तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

Submitted by ताजे प्रेत on 22 September, 2020 - 13:31

गाभा:
तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली.
रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं-
"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"
रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं-
"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?"
रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-
"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"
समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली.

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती.

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले.
रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -
१) ३७ जणांचा मृत्यू झालेला होता. आणि कारणे खाली येतीलच
२) २८ मुली विधवा झालेल्या होत्या. ४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.
३) १३ जण घटस्फोटीत होते.
४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती. आणि काही मरण पावली होती
५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .
६) १९ मुले मुली वेगवेगळ्या ड्रगज च्या व्यसनात होते आणि त्यातले काही मरण पावले होते
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .
८ ) ४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता,
९) ५ जण गँगस्टर झाले होते आणि २ जण विरोधी गॅंग चे असल्याने त्यांनी एकमेकांना ठोकले होते . अजून एकाला वर्गातल्याच कमिशनर झालेल्या मुलाने एन्काउंटर मध्ये उडवले होते. वर्गातील काहींची मुले हि वेगवेगळ्या गॅंग मध्ये होती
१० ) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
११) ४ जण समलैंगिक झाले होते आणि त्याचे हि ब्रेक अप झाले होते.
१२ ) २ जण करोना काळात मास्क चा काळाबाजार करताना पकडले गेल्याने त्यांना खूप हप्ते द्यावे लागत होते
१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती
१४) ३ जण ब्रेन ट्रान्सप्लांट मध्ये मेंदू चा काळाबाजार करतांना पकडले गेले होते
१५) ७ जण करोना ने मरण पावले होते . ३ जणांची फुफुसे बदलावी लागली होती .
१६) २ जण नोटबंदी च्या रांगेत मरण पावले होते
१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते .
१८) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.
१९) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.
२०) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.
२१) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.
२२) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.
२३) १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.
२४) ११ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
२५) ४ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.
२६) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.
२७) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.
२८) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-
"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

Group content visibility: 
Use group defaults

कथा म्हणून चांगली आहे मांडणी
पण यातला विचार नकारात्मक वाटला
आपले सुख समाधान आपल्यासोबतचे किती दुखी आहेत यावर का अवलंबून असावे?

व्हॉटसपग्रूपच्या निमित्ताने अचानक कैक वर्षांनी शाळेतले मित्र मला भेटले. त्यांची ख्यालीखुशाली समजली. अपवाद वगळता सारे सुस्थितीत अन सेटल झालेले आहेत. मग त्यांना सुखी बघून मी स्वत:ला नैराश्येच्या गर्तेत झोकून द्यावे का?

किंवा कथानायकाला असा अनुभव आला असता तर तो नैराश्याच्या झटक्याने लिस्ट बनवतानाच मेला असता...

पण यातला विचार नकारात्मक वाटला
आपले सुख समाधान आपल्यासोबतचे किती दुखी आहेत यावर का अवलंबून असावे?>>+१

कुठली शाळा होती ही, जिथे घाऊक प्रमाणात असले नग निपजले? Happy
>>>>

एक तुमची शाळा कोणती असा धागा आहे माबोवर तिथे याची लिंक देऊन विचारा Happy

आणि दळभद्री आयडी Angry
>>>
चांगले आहे की.. ताजे प्रेत.. एका नरभक्षकाच्या नजरेतून विचार करून बघा Happy

१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते. >> Biggrin काय हे!

"जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनि पाहे" ही एक ओळ समजावायला १२० काल्पनिक लोकांची आयुष्य उध्वस्त केलीत... हे वागणं बरं नव्हं... Happy

सिमंतीनी तुम्ही १७ पर्यंत गेलात वाचत.. तुम्हालाही मजा येऊ लागलेली वाटते लोकांचे दुख दर्द वाचताना Proud
आता वर्षभर काही डिप्रेशन तुमच्या आसपास फिरकत नाही Wink

मला माहिती नव्हते की हे २८ अंकी दुख-दर्द असेल..."साधारण तपशील" म्हणून वाचायला सुरवात केली आणि ८ पर्यंत वाचले, मग दुखदर्द लक्षात आले. तेव्हा सोडून देणार होते पण मग १३ पेंग्विनवर नजर पडली आणि ... खरंय रून्मेष तुमचे, आता वर्षभर काय डिप्रेशन येत नाही!!!!! Wink Happy

एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते >> ह्यावर अनेकांना हसू येईल, पण नीट विचार केला तर लगेच कळेल की ही बाब शक्य आहे. कानाचे ऑपरेशन करताना कान कापला गेला, तर त्यावर चष्मा नीट ठेवता येणार नाही. त्यामुळे कमी दिसू लागेल.

सीमंतिनी, आपल्यामुळे ते पेंग्विन प्रकरण वाचले. आधी त्यात राजकीय वास आल्याने सोडून दिले होते.

१ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती

यात खरे तर दु:खदर्द नसून थ्रिल दिसत आहे. किती लोकं आयुष्यात उत्तर ध्रुवावर जात असतील याचे उत्तर शोधले तर ते सापडेल.

नीट विचार केला तर लगेच कळेल की ही बाब शक्य आहे >> काय? कानेचे ऑपरेशन डेंटिस्ट ने करणे ? Wink
इंजिनिअरिंग क्षेत्राला नोबेल स्लॉट च नाही हे त्या नैराश्याने ग्रासलेल्याला सांगितलं तर तो काय करेल?

नीट विचार केला तर लगेच कळेल की ही बाब शक्य आहे >> Happy आहे का आता... म्हणजे "एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते" ह्यात कमतीला भरती म्हणून आपण 'शक्य आहे, तो माणूस ना मूळातच चष्मिस असणार, लेन्सेस न परवडेल इतका गरीब असणार' असा विचार करायचा आणि त्याला "नीट विचार" म्हणायचं??? Biggrin .....

इंजिनिअरिंग क्षेत्राला नोबेल स्लॉट च नाही हे त्या नैराश्याने ग्रासलेल्याला सांगितलं तर तो काय करेल? >> Wink प्लीज सांगू नका नायतर तो अजून पाचवीचे रजिस्टर उघडायचा आणि अजून काही काल्पनिक आयुष्य उध्वस्त व्हायची...

हे व्हाट्सएप फॉरवर्ड आहे.

इंजिनियरिंग क्षेत्रात नोबेल स्लॉट नाही ???
मला डिप्रेशन आलं हे वाचून.

मला वाटलं मी जे चित्र बनवलंय त्याची प्रशंसा म्हणून एव्हडे प्रतिसाद आले असतील.

चित्राकरता एकही प्रतिसाद नाही आलेला बघून तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?
मग आगबबूला व्हा Wink

२४) ११ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
>>
हे

२४) १२ जणांची मानसिक स्थिती बिघडून त्यांना वेड लागले होते

असे असायला हवे होते ना?

रच्याकने: ताजे प्रेत चक्क १ वर्ष ४ महिने जुने आहे.
तरी ताजे कसे? क्या राज है आपले ताजे पन का? संतूर?

<<< तुम्हालाही डिप्रेशन आलंय का? >>> अद्याप नाही पण हा लेख अन लेखकाचा आयडी वाचुन एखाद्या कोमल ह्रदयी व्यक्तीला नक्कीच येऊ शकते.

२६ २७ २८ मस्त आहेत
श्रीमंत झालो तर गर्व होतो.
गरीब राहिलो तर लग्न होत नाही.
आणि मध्यमवर्गीय बनत लग्न केले तरी बायको समाधान मिळू देत नाही.
एखाद्या चौथी पास पुरुषाने करावे तरी काय??

राज, मुद्द्यांत व्याकरण करेक्शन बरोबर पेशंट संख्या कशी वाढली? Happy
ये जान बुझके है या अंजाने मे?

लोकहो लेखावर कॉमेंट करा. आयडी नावावरून नको. हे सोशलसाईट एथिक्समध्ये बसत नाही. हवे तर या विषयावर वेगळा धागा काढून चर्चा करूया Happy

Pages