पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - Red Rose Momos - ShitalKrishna

Submitted by ShitalKrishna on 28 August, 2020 - 12:44

या आठवड्या मध्ये अनुक्रमे पहिल्या दिवशी -भावाने लेट रक्षाबंधन निमित्त आणलेले कलाकंद, हल्दीराम डब्बा बंद रसोगुल्ला, दुसऱ्या दिवशी घरी सत्यनारायण पूजेसाठीचा प्रसाद, पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी बाप्पा आगमनानिमित्त रव्याच्या उकडीचे मोदक, गौरी पूजना दिवशी शेजारी काकूंनी दिलेले बेसन लाडू, काल चॉकलेट ब्राउनी मोदक असं सगळा अगदी म्हणजे अगदीचं फारच गोग्गोड झाले, आमच्या गावाकडच्या भाषेत तोंड लईच गोड मचूळ झालाय, कायतर चमचमीत पाहिजे


Red Rose Beetroot Momos Version 1.0

घरात बीट होते.. chinese noodles, rice करण्यासाठी आणलेले सौस, व्हिनेगर होते, मग काय.. घेतेले कि मोमोस करायला..

कृती नेहमीच्या मोमोस सारखीच आहे, फक्त मी गव्हाचं पीठ वापरते, आणि आता त्यामध्ये बीट मिक्सर ला बारीक करून, त्याचा काढलेला रस कणकेत घातला, तेल मीठ घालून मळले.

राहिलेले पल्प/ चोथा, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले मिरची, आलं, लसूण, तेलात परतून अर्धवट शिजवून घ्यायचे. मीठ, सोया सौस, व्हिनेगर टाकून stuffing सारण बनवला.

आणि मोमोस वळले.. Wink बनवले.

(खरं म्हणजे, गाजर बीटरूट हलवा करून, मोदक च्या उकडी मध्ये बीटरस घालून, बीट हलवा मोदक कारायचे आहेत.. Beetroot Halwa Red Modak Version 1.1 coming soon.. Wink महिनाभर तरी खाणार नाहीये गोड.. नंतर बघुयात, असं ठरवलं आहे)

क्रमवार फोटो :

1. तयारी अनुक्रमे बीटच्या रसात मळलेली कणिक, खिसलेले गाजर, तयार केलेले सारण

IMG-20200828-WA0056.jpg

2. पारी लाटून, मोमोस बनवले

IMG_20200828_212923 (1)_0.jpg

3. पूर्ण झालेला

IMG-20200828-WA0033.jpg

4. वाफवण्यापूर्वी

IMG-20200828-WA0039.jpg

5. वाफवल्यावर

IMG-20200828-WA0044.jpg

6. Plating करण्याचा प्रयत्न

IMG-20200828-WA0037.jpg

जमलंय का presentation?

IMG-20200828-WA0043.jpg

हिरवी मिरची कच्ची तुम्हाला झेपत असेल तर खा, मिरी द्या माघारी.
खाली पाण्यात कालवलेले हळद कुंकू नाहीये. Red chilly and Green Chilly Sauce आहे.

वाढणी प्रमाण : इथे तीन पाऱ्या मिळून एक मोमोस आहे, म्हणजे तीन मोमोस मिळून एक. बघा मग.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रेसिपी जाम आवडली आणि सगळे घटकपदार्थ घरात होते म्हणून करून बघितली. चवही छान लागली. उकडण्यापूर्वीचा कलर फार सुंदर होता. उकडल्यावर लालेलाल झाला. धन्यवाद रेसिपीबद्दल. बच्चेकम्पनी खूश एकदम. 20200903_174951.jpg

काय सुंदर दिसतायत.ओरिजिनल पोस्ट मधले पण आणि वर्णीता चे पण मोमोज.
मुळात असा गुलाब करायचा ही आयडिया येणंच खतरनाक आहे.

Thank you all Happy

वर्णिता मस्त जमलय.. बीटाचा रंग ही बदलतो शिजल्यावर .. माझे पण असेच झाले.

धन्यवाद Happy
मला मत दिलेल्यांचे सर्वांचे आभार, संयोजकांचेही आभार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल.

सुंदर

तुम्ही पाकळ्याचा आकार कसा काय देता ?

मेघना छान जमलाय गुलाब..

जाई वरती दाखवला आहे न ! आत मध्ये रोल करत जायचा एका बाजूने आपोआप गुलाब बनतो

Pages