काहीच्या काही कविता

Submitted by द्वैत on 8 September, 2020 - 09:48

काहीच्या काही कविता

अटक मटक चवळी चटक
मास्क न लावता गावभर भटक

गावभर भटकून भरला ताप
खोकून खोकून लागली धाप

धापा टाकत डॉक्टर शोधा
ऑक्सिजन साठी पैसे मोजा

पैसे जाती खूप खूप
बोंबलत बसा लावलीय लूट

म्हणून सांगतो लावा मास्क
टळेल सारा पुढचा त्रास

चालता बोलता ठेवा अंतर
करोना होईल छुमंतर

वारंवार धुवा साबणाने हात
तेव्हा होईल करोनावर मात

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.