Submitted by Mamatta'S on 5 October, 2020 - 07:48
*डोंगर'माथ्या'चे गुजकाव्य*
माथा हा असेन माझा
असो तो डोंगर माथा,
फार फरक न त्यात
दोनी ती सारखी कथा ||
असे त्याच्या जवळी
घनदाट जंगल वारा,
असशी डोक्यात माझ्या
असंख्य विचार तारा ||
हात पसरुनी त्याचे
धरतो जेव्हा ढगांना,
त्याच रे ईश शक्तीच्या
स्पर्शीते मी पायांना ||
होऊनिया निवांत रे
टेकूनिया कड्याशी,
कानी करित बसे तो
मन गुज आकाशाशी ||
जेव्हा नतमस्तकं मी
होई त्याच विधात्याशी,
करी त्याचे *गुजकाव्य*
सांगे तो मज *कानाशी*||
.......ममता मुनगीलवार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
वा!सुंदर
वा!सुंदर
"असशी डोक्यात माझ्या असंख्य
"असशी डोक्यात माझ्या असंख्य विचार तारा "आवडल्या या ओळी.
Thankyou,
Thankyou,
प्रतिक्रिया आवडल्या.