मिशन मंगळ

Submitted by एविता on 7 September, 2020 - 01:35

मिशन मंगळ

२० ऑगस्टला इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार मध्ये आम्ही भाग घेतला होता. इस्रोचे खाजगीकरण होणार आहे अशा चर्चा बऱ्याच काळ चालत होत्या परंतु तसे काहीच होणार नाही, पण खासगी कंपन्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असं इस्रो चेअरमन के सिवन म्हणाले. खासगी कंपन्या इस्रोसोबत अंतराळ मोहिमांत भाग घेतील परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील असं ही ते म्हणाले.

इस्रो आता सध्या रॉकेट आणि सॅटेलाईट बनवण्यात सक्षम आहे. अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या त्यांनी केलेल्या घोषणे नंतर खासगी कंपन्याही अशी साधनं बनवण्यात मदत करतील. त्यामुळे जास्तीत जास्त सॅटेलाईट अवकाशात सोडता येतील, असंही के. सिवन यांनी म्हटलं. खासगी क्षेत्राला अंतराळात रॉकेट, उपग्रह निर्माण आणि प्रक्षेपण सेवा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. अमेरिका आणि युरोप मधील काही देशांमध्ये खासगी कंपन्यांचा सहभाग पूर्वीपासून आहे.

हे सांगायचं कारण म्हणजे मी आणि ऋषि अशी खाजगी कंपनी स्थापन करत आहोत, KRARERISS.

कृष्णा, राधा, ऋषि, एविता, रमा (आमची मुलगी) इशान, इरा, इप्सित यांच्यातली अध्याक्षरे आणि पुढचे दोन एस एस म्हणजे स्पेस सिस्टीम.

माझ्या "पायातली साखळी" या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल मी तुमची शतशः आभारी राहीन. माबोवर मी अगदी नवखी आहे. तुम्ही सगळे वरिष्ठ आहात त्यामुळे माझा लेख वाचून काहींना खटकले असेल तर सॉरी, मनापासून सॉरी. ज्यांना आवडला त्यांचे शतशः धन्यवाद, थँक्यू, आभार.

मला, म्हणजे आम्हाला तुमचे आशिर्वाद हवे आहेत. आम्ही या क्षेत्रात उतरत आहोत कारण आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला हातभार लावावा आणि देशाची, या मातीची सेवा घडावी या उद्देशाने. त्यासाठी तुमच्या शुभेच्छा ऊर्जा देतील, बळ देतील.

माझ्या काही मित्र मैत्रिणी अमेरिकेतील नासा साठी अशी कामे करतात, त्यांनीही मदत करण्याची उत्सुकता दाखवली आहे.

एक गोष्ट नमूद करते. तुमच्यामुळे माझं मराठी खूप सुधारलं. लेखनाला एक खोली आणि झळाळी प्राप्त झाली असं वाटतं. धन्यवाद.

मी आता काही महिने लिखाण करू शकणार नाही त्यामुळे तुमचा निरोप घेत आहे. परत नक्की भेटेन.

बाय बाय,

तुमची लाडकी आणि दोडकी!!!

एविता.

Group content visibility: 
Use group defaults

मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
स्थिरस्थावर व्हाल, ( हे अर्थात नक्कीच.) नवनवे अनुभव जमा कराल तेव्हा इथे येऊन ती पोतडी आमच्यासमोर रिकामी करा एवढंच मागणं. लई न्हाय .

छान, तुम्हाला शुभेच्छा. तुमची कंपनी या क्षेत्रात काय काम करणार हे थोडक्यात सांगता येईल का?

प्रिय एविता,
गेले काही महिने तुझ्या लेखांमुळे तु मला खुप निखळ आनंद दिला आहेस.
माबो वरती गेले काही महिने कोरोना, सुशांतसिंग, मोदी, ठाकरे ई ई विषयांवरचे धागेच दिसत होते. आणि त्यात एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप हे आणि एवढेच...असो...( गणेशोत्सवाचे १० दिवसाचा अपवाद वगळता )
खुप कमी लेखक आहेत ज्यांचे नाव माबोवर झळकले की लगेच वाचावेसे वाटते आणि त्यातुन कधीच अपेक्षाभंग होत नाही. केवळ आणि केवळ पॉझिटीव्ह वाईब्स च मिळतात.
तु माझ्यासाठी त्यापैकी एक आहेस...( मनीमोहोर , अर्निका, दाद, जागु, कुलु ही अजुन काही माझी आवडती नावे...पण बरेच दिवसात त्यांचे पण लिखाण वाचायला मिळाले नाहिये ...लवकर या रे सगळेजण परत...:-) )
तुम्हा सगळ्यांच्या नवीन उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा....
तुझ्या नवीन कंपनी मुळे तु खुप बिझी असशील मान्य आहे. पण तरी विनंती आहे की खुप मोठा ब्रेक घेउ नकोस..लवकर परत ये..
तु, ऋषि, तुझे सासु सासरे यांच्यातले अजुन छान छान किस्से येउदेत...तुझे नवीन कंपनीचे अनुभव येउदेत...
keep in touch...:-)

- तुझी मनापासुन चाहती,
स्मिता श्रीपाद

स्मिता श्रीपाद>>>>>

संपूर्ण पोस्टसाठी मम्

All the best Evita.. We are going to miss your family stories here. Keep writing whenever possible

मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुम्हांला...

अभिनंदन एविता. मंजूताई, मी घाईत ख्यालीखुशाली ऐवजी खाली येऊन खुशाली असं वाचलं. नासा चं वाचल्याने हा घोटाळा. Proud

अरे वा एविता आता वेगळं पर्व सुरू होणार तर तुझ्या आयुष्यात. मनापासून शुभेच्छा. मंजूताई नी लिहिल्याप्रमाणे मध्ये मध्ये येऊन खुशाली कळवत जा, आणि ते कळवतात छोटे मोठे किस्से तर सांगशील. तुझ्या संपूर्ण कुटूंबाला मिस करणार मी. ह्या बातमी बरोबर तुला आणि ऋषीन ला रमा नावाची मुलगी आहे हा संदर्भ पहिल्यांदाच आलाय ना? तर अभिनंदन त्याबद्दल. ह्याचीही एक गोष्ट नक्कीच असेल. ऐकायला, वाचायला आवडेल.
ही "मिशन मंगळ" सुद्धा सुरवातीला मला गोष्ट च वाटली . Happy

मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
स्थिरस्थावर व्हाल, ( हे अर्थात नक्कीच.) नवनवे अनुभव जमा कराल तेव्हा इथे येऊन ती पोतडी आमच्यासमोर रिकामी करा एवढंच मागणं. लई न्हाय .
>>> +१

मायबोलीवर हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे. एविता, तुझे लिखाण खूप आवडते. सहज सुंदर शब्दात तू प्रसंग डोळ्यासमोर उभे करतेस. तुला शुभेच्छा.

एविता तुम्हाला तुमच्या स्टार्टअप साठी खूप खूप शुभेच्छा..
तुमच्या स्टार्टअप मधल्या पण गमती जमती वाचायला आवडतील..

अभिनंदन आणि शुभेच्छा.

तुमचे दोनेकच लेख वाचणे झाले होते. पण दोन्ही गोड लिहिलेले. माझ्यासह बरेच माबोकरांना आपण लिहिलेले आवडत होते. त्यामुळे माबोकरांचे हे एक नुकसानच म्हणायला हवे. बरेच चांगल्या लेखकांनी ईथून चांगल्यावाईट कारणांसाठी वेळेआधी एक्जिट घेतली आहे. आपले कारण चांगले आहे यातच आनंद मानुयात Happy

आम्ही या क्षेत्रात उतरत आहोत कारण आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला हातभार लावावा आणि देशाची, या मातीची सेवा घडावी या उद्देशाने. >>>
अत्यंत चांगला उद्देश आहे. तुम्हाला खूप यश व आनंद मिळो. शुभेच्छा.

Pages