अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भूत ही संकल्पना जगात थोड्याबहुत फरकाने सर्वत्र आढळते आणि या संकल्पना पूर्वापार चालत आलेल्या आहेत. माझ्या निरीक्षणानुसार, एका गोष्टीत साम्य काहीसे साम्य आढळले ती म्हणजे भुताच्या बसण्याच्या जागेत. 

सर्वात प्रथम वाक्प्रचार:
' तुझ्या मानगुटीवर कोणते भूत बसले आहे?'
' उसपे कोनसा भूत सवार था क्या पता?'

एक मूव्ही (थाई मूव्ही - शटर )
https://www.channelnewsasia.com/image/11775170/1x1/600/600/9ce6eea8427cd4d84b7d1d263ab4e6ee/pK/photo-shutter-movie-still.jpg  

आफ्रिकेमधील वुडू जमात 
https://youtu.be/2YIO_dxyJio

या  डॉक्युमेंटरी  नुसार आवाहन केलेले आत्मे त्या मीडिएटर च्या मानेवर बसतात, त्यामुळे तो वेड्यावाकड्या झोकांड्या खातो . ( हा प्रकार आपल्याकडे जसे अंगात येऊन घुमतात तसाच वाटतो )

आता चर्चेला मुद्दा हा की - इतक्या भिन्न संन्स्कृतीं मध्ये ज्या वेगवेगळ्या खंडामध्ये पसरल्या आहेत त्यात हे साम्य कसे?
दुसरा प्रश्न - जर खरेच भुते मानगुटीवर बसत असतील, तर आपल्या मानेमध्ये असे कोणते तरी गुप्त बटन असेल का, ज्या द्वारे माणसाच्या मनाचा ताबा घेता येऊ शकतो?

मी साधारण ९ वर्षांचा असेन. एकदा माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला जबरदस्तीने त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत नेले. मी तर त्यांच्या मित्राला ओळखत देखील नव्हतो.
ज्या वेळी मी स्मशानभूमीत गेलो त्या वेळी सर्व कार्य चालू असताना एका कोपऱ्यात उभा राहिलो व होणारे विधी पहात राहिलो. तेवढ्यात एक जण माझ्या कडे आला व म्हणाला बाळा कायम सुखी राहण्याचा प्रयत्न कर, आनंदात आयुष्य जगून घे. माझ्याकडे बघ. माझ्याकडे सर्व साधने असताना सुद्धा मी आयुष्याचा उपभोग घेऊ शकलो नाही. एवढे बोलून माझ्या डोक्यावरून हात फिरवून तो निघून गेला.
थोड्यावेळाने माझ्या वडिलांनी मला पार्थिवाला नमस्कार करण्यास बोलविले. मी नमस्कार करताना पार्थिवाच्या चेहेऱ्याकडे बघितले व हादरलोच.... अरे हा तर तोच माणूस होता जो थोड्यावेळापूर्वी माझ्याशी बोलत होता.
या घटनेचा माझ्यावर भयंकर परिणाम झाला. मी त्या नंतर कित्येक वर्षे नीट झोपू शकलो नाही. बऱ्याच वेळा रात्री दचकून उठत असे. मला मानसिक त्रास सुरू झाला व बरीच वर्षे त्यावर उपाय सुरु होते. मला रात्री एकटे व दिवे बंद करून झोपायला भीती वाटत असे. माझ्या उमेदीची बरीच वर्षे यात निघुन गेली.

कित्येक वर्षांनी एक विस्मयकारक घटना अशी कळली की ज्याने माझे आयुष्यच बदलले
.
.
.
.
.
.
.
.
.

त्या माणसाला एक जुळा भाऊ होता

मागच्या वर्षीची गोष्ट आहे. एका मित्रांच्या कार्यक्रमासाठी माझा मुलगा पुण्यात गेलेला. का कोण जाणे, मी त्याला जाऊ नको म्हणत होते. बहुतेक त्या दिवशी अमावस्या होती. तरी तो गेला. मी अधून मधून फोन करुन त्याला लवकर निघायला सांगत होते. निघालोय म्हणाला. पण रात्री उशीर झाला तरी तो घरी पोहोचला नाही. मी फार काळजीत पडले. परत मोबाईल लावला तर तो भूमकर चौकात होता. पोहोचेल म्हणून मी वाट पाहत झोपले. परत मला दचकून जाग आली. रात्रीचे १२ वाजून गेले होते. माझे त्याच्याशी बोलणे होवून २ तास झाले होते. इतका वेळ लागायचे काहीच कारण नव्हते.

आता मला भिती वाटू लागली. , मी परत त्याला फोन लावला तर भूमकर चौकातच होता व फिरुन फिरुन पेट्रोल संपले म्हटला. मोबाईल पण बंद पडण्याच्या मार्गावर होता. आता माझा धीर सुटला. मी पटकन त्याच्या मित्राला फोन करुन मुलाचे लोकेशन सांगितले व त्याला घेवून यायला सांगितले. तो मित्र लगेच गाडी घेवून गेला. मुलाला घेवून त्याच्या घरी गेला व तिथेच झोपले.
मुलाला तिथे चकवा लागला होता, किती तास तिथेच फिरत होता. परत कधी मी त्याला रात्री एकट्याला कुठे पाठवले नाही.

भूमकर चौकात चकवा?
बाप रे.. जपून राहायला हवं >> हो गं...मला पण तेव्हाच कळलं ते ! अजून ही अंगावर काटा येतो आठवले तरी!

पूर्वी कितीतरी वेळा आम्ही तिथून गेलोय रात्री १ला वगैरे, दोघेच असे, एक common मित्र राहतो त्याला रात्री 12 वाजता birthday surprise दयायला .
काही जाणवलं नाही पण

वाकड जवळ, चिंचवड कडे जाताना, highway च्या खाली.
नेहमी traffic jam असतं. हिंजवडी ला जाणारी जनता तिथे अडकलेली असते.
पावसाळयात पाणी भरतं.
मागच्या वर्षीच्या भयानक पावसात भूमकर चौक पावसामुळे खड्यात पाणी भरून बंद झाला होता.
ही तुम्हाला आता नको असलेली पण माझ्याकडे असलेली माहिती आठवली.

मला exact सांगता येत नाहीये नेमकं कुठे ते

भूमकर चौक कुठे आहे पुण्यात? >>चिंचवडमधे, बंगलोर हायवेला! प्रतिभा कॉलेज आहे तिथे.

दोघे असतांना नसेल जाणवत अगं!

खरच असतो काय चकवा???>>
याचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीय तर हो आणि नाही दोन्हीही आहे.
ज्यांना खरंच चकवा असतो असं वाटतं त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना असेलही खरंच असं वाटतं, किंवा ज्यांना एकीकडे नसतो असं वाटतं पण मनात किंतु असतो -पण असेल तर? - त्यांच्यासाठी चकवा खरंच असतो.

ज्यांना चकवा खरंच नसतो असे ठामपणे वाटते त्यांच्यासाठी नसतो.

मग मुलाला आलेला अनुभव काय म्हणाल? बरं तो चकवा होता हे मी त्याला अजून ही साम्गितलेल नाही. तो तसंही भूताखेताच काही वाचत पण नाही.

आमच्या गावाला एकदा म्हशी चोरीला गेल्या होत्या तेव्हा माझे काका आणि चार पाच जण त्या शोधायला माळरानावर गेले होते. तेव्हा त्यांना चकवा लागला होता. त्यांना माहीत होतं त्या जागी चकवा लागतो म्हणून त्यांनी सोबत एक मांत्रिक नेला होता. त्याने त्यांना सही सलामत बाहेर काढला.

शारीरिक, मानसिक थकव्यामुळे + काही फॅक्टर्स मुळे मेंदूच्या ठरावीक भागात रक्तपुरवठा कमी झाल्याने असं होतं. अशा वेळी विशेषतः रात्री दिशेचं भान चांगलंच गंडतं.
मी एका पावसाळी रात्री नेहमीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने ट्राफिक खूप जाम होते म्हणून मिलिटरी कॅम्प एरियातुन बाहेर वळसा घालून जाणारा रस्ता मॅपवर शोधून निघालो. खूप थकलो होतो, आदल्या काही रात्री जागरणे झाली होती. एक टर्न घेतला आणि त्यावर किती वेळ गेला हेच नंतर आठवेना. एवढा आपल्या तंद्रीत होतो. आजूबाजूला सगळी झाडी विचारायला कोणी नाही, अंदाज घेत, मॅप बघत - नेमके नीट नेटवर्क मिळत नव्हते, जवळ जवळ तासाभराने ओळखीच्या एका रस्त्याला लागलो, जिथुन वस्ती सुरू व्हायला अजून अर्धा तास लागला आणि ऐन रहदारीच्या रस्त्याला लागलो. ही अलीकडची म्हणजे साधारण चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. होते असे कधी कधी. आधी पण ३ - ४ वेळा झाले आहे.

आईच्या गोष्टी ऐकून आम्ही तीला म्हणायचो, तुला भास झाले असतील.तेच ते विचार करून नजरेसमोर तेच दिसले असेल.

एकदा तर स्वारगेटहून भर दिवसा आईला घरी यायचा रस्ता सुचेना दहा मिनटं अंतरावर घर असताना कारण घरातून जास्त बाहेर पडत नसायची आणि गर्दी बघून गोंधळलेली.

मला स्वतःला नाही आला कधी अनुभव पण एक-दोघांकडुन ऐकलय या चकव्या बद्दल. मी बऱ्याचदा पुण्यात नवीन असताना रस्ता चुकून लांब दुसरीकडेच पोहोचायचो पण साला अपुनका नसीबच गंडका ये चकवा अपुनको नही मिला कभी.

मान्य! पण मुलगा ना दमलेला होता, ना रस्ता चुकला होता. त्याच गोलात फिरत होता. फक्त किती वेळ ते त्याला कळले नाही. मी फोन वरुन संपर्कात होतेच.
मी म्हटले, पेट्रोल संपले, फोन बंद..घरी कसा आला असतास? तर मला म्हणाला, मी पोलीसांना बोलावून घरी आलो असतो. Happy

मानवकाका, भूतांवर माझा पण विश्वास नाहीये, पण आलेला अनुभव मी नाकारणार नाही Happy

Pages