का असा वागतो समाज माझा?

Submitted by Santosh zond on 2 October, 2020 - 05:42

का असा वागतो समाज माझा?

का नकोशी वाटते त्यांना ती ?
का हवासा वाटतो त्यांना तो ?
मुलगी असल्यास वडील होतात दीर्घायुषी
का विज्ञान खोटं ठरवतो समाज माझा!

वंशाचा दिवा,वंशाचा दिवा
काहीसा एकेरी चालतो समाज माझा
जन्माला आलेल्या चिंगारीला मात्र
कचऱ्यात कोंबून मारतो समाज माझा!

मग का वंशाचा दिवा तुमचा
आश्रमाकडे प्रकाश दाखवतो
नकोशी असलेली ती मात्र तुम्हाला
जगण्याची नवी वाट दाखवते !

जगवलेला दिवा तुमचा
म्हातारपणी अंधार होतो
लहानशी चिंगारी मात्र
स्वतः जळून पहाट होते !

वाळलेल्या रोपांसाठी ती कधी पाणी होते
दुःख हेरणारी परी तर कधी आनंदाची गाणी होते
सगळ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य म्हणता,
मग का रोज अत्याचाराची कहाणी होते ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users