आमचा बाप्पा

Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 10:07

नमस्कार मायबोलीकर,

प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
चला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा बाप्पा
IMG_20200823_121202_0.jpg

गौरी किती छान आहेत....

कधीही उठतील आणि म्हणतील, चला आवरून घेउयात.. केवढा पसारा पडलाय असं वाटतेय बघून Happy

Pages