सकाळची वेळ होती.सगळेच प्रवासी आतुरतेने गाडीची वाट पाहत उभे होते.गाडी स्टँडला लागली आणि प्रवाशांची आत चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. मी पण कसाबसा आत चढलो आणि विंडो सीट पटकावली. माझ्या समोरच्या सीटवरील मुलगी अचानक उभी राहिली आणि कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पहायला लागली. मला वाटलं पर्स वैगरे पडली असेल कुठे, पण नंतर समजलं मोबाईल हरवला. मोबाईल हरवला हे ऐकताच माझा हात नकळत पॅन्टच्या खिशावर गेला. मोबाईलचा स्पर्श जाणवताच मला हायसं वाटलं. मुलगी अर्थातच गोंधळून गेली होती. याच्या त्याच्या मोबाईलवरून कॉल केला पण स्विच्ड ऑफ दाखवत होता. आजू बाजूला चोरासारख्या दिसणाऱ्या दोन चार लोकांवर मी तुच्छतेचा कटाक्ष टाकला. मी त्या मुलीच्या जागी असतो तर नक्कीच त्यांची झडती घेतली असती. माझं मन नकळत या पीढीची आणि आमच्या पीढीची तुलना करत बसलं. याच तंद्रीत मला कधी झोप लागली कळलंच नाही. कंडक्टरने माझ्या स्टॉपचं नाव घेतल्यावर मी खडबडून जागा झालो आणि घाई घाईत बसमधून उतरलो. माझी पावलं आपसूकच समोरच्या मोबाईल दुकानाकडे वळली. सिम कार्ड काढून हार्ड रिसेट केलेला मोबाईल दुकानदारासमोर ठेवत विचारलं "भैया बेचना है, कितने मे लोगे"
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
छान
छान
ह्ये बी शिकलाव की. धंद्यात
ह्ये बी शिकलाव की. धंद्यात स्वागत ह्ये भावा.
अय्यो ! छान आहे.
अय्यो ! छान आहे.
कथा माहित नाही पण ही कॅटेगरी
कथा माहित नाही पण ही कॅटेगरी जबरी आवडली आहे - १६६शब्द कथा
भारीच!
भारीच!
लिव्हा, लिव्हा. आणखी लिव्हा.
चांगलं लिहीलतं
चांगलं लिहीलतं
कड्डाक ......अप्रतिम....5
कड्डाक ......अप्रतिम....5 स्टार
मस्त
मस्त
मस्त लिहिलियं!
मस्त लिहिलियं!
वा:! मस्तं!!
वा:! मस्तं!!
अप्रतिम लेखन. एकदम डोळ्यात
अप्रतिम लेखन. एकदम डोळ्यात पाणी आले. पुढील कथेच्या आतुरतेने प्रतीक्षेत.
सगळ्या वाचकांचे मनापासून
सगळ्या वाचकांचे मनापासून धन्यवाद..
ट्रेनची बस कशी झाली?
ट्रेनची बस कशी झाली?
मस्त लिहिलय!
मस्त लिहिलय!
आवडली. ट्विस्ट भारी होता.
आवडली. ट्विस्ट भारी होता. तुमच्या भुतयुद्ध कथाएव्हढीच रम्य कथा होती
आणि कथा संपल्यावर शब्द मोजून 166 शब्दकथा असा उल्लेख करण्याचा आत्मविश्वास तर भारीच
भारी
भारी
166शब्दकथा हा प्रकार मराठी भाषेला बहाल केलात बोकलत, अभिनंदन
गाडी स्टेशनला लागली आणि
गाडी स्टेशनला लागली आणि प्रवाशांची आत चढण्यासाठी एकच झुंबड उडाली>>>
कंडक्टरने माझ्या स्टॉपचं नाव घेतल्यावर मी खडबडून जागा झालो आणि घाई घाईत बसमधून उतरलो.>>>
छान वेगवान कथानक...
सगळ्या वाचकांचे परत एकदा
सगळ्या वाचकांचे परत एकदा धन्यवाद, खरं म्हणजे मी स्टेशनवर रेल्वे पकडायलाच उभा होतो पण अचानक बस आली, सगळे चढायला लागले मग मी पण चढलो.
पण रेल्वे स्टेशनवर बस आलीच
पण रेल्वे स्टेशनवर बस आलीच कशी?
हे सगळं स्वप्नात झालं की काय? असं परिवर्तन स्वप्नांत होत असतं......
'स्टेशन'च्या ऐवजी बस स्टँड/
'स्टेशन'च्या ऐवजी बस स्टँड/ स्टॉप करून टाका.
तुम्ही म्हणताय म्हणून स्टँड
तुम्ही म्हणताय म्हणून स्टँड केला, पण मी खरोखर स्टेशनवर उभा होतो आणि रेल्वे ऐवजी बस आली.
ही बस का?https://youtu.be
ही बस का?
https://youtu.be/VD5bJdRLQPA
बोकलत ये बात हजम नही हुई.
बोकलत ये बात हजम नही हुई. येतो अमानवीय परकार आहे.
(No subject)
झकास, आवडली गोष्ट.
झकास, आवडली गोष्ट.
१६६ शब्द कथा हे तर एकदम बेष्ट.
भारी ट्विस्ट!!! मस्तच...
भारी ट्विस्ट!!!
मस्तच...
धन्यवाद...
धन्यवाद...
बोकलत तुम्हाला अमानवीय
बोकलत तुम्हाला अमानवीय धागाप्रेमींचा धन्यवाद.
छानच ट्विस्ट भारीच आहे ..
छानच ट्विस्ट भारीच आहे ..
(No subject)
Pages