बेरीच्या पोळ्या

Submitted by नादिशा on 1 October, 2020 - 12:58
तूप गाळून घेतल्यानंतर उरलेल्या बेरीच्या पोळ्या
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य -
* सारणासाठी -
1)लोणी कढवल्यानंतर तूप गाळून घेतल्यावर उरलेली बेरी -1 वाटी.
2) शेंगदाणा कूट -1/2 वाटी.
3) खोबऱ्याचा कीस -1/2 वाटी.
4) किसलेला गूळ - 2वाट्या.

* पारीसाठी -
1) गव्हाचे पीठ -4 वाट्या.
2) चवीनुसार मीठ.

भाजण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

*कृती -
1) सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून घेणे.
2) गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळून घेणे.
3) जेवढा कणकेचा गोळा, तेवढ्यच आकाराचा सारणाचा गोळा घेऊन पुराणपोळीप्रमाणे सारण भरणे.
4)पिठावर पोळी लाटून घेणे.
5)तेल लावून खरपूस भाजून घेणे.
6) या पोळ्या बाहेर 2-3 दिवस तर फ्रीज मध्ये 8-10 दिवस छान राहतात.
7) मधल्या वेळच्या खाण्यासाठी, येताजाता खाण्यासाठी छान पर्याय आहे.
8)बेरींमुळे छान आंबटगोड चव लागते.

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या साहित्यात 12 पोळ्या होतात. 3-4 माणसांना सहज पुरतात.
माहितीचा स्रोत: 
माझ्या आईची रेसिपी आहे ही. तिची सगळी नातवंडे एकदम आवडीने खातात.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो किशोर. आठवडाभर आरामात राहतात. या मी 4 दिवसांपूर्वी बनवलेल्या पोळ्यांचा आजचा नाश्त्यासाठी खायला काढला असतानाचा फोटो.

20201003_105317.jpg

बेरी चांगली असते का आरोग्याला? >>> भरपूर कॅलरीज असणार, शिवाय त्यात साखर/गुळ, शेंगदाणे कूट, वरून तुप असं थेंबे थेंबे तळे करत दिवसाच्या कॅलरी इनटेक मधल्या अर्ध्या कॅलरीज सकाळीच कन्झ्युम व्हायच्या. लहान मुलांना ठीक आहे ' ये है बढता बच्चा' म्हणत आणि भरपूर खेळणं होत असल्याने चालून जाईल. आयांना सध्या जिम बंद असताना यापासून दूर राहिलं तर बरं.
रेसिपी मात्र टेम्पटिंग आहे. ज्यांना बेरी आवडते त्यांना ही पोळी नक्की आवडेल.

वाह..छान रेसिपी...आमच्या घरी सारखं तूप बनत..n बेरी संपत नाही...ही रेसिपी नक्की ट्राय करणार...
## बेरी ची वडी खाल्ली आहे...पोळी नाही अजून...

मस्त आहे आयडीया.

मी बेरीच्या भांड्यात भात करते. नाहीतर नवरा गुळ घालून खातो, त्याला आवडते बेरी खायला.

अन्जू +१
आम्ही आसट खिचडी लावतो पातेल्यात.पातेलेही साफ, झीरो वेस्टेज.