रुग्णालयात दाखल रुग्णांना कामी येणाऱ्या वेबसाइट्स अथवा ऍप

Submitted by फलक से जुदा on 12 September, 2020 - 14:00

जवळचे नातेवाईक रुग्णालयात आहेत isolation मध्ये.
अशा रुग्णांना कामी येतील अशा वेबसाईट ची यादी बनवूया.

मी सुरुवात करतो -

esakal.com : वृत्त्तपत्राला पर्याय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेपरांच्या apps मध्ये ऐकण्याची सोय असते. काही eBook reader appsमध्येही ऐकण्याची सोय असते. हेडफोनस वापरायचे.

YouTube video यांचे ओडिओ mp3 करायच्या साइट्स आहेत. गाणीविडिओंंचे ओडिओ करा आणि ऐका.

भाषा शिका.

"pinterest"
वेबसाईट किंवा अँप.... दुसरं काहीही लागणार नाही
चित्र, कोडी, कॅलिग्राफी, क्राफ्ट,भाषा,नेलार्ट, अगदी काहीही.… असंख्य प्रकार पाहता,शिकता येतील

मुळात आयसोलेशनमध्ये

मुळात आयसोलेशनमध्ये असलेल्यांची वैयक्तिक आवड काय आहे त्यावर हे अवलंबून आहे.

माझ्यासारखी व्यक्ती बातम्यांवर पहिले फुल्ल्या मारेल Lol

डोक्याला ताप नाही अशा काही वेबसिरिज किंवा सिनेमे - नेटफ्लिक्स आणि प्राईमचा पुरेपूर वापर Wink , आवडते संगीत, ऑडीओ बूक, कवितेचं पान आणि रंगपंढरी सारखे यूट्यूब व्हिडीओ सिरीज हे आवड असेल त्याप्रमाणे करता येईल त्यांना.

काही आयसोलेशन सेंटर मधे स्क्रिन लावलेल्या असतात आणि त्यावर ऑपरेटरची आवड सुरु असते Lol त्यांची आणि ऑपरेटरची आवड जुळली तर बहारच

आध्यात्मिक आवड असेल तर तसे व्हिडीओ ऑडीओ यूट्यूबवर बघता येतील

घरातल्यांना किंवा ताण दूर करतील अशी खात्री असलेल्या मित्रमैत्रिणी/नातेवाईक यापैकी कोणालाही अधूनमधून व्हिडीओ कॉल केला की मूड रिफ्रेश होतो

आणि बहुतेक ठिकाणी सात तर काही ठिकाणी दहा दिवस ठेवतात आयसोलेशन सेंटरमध्ये. पलक छपकते सात दिन बीत जाएंगे और मै फिरसे घर पे रहुंगा/ गी असा विचार करुन एक नवा अनुभव मिळतोय असे म्हंटले की सोपे होते थोडे.

तुमच्या आयसोलेशनमधल्या नातेवाईकांना लवकर बरे वाटो अशा शुभेच्छा!

लवकर बरं वाटूदे
अश्या वेळी आवडत असल्यास आणि कंटेंट निवडण्याची परवानगी असल्यास फ्रेंड्स, प्राईम वर जबान संभालके, बिग बँग थिअरी , अंगूर नक्की बघावेत.

सर्वांचे मनापासून धन्यवाद.

आशा करतो की कोणालाही असं isolation मध्ये रहायला लागू नये.

काही अपरिहार्य कारणास्तव एकटं राहण्याची वेळ आलीच तर हा धागा त्यांच्या जरूर कमी यावा|