कडू कारले आणि त्यापासून बनलेले चविष्ट पदार्थ

Submitted by चामुंडराय on 13 September, 2020 - 08:18

आजकाल च्या नवीन ट्रेंड प्रमाणे फक्त शिर्षकाची पाकृ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर कारलं फार आवडतं.
१. कारलं किसून भरपूर कांद्यात हिरवी मिरची,हळद घालून केलेली भाजी फार फार आवडीची Happy
२. कारल्यांचे काप करून, स्वच्छ धूऊन, दही लाल तिखट धना पावडर लाऊन मॅरिनेट केलेले आणि नंतर शॅलो फ्राय केलेली कुरकुरीत कारली पण वरण भाता बरोबर मस्त लागतात.
३.आतिखट आंबट गोड भरली कारली, थोडीशी वेळ खाऊ पण ती ही आवडतात.

कारल्याच्या पातळ चकत्या करायच्या, मेंडोलिन ने केल्या तर छानच.
त्यातला मधला बियांचा भाग काढून टाकायचा आणि मीठ लावून थोड्यावेळ ठेवायच्या.
मग कोरड्याकरुन तव्यावर छान कुरकुरीत शॅलो फ्राय करायच्या... मस्तच.

माझी आई तर कारल्याच्या बियापण काढत नाही. धूउन पातळ काचऱ्या करून थेट भाजायला घेते. मग त्यात मीठ, तेल घालते तर शेवटी तिखट घालते. त्यामुळे भाजताना तिखटाचा ठसका लागत नाही. बियापण मस्त कुरकुरीत लागतात.

कारल्याच्या काचऱ्या ऑटाफे. मी कांदा नाही घालत. कांद्याने नंतर मउ नाही का पडत?
धागा विनोदी लेखनामध्ये का आहे? मी तर उघडणार नव्हते

आमच्याकडे छोटी कारली चिरा पाडून बिया व गर फेकून देऊन त्या जागी ओले खोबरे तिखटमीठ अगदी नावाला गूळ किंवा साखर भरून (coconut stuffed bitter gourd) धाग्याने बांधून तेलावर परतून (shallow fry) करतात ते (पाकक्रुती चे नांव बहुतेक भरली कारली) आवडते

हा बाफ 'गुलमोहर - विनोदी लेखन' मध्ये का आहे? बहुतेक वाचणार्‍याना 'कसं फसवलं?' असा वैयक्तिक विनोद असेल..

हा धागा म्हणजे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली हा प्रकार आहे.
मजकूर काहीच नाही तरी अपेक्षित प्रतिसाद आले तर मस्त नाहीतर मी मुद्दाम उघडलाच होता विनोद करण्यासाठी म्हणायच हाकानाका

कडू कारल्याचे (आणि त्या दुसऱ्या धाग्यात दुधीचे) चविष्ट पदार्थ नसतातच (त्यांच्यामते) म्हणून तशा शिर्षकाचा धागा काढून त्यात लिहिलेले पदार्थ शून्य, असा।विनोद दिसतोय हा.

मागे ऑर्कुटवर एका धाग्यात धुम्रपानाची चर्चा सुरू होती तिथे मी लेक्चर्स झोडत होतो धुम्रपान विरोधात कुणी म्हणाले काय काहीच फायदे नसतात का धुम्रपानाचे. मी म्हटलं त्यासाठी वेगळा धागा काढतो, धुम्रपानाची फायदे हा धागा काढला आणि लेख रिकामा ठेवला. म्हणजेच शून्य फायदे.
तसाच हा प्रकार असावा.

हा धागा म्हणजे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली हा प्रकार आहे. >>>

नाही बर्का. कारल्याची पाकृ आवडली तर खाल्ली, नाहीतर माबो वर टाकली.

कडू कारल्याचे चविष्ट पदार्थ नसतातच (त्यांच्यामते) >>>

नाही बर्का. कारल्याच्या चकत्या खूप आवडीच्या.

हा बाफ 'गुलमोहर - विनोदी लेखन' मध्ये का आहे? बहुतेक वाचणार्‍याना 'कसं फसवलं?' असा वैयक्तिक विनोद असेल.. >>>

नाही बर्का. पाकृ मध्येच टाकायचा होता परंतु जमेना म्हणून इथे टाकला आणि नंतर हलवायचा प्रयत्न केला परंतु ते देखील जमेना. ग्रुपचे सभासदत्व घ्यावे लागते काय ?