आज मुलींसाठी संध्याकाळचे खाणे करायचे होते. शिवाय फास्टफूड स्पर्धेत भाग घ्यावा का हा विचार मनात होताच. मग दोन्ही गोष्टींची सांगड घालत हे बर्ड्स नेस्ट बनवले.
हे म्हणजे आपले कटलेट्सच फक्त वेगळ्या रुपात.
तर साहीत्य बघुया.
तिन मध्यम उकडलेले बटाटे,
एक चमचा आलं, लसुण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट,
धणे, जीरे पुड,
चिमुटभर आमचूर आणी गरम मसाला,
पाव कप जरासे वाफवलेले मटारचे दाणे,
एक चमचा कॉर्नफ्लोअर,
चवीनुसार मीठ.
हे साहीत्य एकत्र करून गोळा बनवून घ्या.
एका वाटीत कॉर्नफ्लोअर ची किंचित पातळ पेस्ट बनवा.
भाजलेल्या शेवया एका प्लेटमध्ये घ्या.
बटाट्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन जरा वाटीसारखा आकार द्या.
कॉर्नफ्लोअर च्या पेस्टमध्ये बुडवून शेवयांमध्ये घोळवा. सगळे कटलेट्स बनवून झाल्यावर पंधरा मिनीटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर तळून घ्या.
नेस्टमध्ये ठेवलेली अंडी बनवण्यासाठी थोडे पनीर मळून घेतले. मीठ आणी मिरपूड घालून छोटे छोटे गोळे बनवून तळले.
एक नेस्ट घेऊन त्यात थोडी पुदीना चटणी लावली आणी पनीरचे अंडे ठेवले कि बर्ड्स नेस्ट तयार!!
एकदम भारी दिसतय. छानच .
एकदम भारी दिसतय. छानच .
भारी कल्पना आणि एग्झिक्यूशन!
भारी कल्पना आणि एग्झिक्यूशन! मस्तच दिसताहेत घरटी!
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
वॉव.. उपाशी मारेल हा पदार्थ..
वॉव.. उपाशी मारेल हा पदार्थ.. खावे की बघतच राहावे.. टोटल कन्फ्यूजन
भारी. पुण्यात एका
भारी. पुण्यात एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ले होते पण त्यांनी बटाट्याच्या सळ्या वाटीत घालून तळल्या होत्या आणि त्यात चीझ वगैरे मालमसाला होता.
बायांनो काय काय करता गं ..
बायांनो काय काय करता गं .. साष्टांग दंडवत.
ते पक्षी पण खायचेत का? Lol>>>>>>>>>>>> माझंही तिकडेच लक्ष गेलं. म्हटलं हे उकडीचे वगैरे किंवा उरलेल्या पनीरचे केले की काय ? कृपया हलके घ्या
मस्तच दिसत आहे!
मस्तच दिसत आहे!
सुबर्प
सुपर्ब
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
धन्यवाद बोकलत आणी कविन
धन्यवाद बोकलत आणी कविन
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
(No subject)
अभिनंदन निलाक्षी
अभिनंदन निलाक्षी
अतिशय गोंडस प्लेटिंग आणि पदार्थ.
(माझे पहिले मत तसे ब्रेड मोदक ला होते.)
Pages