माझे गाणे

Submitted by द्वैत on 12 September, 2020 - 02:40

माझे गाणे

नकळत जेव्हा ओठांवरती येईल माझे गाणे
सो सो वाहील वारा आणि सळसळ करतील पाने

उरात घेशील ओढून जेव्हा नभास गडगडणाऱ्या
कसे रोखतील तुझी आसवे डोळे केविलवाणे

सांग कुणाचा श्वास तुझ्या ह्या श्वासातून परिमळतो
सांग कुणाला साद घालशी हृदयातून मुक्याने

तुझी अनामिक व्यथा सांग त्या लुकलुकत्या ताऱ्याला
क्षणात येईल उतरून खाली दुःखाच्या ओढीने

स्मरणांच्या डोहावर उठतील तरंग हळवे हळवे
जणू छेडली आज भैरवी सहजच स्तब्ध तळाने

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

वाह !! सुंदर रचनाय ... मात्रांचे नियम मात्र कटाक्षाने पाळायला हवेत