. ही चव इतरत्र कुठेच नाही. एकमेव अद्वितीय ब.व. असतो हा.

वडापाव अगदी फेव्रेट.!
चेंबूर च्या गावठाण चा अतिशय प्रसिध्द, आणि चविष्ट..!
दादर चा श्री क्रुष्ण वडा..
हे दोन्ही खूप आवडीचे..

>> अर्ध्या ब्रेडला बटाट्याचे सारण लावुन बेसनात बुडवून तळून घेतात. मग तुकडे करून वरून बारीक शेव. हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून देतात.

हे मिळते ना आपल्याकडे पण. पावाचा अर्धा तुकडा बेसनात लपेटून तळून काढलेला असतो. त्याचे नाव नाही आठवत आता पट्कन.

ब्रेडला बटाट्याचे सारण लावुन बेसनात बुडवून तळून घेतात. मग तुकडे करून वरून बारीक शेव. हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून देतात.>>> पॅटिस म्हणायचो आम्ही त्याला , पेणच्या भाऊच्या कॅन्टीनला हा प्रकार सगळ्यांना परवडणारा आणि चविष्ट असा होता.

ईकडेही मिळतो हा प्रकार, ब्रेड पकोडा म्हणतो आम्ही, फक्त दोन स्लाईसच्या मध्ये भाजी भरुन तळतात.

ब्रेडला बटाट्याचे सारण लावुन बेसनात बुडवून तळून घेतात >> पुण्याला बहुदा ब्रेड पॅटीस म्हणतात याला. सारंग च्या श्रीकृष्ण वड्याच्या पुढे गेलं की गांधी ट्रेनिंग कॉलेज आहे. त्यासमोर एक काका फक्त हे पॅटीस विकायचे. एकदम फेमस होते ते काका.

आमच्या ऑफिसमध्ये एक जण कॉन्ट्रक्टवर होता, तो शिफ्ट ड्युटी करायचा . सकाळची शिफ्ट असायची मग ऑफिसखाली ४ नंतर वडा अन भजी स्टॉल लावायचा. त्याचा वडाही चांगला असायचा. आम्ही कधी कधी दोन तिन खायचो एकदम.

पुणे सातारा रोडवर शिरवळ स्टॅड ओलांडले की श्रीराम वडापाव फेमस आहे.
डांगे चौकातून वाकडकडे जाताना चौकातून थोडे पुढे गेले की एक शाॅपिंग काॅम्प्लेक्स आहे. त्याच्या पुढे डाव्या हाताला एक छोटा रस्ता आत वळतो. त्या कोपर्यापासून थोडे पुढे जाऊन मेन रोडवर टपर्या आहेत. एक वडापावच्या टपरीवर अप्रतिम वडापाव मिळतो. नेहमीच्या लोकांना माहित आहे.

फक्त दोन स्लाईसच्या मध्ये भाजी भरुन तळतात.>> ब्रेड पकोडा आहे तो वेगळा. हे आलू टोस्ट म्हणूनच सर्च करा. मला मुंबईत राहून ह्याची स्वप्ने पडत असतात. मसब टँकला बालाजी भले मोठे किराणा शॉप आहे त्याच्या समोर माणूस बसतो. सामान कार मध्ये लोड करून मी आलू टोस्ट खात खात घरी जाई. ड्रायव्हर असल्याचा फायदा. घरी जाउन गार पाणी प्यायचे त्यावर. मग गरम चहा. ती बारकी सेव कोथिंबीर कांदा लै भारी.

येस्स! पॅटीस किंवा ब्रेड पकोडा Happy पण बटाटा वडा किंवा भजी ह्या त्याच्या भाऊबंदांच्या तुलनेत हा इतका अपील नाही झाला, निदान मला तरी. फारच जडशीळ वाटतो खायला आणि पचायला सुद्धा.

हैद्राबाद मध्ये एक आलू टोस्ट मिळतो. अर्ध्या ब्रेडला बटाट्याचे सारण लावुन बेसनात बुडवून तळून घेतात. मग तुकडे करून वरून बारीक शेव. हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून देतात. जबरदस्त लागते.>>>

अमा, कुठे मिळते हे?
मला गेल्या ५ वर्षात मैसूर बोंडा, दोसा, भज्जी, मिरची भज्जी, इडली, आणि पट्टी समोसे, साधे समोसे. असे निवडकच प्रकार दिसले जास्त.
गोकुळ चाट चांगला होता म्हणे पण आता त्या उसळीत पाणीच सारखा ओतत असतप, पण गर्दी असायची तिथे ६-७ महिण्यात फिरकलो नाही कोटीत.

Ok अमा, बघते

त्र्यंबकेश्वरात पाव वडा मिळतो, नुसता पाव बेसनात बुडवुन तळतात.

मी जिथे जातो तिथे वडापाव खातो. कोयनानगर एसटी स्टॅण्डवर अप्रतिम बटाटेवडा मिळायचा .सध्याचे माहीत नाही पण टेस्ट अप्रतिम.

सारंग च्या श्रीकृष्ण वड्याच्या पुढे गेलं की गांधी ट्रेनिंग कॉलेज आहे. त्यासमोर एक काका फक्त हे पॅटीस विकायचे. एकदम फेमस होते ते काका.

नवीन Submitted by चिन्मय_1 on 9 October, 2020 - 15:45

@चिन्मय , अजूनही ते काका फक्त ब्रेड पॅटिस विकतात आणि विशेष गर्दी असते . परमार काका Happy

>> पुणे सातारा रोडवर शिरवळ स्टॅड ओलांडले की श्रीकृष्ण वडापाव फेमस आहे.

तुम्हाला श्रीराम तर म्हणायचे नाही ना? दहा बारा वर्षापुरी एक छोटेसे वडापाव हॉटेल होते ते आता खूप मोठे झाले. लोकप्रियता इतकी कि रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यांनतर सुद्धा भन्नाट जाणाऱ्या गाड्या तिथे थांबू लागल्या.

<<< फारच जडशीळ वाटतो खायला आणि पचायला सुद्धा. >>> कारण वडापाव मध्ये कोरडा पाव आधी तोंडात जातो तर ब्रेक पकोडा वरचे बेसन लेयर तेलात तळल्याने जरा जास्त तेलकट असते, म्हणजे किमान मला असे वाटते

ब्रेड पकोडा वेगळा आणि हे ब्रेड पॅटिस वेगळे . मी पेण सारखे ब्रेड पॅटिस अजून कुठेही खाल्ले नाही.

>> हो, श्रीराम समोर कि जस्ट आधी खास एक्झिट ठेवलीये आता

आधी नव्हती. चारपदरी रस्त्याला एका लेन मध्ये गाड्या थांबणे धोकादायक. पण वडापाव खाण्यासाठी गाडी थांबवून लोक त्या लोखंडी कठड्यावरून ढेंग टाकून पलीकडे जाऊ लागले म्हणून ती एक्झिट करावी लागली.

अमा, मुलुंड वेस्टला अपना बझार च्या बाजूला (महाराष्ट्र सेवा संघाच्या खाली) एक वडापाव वाला आहे, त्याचा वडा एकदम झणझणीत चटकदार असतो.

हा ब्रेड पकोड्याचा फोटो, नेटवरून घेतला, ह्यालाच ब्रेड पॅटीस असेही नाव दिसले.

कुणाकडे वडापावचा चांगला फोटो असेल तर द्या धाग्यात अपडेट करायला. माझ्याकडे सध्या नाहीये अन इतक्यात काही बनवणार पण नाही

खुप फेमस आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी वडापाव खायला गेलोय त्यातल्या बहुतांश ठिकाणांनी निराशाच केलीय.
आधीच तयार करुन ठेवलेले आणि ऑर्डर येईल तसे गरम वगैरे करुन दिलेले वडे बघितले की आपला मूडच जातो.

आपल्यासमोर बेसनमध्ये बुचकळून गरमागरम तेलात सोडलेले वडे मस्त गोल्डन ब्राउन होऊन आपल्या प्लेटमध्ये येईपर्यंत चाळवलेली भूक, वडे कढईवर झाऱ्यात निथळत ठेवून चर्रर आवाज करत कढईत सोडलेल्या हिरव्यागार मिरच्या आणि हातात आलेली प्लेट गाड्याकडेच्या फळीवर ठेवून एक वडा संपता संपता सांगितलेली रिपीट ऑर्डर ह्या माझ्या आवडत्या वडापावच्या आठवणी आहेत.
मग नाव, गाव वगैरे डझंट मॅटर मच Happy

श्रीराम वडे च्या बाहेर ते पार्किंग असिस्टन्स ला हात गेलेले काका आहेत ना?
त्यांना प्रोस्थेटिक लिंब द्यायला कोणी फंड काढत असेल तर मला सांगा.मीही हातभार लावेन.(हे सर्व स्वतः करण्या इतका वेळ,किंवा पूर्ण एकट्याने फंड करण्या इतका पैसा सध्या जवळ नाही.कोणी करत असेल तर बसल्या जागी काँट्रिब्युट करू शकेन)

सातारच्या प्रत्येक ट्रीपमध्ये जाताना श्रीराम आणि येताना कल्याण भेळ हे स्टॉप ठरलेले आहेत.
श्रीराम अगदी छोटेसे हॉटेल होते आणि प्रामुख्याने फक्त वडापावच विकत होते तेंव्हापासून थांबतोय श्रीरामला.... आता वडापावच्या बरोबरीने बाकीचे पदार्थ भारंभार वाढवून ठेवलेत!

Pages