शिक्षण मातृभाषेतच घ्यावे की नाही?

Submitted by सखा on 28 September, 2020 - 23:19

बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का? परदेशात राहणाऱ्या मराठी पालकांच्या मुलांना इंग्रजीतूनच शिकावं लागतं आणि ही मुले देखील आयुष्या मध्ये यश संपादन केलं आहे. मग काय खरं आणि काय खोटं?
तुम्हाला काय वाटत? शिक्षण मातृभाषेतच घ्यावे की नाही घेतले तरी चालते?
(मी स्वतः मराठी शाळेतून शिकलेलो आहे आणि माझं बऱ्यापैकी परदेशात रूढार्थाने यशस्वी करिअर झालेले आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाचा विषय आहे मातृभषेतुन शिक्षण घेतल्यास फंडामेंटल्स चांगले होतात का? म्हणजे विषय समजण्यास सोपा जातो का? असे खरेच होते का आणि त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे चांगले की नाही?
धागाकर्त्याने तरी यात अस्मिता वगैरे प्रश्न आणलेला नाही. धागाकर्त्याने मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून यशस्वी झालेल्या लोकांची उदाहरणेही दिली आहेत.

उद्देश विद्यार्थ्यांना विषय, बेसिक्स, फंडामेंटल्स नीट समजण्याचा आहे, मातृभाषेतून शिकल्यास असा फायदा होईल का?

असे असताना लोक धागाकर्त्याला तुमच्या लेखात इंग्रजी शब्द किती वगैरे जाब विचारत आहेत. इंग्रजी भाषा शिकू नये, अथवा तिचा वापर टाळावा असे कुठे लेखात म्हटले नाहीय.

आणि लेखातील मुद्द्यावर विचार करताना केवळ १५ - २० टक्के हुशार आणि क्रीम लेअर विद्यार्थ्यांचा विचार करू नये, सामान्यांचाही विचार करावा.

मातृभाषेत/परिसर भाषेत शिक्षण म्हणजे अस्मिते पोटी प्रत्येक शब्दाला मातृभाषेत पर्याय असलाच पाहिजे असे डोक्यात ठोकून बसलेले खिळे काढुन विचार करायला पाहिजे.

या विषयावर नानाकळांचा लेख आहे त्यात छान मुद्दे मांडले आहेत, मी शोधला पण सापडला नाही. कुणाला तो लेख सापडल्यास त्याची लिंक द्या.
----------------------
सापडला: https://www.maayboli.com/node/62460

मग बाकीचे इंग्रजी शिकले तर संस्कृतीचा नाश कसा होईल >>
तुमचा गैरसमज होतोय. ती इंग्रजी शिकत आहे . शिक्षण मात्र मराठी माध्यमातून होते.
मी वर हि म्हणाले , भाषा म्हणजे कम्युनिकेशनचे (संभाषणाचे) साधन आणि भाषा हे शिक्षणाचे माध्यम - यात फरक करता यायला हवा.
मागे एकदा कुठल्याशा धाग्यावर लिहिलं होतं,
Pussy cat pussy cat where have u been, i have been to London to look for d queen - यात भारतातल्या बालवाडीतल्या मुलाला मजा वाटेल का? का "माऊ ताई म्हणते माझ्याशी खेळायला येशील का" यात मजा वाटेल.

आपल्या भारतातल्या हवामानात "येरे येरे पावसा " जन्म घेतं आणि सततचा पाऊस असलेल्या देशी "रेन रेन गो अवे" जन्म घेत.
यात एक चूक बरोबर नाही पण शिक्षण आणि अनुभव एकमेकांना पूरक असावे.
इंग्लंडमध्ये रहात असेन तर मराठीतून शिका म्हणणार नाही. Happy

शिक्षण म्हणजे नक्की काय ? - इथपर्यंत गाडी येऊ शकते .

सांगायचा मुद्दा भाषा शिकायला विरोध कोण कशाला करेल?
पण आपली परिसर भाषा सोडून चकचकीत दिसते म्हणून ुदुसऱ्या भाषेतून शिक्षण घेण्याचा अट्टाहास करणे ह्या बद्दल मी बोलतेय.

तुमचा सुर चिथावणीखोर का?
मी प्रामाणिकपणे बोलतेय हे लक्षात घेऊन संभाषण केले तर चांगले वाटेल. बंधनकारक अर्थातच नाही. Happy

मातृभाषेत/परिसर भाषेत शिक्षण म्हणजे अस्मिते पोटी प्रत्येक शब्दाला मातृभाषेत पर्याय असलाच पाहिजे असे डोक्यात ठोकून बसलेले खिळे काढुन विचार करायला पाहिजे.>> बरोबर आहे.
निदान हे शब्द वापरायला सहज - सोपे असले पाहिजेत

नानबा आणि मानव पृथ्वीकर तुमच्या विचारपूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारची चर्चा अपेक्षित होती. दुर्देवाने काही लोक पोस्ट पूर्ण न वाचताच अस्मिता, तुमच्या लेखात अर्धे शब्द इंग्रजी वगैरे बिनबुडाच्या गोष्टी आणून काय सांगायचा प्रयत्न करतात हेच कळत नाही? असो.
इथे मी मराठी तमिळ इंग्रजी गुजराती ती कुठली भाषा चांगली यावर अजिबात बोलत नाहीये म्हणूनच मी एका व्यक्तीला सांगितले की कृपया पुन्हा एकदा माझी पोस्ट नीट वाचा कदाचित तुमच्या लक्षात येईल. परंतु सोशल मीडियामध्ये चेहरा दिसत नसल्यामुळे बुरख्याआडून वाटेल ते बोलण्याचा एक एक खोटा दिलासा असतो आणि त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेऊन नको ते बोलतात आणि ज्या मंचावरून ते बोलत आहे त्याची प्रतिष्ठा कमी करतात.

मी मराठी माध्यमातून शिकले, सेमी वगैरे नाही.
१०वी नंतर polytechnic चं पहिलं वर्ष english भाषेतून concept समजून घेण्यात गेला. मार्क्स कमी आले first class राखला. Second year पासून काही problem आला नाही.
आता तर काहीच समस्या येत नाही. उलट शाळेत शिकलेल्या बऱ्याच गोष्टी आठवतात. माझी बहिण semi माध्यमात शिकली. तिला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. इतिहास भूगोल आठवतो.
गणिताला फार समस्या आली नाही.
विज्ञान त्यातही physics, chem सुरुवातीला शब्द माहीत नव्हते पण शब्द समजले की रूळले.
माझ्या मते मराठी माध्यम किंवा स्वतःची ओळखीची भाषा असेल तर अभ्यास कठीण जात नाही. Rather, अभ्यास असा वेगळा करावा लागत नाही. अर्ध्या गोष्टी अशाच समजून जातात

इंग्लिश एक भाषा म्हणून यायला हवी.
मुळात कुठलीही एक भाषा पक्की झाली की त्या अनुषंगाने दुसरी भाषा शिकता येते, खासकरून शाळकरी वयात.
पक्की भाषा मातृभाषा असेल तर हे काम लवकर होते

टवणे सर .. तुमच्या नावातच एक इंग्लिश शब्द आहे. >> क्काय?? सर हा मराठी शब्द आहे ना? पावसाची सर, गड सर करणे, बाजूला सर वगैरे...

मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात >> पण मातृभाषाच जर इंग्रजी-मिश्रित मराठी अशी असेल तर त्या पोराला/पोरीला किंवा त्या/तिच्या पालकांना इष्टिकाचिती हा शब्द कसा काय कळेल?

किल्ली, नानबा, अनुमोदन.
मी मराठी माध्यमातून शिकले. 10वी ला मेरिट लिस्ट मध्ये होते. 12वी लाही उत्तम गुण मिळवून डॉ झाले. माझे कुठेही अडले नाही english medium मध्ये शिक्षण न घेतल्याने. नंतरचा एक डिप्लोमा ruby hall, पुणे इथे केला. तेव्हा सुरुवातीला जरा टेन्शन आले होते. पण नंतर लक्षात आले, आपण लिहायला सांगितले, तर कितीही लिहू शकतो english मध्ये, पण बोलण्यासाठी फक्त आपला कॉन्फिडन्स कमी पडतो आहे. आपलेच उच्चर आपल्याच कानांना वेगळे वाटताहेत english मधून बोलताना. एरव्ही आपण grammatically या इतर लोकांपेक्षा correct बोलतो आहोत. मग मनातला संकोच झटकला आणि काही दिवसांतच उत्तम संवाद साधू शकले.
माझे पती आणि सासरचे सर्व english मेडीयम मध्ये शिकले आहेत. पण माझ्या दिरांचा आणि पतीचा स्वानुभव असा होता, की आम्हाला काहीच कळत नव्हते शाळेत शिकवलेले. आम्ही फक्त घोकंपट्टी केली, कानावर सतत बोलणे पडत असल्याने बोलता येते, पण कंसेप्ट्स क्लिअर झालेल्या नाहीत. Grammatically correct ते लिहू - बोलू शकत नाहीत, पण accent छान जमतो english चा. त्यामुळे आमच्या दिरांनी मुले मराठी medium मध्ये घातली.
मी गरोदरपणात पालकत्वावर वाचन चालू केले, ते आजतागायत चालू आहे. कुणाला अतिशयोक्ती वाटू शकेल, पण आजच्या घडीला मराठी भाषेत उपलब्ध असलेली पालकत्वावरची एकूण एक सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत. सर्वांनी आग्रहाने सांगितले आहे, की मातृभाषेतून शिक्षण द्यावे.
English ही फक्त एक व्यावहारिक भाषा आहे. ती अभ्यासत असतातच मुले शाळेमध्ये. बोलण्याचा कॉन्फिडन्स आपण वाचन करून, परस्परांशी english मध्ये संवाद साधून कमावू शकतो. (जपानी -जर्मनी अशा भाषा पण मुले त्यांचे कोर्सेस करून शिकतात, तसा खूपच वाटले, तर english speaking चा course करू शकतो.)पण जर बेसिक पक्के नाही झाले, कंसेप्ट्स च क्लिअर नाही झाल्या, तर मुलांना ज्ञान नाही मिळणार, फक्त शिक्षित होतील.
आणि तुम्ही मराठी medium मध्ये शिका किंवा english medium मध्ये. प्रॅक्टिस महत्त्वाची. त्या माहोल मध्ये तुम्ही असणे महत्वाचे. म्हणजे उदा. सांगायचे तर माझे पती पूर्वी नासिकला होते. तिथे ऑफीस मध्ये english मध्ये संवाद व्हायचा इतरांशी, पुणे, मुंबई branch ला गेले, तर सर्वजण english मध्ये बोलत असल्याने english मध्ये हेही conversation करू शकायचे. पण आता ते बदलीमुळे सातारला आहेत गेली 10 वर्षे. इथे स्टाफ मध्ये कुणीही english बोलत नाही, clients पण मराठी बोलणारे, त्यामुळे प्रॅक्टिस नाही राहिलेली बोलण्याची. त्यामुळे आता तेही चटकन बोलू शकत नाहीत english बोलण्याची वेळ आली तर.
त्यामुळे आम्ही तरी सर्व बाजूंनी विचार करून आमच्या मुलाला english medium मध्ये घातलेले नाही. आता चौथीत आहे तो. सर्वांगीण प्रगती उत्तम आहे.

मराठी बोला ह्या आग्रहाने एका रिकामटेकड्या लेखिकेने एका स्वतःचा व्यवसाय करणार्या सराफाला मार देववला

इतके प्रेम आहे मराठीवर तर तू का नाही गाळा घेऊन व्यवसाय करत ?

मराठी न येता टाटा अंबानी व्यवसाय करतात , एन्रॉन वाली येऊन प्रोजेक्त काढते
आणि आता तर जी एस टी केंद्र गोळा करून राज्याला वाटणी देते , त्यामुळे कुणी कुठेही अधिकृत धंदा करणार असेल तर तुमच्याच राज्याच्या तिजोरीत पैसे जाणार

त्या पैशातून मराठी शाळा निघतात तिथे कुणी कुत्रे फिरकत नाही