पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna

Submitted by ShitalKrishna on 27 August, 2020 - 12:32

Chocolate brownie Modak 'मोदक' Version 1.0

साहित्य :

पारी - उकड - 1 वाटी रवा, दीड वाटी पाणी, पाव चमचा मीठ, पाव वाटी चॉकलेट पावडर, पाव वाटी साखर, 1 चमचा तूप.

(फक्त रव्याचे मोदक साठी सवा वाटी पाणी पुरे, इथे पाव कप चॉकलेट पावडर घेतली आहे, त्यामुळे दीड वाटी पाणी)

सारण- stuffing -
डार्क चॉकलेट कंपाऊंड तुकडे, व्हाईट चॉकलेट कंपाऊंड तुकडे, ड्रायफ्रूटसची भरड तुपात भाजलेली

कृती:
1. दीड वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप, मीठ, साखर घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. रवा आणि चॉकलेट पावडर एकत्र करून चाळून घ्या. हे मिश्रण हळूहळू उकळत्या पाण्यात सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. उकड मळून घ्या.
5. मोदक वळा.
6. आत मध्ये 1चमचा ड्रायफ्रूट्स भरड आणि चॉकलेट तुकडे घाला.
7. 5 मिनिट वाफवून घ्या.

क्रमवार फोटो:

1. उकड

IMG-20200827-WA0043.jpg

2. चोकलेट तुकडे (white n dark chocolate compound)

IMG-20200827-WA0046.jpg

3. तुपात परतलेली ड्रायफ्रुटस भरड

IMG-20200827-WA0045.jpg

4. मोदक पारी

IMG-20200827-WA0038.jpg

5. सारण भरले

IMG-20200827-WA0037.jpg

6. मोदक तयार

IMG-20200827-WA0030.jpg

7. वाफवण्यापूर्वी

IMG-20200827-WA0031.jpg

8. वाफवल्यावर

IMG-20200827-WA0036.jpg

9. उकलून

IMG-20200827-WA0026.jpg

अजून एक फोटो

IMG-20200827-WA0018.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नावीन्यपूर्ण.
उकडल्यानंतर मस्त तुकतुकीत दिसत आहेत मोदक!
चहा कॉफी बरोबर मस्त लागतील.
एका छान रेसिपीबद्दल अभिनंदन व धन्यवाद

धन्यवाद सगळ्यांना Happy

जिज्ञासा तुम्ही कोणताही permutation combination करु शकता.. texture changes little. Turns softer.

Pages