पुस्तक - रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन

Submitted by सामो on 18 September, 2020 - 11:33

लेख सुरू करण्यापूर्वी - या लेखामध्ये जेथे भाषांतर मारक ठरले असते तेथे ईंग्रजी वाक्य तशीच ठेवली आहेत.

रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? " या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन" हे पुस्तक जन्मास आलं. यातील उतारे अनेकविध प्रकारची आहेत- काही निखळ विनोदी तर काही अंतर्मुख करणारी तर काही त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा आदर वाढवणारी आहेत.पुस्तकात एकूण व्यक्तीमत्वांचे व्यवसायानुसार ९ भाग आहेत - चित्रपट तारे/तारका, खेळाडू, लेखक, व्यंगचित्रकार, विनोदसम्राट, बिझनेसमधील लोक, पत्रकार, संगीतकार आणि स्टेजवरील कलाकार.
१ नक्की की अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे.
आता सुरुवात करू यात की त्या त्या व्यक्तीला तिच्या थडग्यावर काय लिहीलेले आवडेल अशा काही उदाहरणांची -

भाग १ चित्रपट तारे तारका-

(१) जोआन बार्न्स - शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई!
(२) शेली बर्मन -वर्षानुवर्षे मी हे पटविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला की मी देखील तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. आशा करते आतातरी तुम्हाला ते पटेल.
(३) फ्लोरेन्स हेंडरसन- जीवनाचा प्रारंभ श्रद्धा, आशा आणि प्रेम या मूल्यांनी झाला. जीवनाच्या अंतीम काळी श्रद्धा, आशा, प्रेम ही मूल्ये होती. मधल्या काळात मी संशयाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खात होते.
(४) शर्ली नाईट - या जन्मी मला ही गोष्ट कळली की हिंसा हे कोणत्याही समस्येचे समर्थक उत्तर होऊ शकत नाही हे मला कळले याबद्दल मी उपकृत आहे परंतु या गोष्टीचे वाईट वाटते की बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी १ जन्मदेखील पुरत नाही.
(५) जॅनेट लेह - ईश्वरी तत्त्व आपल्या वागणूकीमधून प्रकट करण्याकरता आयुष्य ही एक संधी तुम्हाला दिलेली असते. मी ते दर वेळेस प्रकट करू शकलोच असे मी म्हणू शकत नाही पण ईश्वर जाणतो की मी प्रयत्न केला.
(६) जॉर्ज चॅकीरीस - क्षण कितीही काळा असो, प्रेम आणि आशा यांना सदैव संधी असते.
(७) स्टेसी कीच -
Here Lies Stacy Keach
A georgia peach
Lived At the beach
Now out of Reach

भाग २ खेळाडू -

(८) बॉब कुसी - जेव्हा कोणाचं लक्ष नव्हतं तेव्हा त्याने त्याचे सर्वोत्तम देणे देऊ केले
(९) डोमिनो डिमॅजीओ - A guy who thrived on challenges large and small.
(१०) बॉबी नाईट-
When my time on earth is done
and i have breathed my last
I want they bury me upside down
So my critics can kiss my ass.
(११) जेरी कूसमॅन - पहीला आणि शेवटचा गडी बाद करणं सोपं होतं. मधल्या सर्वांनी माझे केस करडे केले.
(१२) टॉमी लासोर्डा - Dodger stadium was his address but every ballpark was his home.

भाग ३ लेखक-

(१३) जॅक कॅनफील्ड - त्याची प्रत्येक कथा ही दुखऱ्या जगावर केलेली मलमपट्टी होती.
(१४) फॅनी फ्लॅग - म्हणजे? पुस्तकांचा दौरा संपला म्हणायचा की काय?
(१५) क्लाईव्ह कसलर -
It was a great party while it lasted
I trust it will continue elsewhere
(१६) अँड्र्यू ग्रीले -
May it be said
When I am dead
His sins were Scarlet
His books were read
(१७) इव्हान हंटर - तो एखाद्या देवदूतासारखा लिहीत असे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरुर शब्दसखी. मी ही परत शोढणार आहे हे पुस्तक ग्रंथालयात. खूपच witty epitaph आहेत. मला फार आवडले होते.