कोण कुणी कुणाचे

Submitted by मुक्ता.... on 25 August, 2020 - 04:24

कोण कुणी कुणाचे?

कुणी कुणाच्या काळजात नाही
कुणी कुणाच्या काळजीत नाही
कुणी कुणाला ओळखत नाही
आजकाल,
प्रेम कुणी डाव्या खिशातही बाळगत नाही!!!

कुणी कुणाला दारात उभं करत नाही
कुणी कुणाला घरात घेतही नाही...
कुणी कुणाला आपलं म्हणत नाही..
आजकाल,
देवळातला देव आपले दार उघडत नाही!!!

कुणी कुणाला दान देत नाही
कुणी कुणाच्या दुआ घेत नाही..
कुणाला कुणाची रिकामी झोळी दिसत नाही...
आजकाल,
माझेच माझ्या कमाईत भागत नाही
आणि
दान देण्यासारखे सत्पात्र विश्वास ठेवण्यासारखेच नाही...

देह कुणाचाही असो
कोणत्याही जिवाणू विषाणूची बाधा असो...
मृत्यू कुठलाच भेद करत नाही...
सगळ्याच मातीत सगळेच मिसळते..
नवीन देहात याचे त्याला पुन्हा पुन्हा मिळते...
तेव्हा कुणाला,
गतजन्मीच्या धर्मपंथांचे स्मरण होते?
आजकाल,
शाश्वत सत्य कुणाकुणाच्या अंतरात जागृत असते??

मुक्ता....
25 ऑगस्ट 2020

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मृत्यू कुठलाच भेद करत नाही...
सगळ्याच मातीत सगळेच मिसळते..>>>>> सत्यवचन

माझेच माझ्या कमाईत भगत नाही>>>>> भागत नाही.
मी कुठून गं आले कवितेत.. Happy

मन्या Happy केलीय दुरुस्ती