माझा कोरोना

Submitted by Seema२७६ on 16 September, 2020 - 07:11

खर तर मला लिहायला नकोच होत, काय आता कोरोना खुप कॉमन झालाय.सगळयांचे अनुभव वाचुन माझा काय वेगळा आहे असा वाटत नाही, पण माझ विलगीकरण मात्र चमत्कारिक होत नक्की.
झाला अस 26-अॉगस्ट ला आईची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि गणपतीनिमित्त मी आईकडे दोन दिवस येऊनजाऊन होते. गणपतीच्या दिवशी औषधे आणली कणकण येत होती म्हणून, त्यावेळेस कोरोणाची शंका पण आली नाही डॉक्टर बोलले आराम नाय पडला तर पेशंटला घेऊन यावे. तीन दिवस नीट गेले मंगळवारी परत कणकण, परत आईला दवाखान्यात डॉक्टरने रक्त आणि कोरोना टेस्ट सांगितले. दुसर्‍या दिवशी माझ्या शाळेत गेलो टेस्टसाठी कोरोना बर का.. मला तर शाळेत गेल्याची एक्साईटमेंट प्लस टेस्ट थोडे दडपण आले होते. टेस्ट निगेटिव्ह येणार असा आत्मविश्वास (अती)होता. मी तर ब्लड टेस्ट च्या टेन्शन मधे होते आणि पुढचे काही दिवस मम्मी बरोबर राहु हा विचार करून बॅगभर कपडे लॅटपॉट आणि काय काय घेऊन आले होते कळीचे लाडू आणलेले (मम्मी म्हणत होती खाऊशी नाय वाटत म्हणून). असो. पण घडले वेगळेच मम्मीची रॅपिड टेस्टच पॉझिटिव्ह आली, माझी निगेटिव्ह.मग माझे स्वॅब दिले, सगळेच अनपेक्षित अकल्पित..... मग मम्मीला डॉक्टरांच्या सल्ल्याने (वय जास्त असल्याने) विलगीकरण कक्षात पोहचविण्यात आले मी बरेच धावपळ केली म्हणजे अचानक ठरल्यामुळे मम्मीचे सामान नेऊन दिले जवळच होते. हयादरम्यान माझी चार वर्षाची मुलगी आजीजवळ होती आणि नवरा आणि भाऊ आॅफीसला होते.
आता माझा अध्याय संध्याकाळी घरी येताना पाय जाम दुखत होते, दिवसभर ऊभी होते. हयादरम्यान मी मम्मीची टेस्ट झाल्यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टर ना भेटून आले म्हणजे त्यांनीच बोलावले त्यांनी मला धीर दिला (नेहमीच आहे त्यांना पाहूनच बर वाटत मला). डॉक्टरांनी मला औषधे, अॉक्सीमीटर दिला आणि सांगितले घाबरू नका हया औषधांनी होनार नाही आणि जरी कोरोना झाला तरी हिच औषधे खायची आहेत, आणि अॉक्सिजन लेव्हल व्हॉट्स अप करायला सांगितली.
मी घरी आले एक तापाची गोळी घेतली (बॉडीपेन आणि तापासाठी पण एक सेपरेट गोळी होती). तस मला त्रास काही नव्हता पण काल (26-अॉगस्ट)सकाळपासून थोडा ठसका जाणवत होता. (नॉर्मली माझ स्वतःकडे भारी लक्ष असतं) ठसक्याबद्दल मी डॉक्टरांशी फोनवर बोलले ( हो मी डॉक्टरांना २४ तासात कधी पण फोन करून त्रास देते) ते आणि माझे बॉस दोघेही बोलले टेस्ट केली की भितीमुळे उगाचच लक्षणे जाणवत आहे.ओके. दुसरा दिवस जरा टेन्शन आलं पण संध्याकाळ पर्यंत मेसेज काय आला नाय, अस करत शनिवार आला मेसेज काही आला नाही, सगळे बोलले निगेटिव्ह टेस्ट चा मेसेज येत नाही मग खुश झाले, नवरा शाळेत जाऊन आला तिथेपण त्याला असच सांगण्यात आले आता मी निर्धास्त झाले नो कोरोना म्हणून आणि मिक्स झाले (आधी मी वेगळे झोपत होते).
शनिवारी दुपारी जरा ताप आला आणि थकवा पण आला तापाची गोळी घेतली आणि झोपून गेले. यादरम्यान अॉक्सिजन लेव्हल ९५,९६,९७ होती कधीतरीच ९८ जायची मी मात्र खुश ९५ आहे म्हणून, नंतर तोंडाची चव गेली आणि वास पण, खोकला वाढला(आता माझ खोकला प्रकरण खूप अवघड आहे महीने तरी जातातच) .हे सगळे अपडेट डॉक्टरांना जात होतेच. रविवारी डॉक्टर बोलले जरी आपण समजतोय टेस्ट निगेटिव्ह आहे पण तुमचे अॉक्सिजन लेव्हल पण ठिक नाही ही कोरोणाची लक्षणे आहे प्रायव्हेट मधे जाऊन टेस्ट करून घेऊ, मग सोमवारी परत ते नाक आणि घशातली कोंबाकोंबी प्रकरण पार पडले आणि टेस्ट ची वाट पहाने आले,एकदाचे बुधवारी अनपेक्षित पणे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. आता मजा अशी निगेटिव्ह टेस्ट म्हणून आणि आवडत म्हणुन मी चिकन केले होते आधी ते बेचव लागले आणि रिपोर्ट आला तेव्हा तो वास आणि चव पण आली....
आता होम विलगीकरण प्रोसेस साठी दवाखान्यात गेलो २ हजाराची औषधे आणि सुचना घेऊन आलो. आधीपण २ हजाराची औषधे आणली होती... असो
आता मला विलगीकरण मधे राहचे होते सोबत चार वर्षाची मुलगी आणि नवरा आणि एवढे दिवस मिक्स झालेलो.... एक गोष्ट होती डॉक्टर बोलले होते लहान मुलांना कोरोना होत नाही
तुमच्याजवळच ठेवा दुसरीकडे ठेवल्यास आधि टेस्ट करा आता मला पडलेला प्रश्न मी समजा मुलीची टेस्ट केली निगेटिव्ह आली पण कशावरून मधल्या दोन दिवसात तिला लागन होनार नाही? असो मी काय तीला कुठे ठेवली नाही
आता सुरू झाले माझे जगावेगळे होम कॉरंनटाईन. आता माझ्या जवळ पर्याय नव्हता, माझे चुकलेपण डॉक्टरांनी मना करूनपण स्वैपाक मीच केला. पहिले दोन दिवस नवरयाचा प्रयत्न म्हणून वरणभात खाल्ला पण लक्षात आले आपल्याला व्यवस्थित जेवले पाहिजे. साबनाने हात धुवून मास्क लावून स्वैपाक करायची, भांडी आधी आधी नवरा घासायचा नंतर मीच. कपडे मशीनला बाकी झाडलोट... मास्क लावून मुलीला आंघोळ, आवरण, भरवण करायचे. मधल्या काळात मुलीची आणि नवर्याची टेस्ट निगेटिव्ह आली...
मला खोकला बराच होता तेवढा त्रास सोडला तर जास्त काही नाही. मी सगळी कामं केली सोबतीला वर्क फ्रॉम होम पण होतेच पण बॉसने आधीच सांगितले होते झेपेल तेवढेच काम कर आराम महत्त्वाचा आहे. खोकल्यच्या औषधाने झोप यायची बाकी नो त्रास,ताप पण एकदाच आला.
मला असं वाटतं की माझा कोरोना सौम्य असावा किंवा मी आधीपासुन औषधे घेतल्याने त्रास कमी झाला.नंतर अॉक्सिजन लेव्हल पण ९८,९९,९७ आली. मला रेग्युलर काम केल्यामुळे कोरोना झालाय असे कधी वाटलेच नाही रोज संध्याकाळी आई आठवण करून द्यायची (ती दहा दिवसांत आली) आणि नातेवाईक पण होतेच!
मी विशेष वेगळे काही केले नाही हा झोपले खुप, माझी मुलगी मोबाईल बघत बसायची मी झोपल्यावर नशीब तिन काही उपद्व्याप नाही केला एरवी नाकीनऊ आणते. वाफ घेतली खोकला होता म्हणून. चिकन पण खाल्ले़ .असा हा माझा कोरोना मला माहितेय मी चुकलेय पण पर्याय नव्हता. पण हा माझा अनुभव आहे आपण आपल्या डॉक्टर चा ऐकावे.
प्लिज फेसबुक वर कोणी उल्लेख करु नका.... चूका सांभाळून घया खुप वर्षानंतर लिहिले आहे. बाकी नियमित वाचक आहेच पण आधीचे कोणी दिसत नाही आता. असो पुणेकरांचा पेटंट डायलॉग पुलंनी म्हटल्याप्रमाणे....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे, करोना असूनही तुम्हीच स्वयंपाक आणि इतर कामे केलीत घरची!

तुम्ही एवढ्या खंबीरपणे सगळे केले त्याबद्दल ब्राव्हो. पण इतरांना लागण होण्याची शक्यता असते, तुम्ही स्वयंपाक, कामे करूनही तसे काही झाले नाही हे नशीब.

नुकताच होऊन गेलाय करोना तुम्हाला, काळजी घ्या, ऑल द बेस्ट.

छान लिहिलंत सीमा ताई... तुम्ही आणि आई लवकर बर्‍या झालात हा अनुभव खरेच मनाला खुप उभारी देऊन गेला.

कॉमन झाला तरी शेवटी करोना आहे तो. विश्रांती घ्यायलाच हवी. अशक्तपणा खुप जाणवतो असं ऐकून आहे. काळजी घेतली पाहिजे. बरी झालीस तरी आराम कर.

तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलाय त्याप्रमाणे खरंच चमत्कारिक अनुभव. आता कुणी म्हणेल असे करायला हवे होते, तसे नको तर तेदेखील तेवढेच खरे आहे. मात्र प्रॅक्टिकल पहायला करायला सध्यातरी सगळ्यांनाच जमणे हाताबाहेर आहे. तुम्ही केलेत ते योग्य म्हणविणारे नाही तसेच चूक आहे असेही नाही. ज्याने त्याने आपली विवेकबुद्धी वापरावी आणि ह्या संकटाशी दोन हात करावेत. अगदीच सैल वागण्याला अर्थ नाही तसाच परिस्थितीला न समजून केवळ नियम पाळण्यातही. ठणठणीत बऱ्या व्हा ह्याच मनापासून शुभेच्छा! Happy

शुभेच्छा तुम्हास... मात केलीत...

बादवे सरकारी टेस्ट निगेटिव्ह आणि प्रायव्हेट पोसीटीव हे डेंजर आहे...

आणखी बाब तुमच्या डॉक्टर बद्धल - "डॉक्टर बोलले होते लहान मुलांना कोरोना होत नाही
तुमच्याजवळच ठेवा"

हे खरे आहे का?

वाचून 'बापरे' झालं. जज करणार नाही, कारण ज्याची परिस्थिती त्यालाच माहीत असते.
चांगलं लिहिलंय. भडाभडा बोलल्यासारखं.

प्रतिसाद दिलाबदल धन्स.
१)अशक्तपणा सध्या तरी नाहीये पण तसही माझ रोजचच रूटीन चालू आहे त्यामुळे दमत नाही काळजी नक्कीच घेईल
२)लहान मुलांची प्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे त्यांना होण्याची शक्यता कमी असते शिवाय डॉ. असेही म्हटले की लहान मुलांमध्ये काहीतरी (हे माझ्या लक्षात नाही) आहे त्यामुळे
त्यांची बॉडी कोरोना एक्सेप्ट करत नाही, आता नक्की माहीत नाही पण सेम परिस्थिती मधे मलाच झाला, पण काळजी घ्यावी.टेस्ट करायला गेले तेव्हा दोन मुलांपैकी एकाला आणि त्यांच्या आईला झालेला पाहीला ४-५ एजची मुले होती आणि त्या तिघानांही सेंटर वर पाठवले गेले घरी कोणी नाही काय करणार?
३) आता मी मस्त आहे आज विलगीकरण संपते आहे, बारीक खोकला आहे तोही जाईल लवकरच
४)मला तर वाटतं कोरोना झाला तर एकदम एका फॅमिली ला व्हावा सगळे मिळून काम वैगरे करतील नॉर्मल लाईफ जगतील आणि पटकन नीट होतील.

जज करणार नाही, कारण ज्याची परिस्थिती त्यालाच माहीत असते. <<< + 11
फारसा त्रास न होता बाहेर पडलात , छान झालं. काळजी घ्या .

<<<जज करणार नाही, कारण ज्याची परिस्थिती त्यालाच माहीत असते. <<< + 11
फारसा त्रास न होता बाहेर पडलात , छान झालं. काळजी घ्या >>>+१११

लांब राहून सूचना/सल्ले देणे नेहमीच योग्य नसते हे खरे

अरे बापरे.
करोना सांभाळून बराच कामाचा लोड घेतलात. जमेल तशी विश्रांती घ्या.

खूप मनापासून लिहिलेत. तुम्ही दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक आणि शुभेच्छा !छान आराम करा, पौष्टिक खा, स्वतः ची आणि इतरांची काळजी घ्या.

खूप मनापासून लिहिलेत. तुम्ही दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक आणि शुभेच्छा !छान आराम करा, पौष्टिक खा, स्वतः ची आणि इतरांची काळजी घ्या.>>>>>+१