पायनॅपल स्वीट करी Pineapple sweet curry

Submitted by BLACKCAT on 22 September, 2020 - 01:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

1 अननस बारीक चिरून

तिखट , मीठ

कांदा कापून

फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता

अर्धी वाटी गूळ

क्रमवार पाककृती: 

अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे

SAVE_20200922_104220.jpeg

शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे .

मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग , कढीपत्ता , मिरच्या , आल्याचा किस व कांदा वापरून

त्यात अननस गर घालावा , थोडे शिजवावे , मग उरलेले पाणी व गूळ घालून दाट शिजवावे , गूळ कमीजास्त वापरून चव बदलता येते

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

यु ट्यूब

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोबरे , नारळ दूध वापरले नाही , मी जी युट्युब पाहिली , त्यातही नव्हते

पण 2,3 चमचे ओला नारळ किंवा नारळ दूध वापरले तर अजून एक फ्लेवर मिळेल

मी केलेच तर तेलात मोहरी,कढीलिंब n घालता मोहरी भाजून ती थोड्या khobaryabarobar वाटून घालेन.पावसामुळे सद्या बाहेर जायला कंटाळा येतो य.

खूप छान नवीन रेसिपी , can चे अननस आहे करून बघणार.
खिचडी सोबत चिंच गूळाच्या सारा ऐवजी छान लागेल असं वाटतयं.