आठवणींच्या राज्यात- किस्सा़ ५ भांडकुदळ काकू

Submitted by पूजा जोशी on 24 August, 2020 - 08:53

भांडकुदळ काकू

मुल निरागस असतात. ती स्पष्ट बोलतात, त्यांच्या मनात काही नसतं आणि, आणिक काय?आणि अनेकदा आईवडील त्यांच्या अनपेक्षित बोलण्याने तोंडघशी पडतात. त्याचीच ही कथा.

अशाच एका निवांत दुपारी माझी आई व तिची शेजारीण शिळोप्याच्या गप्पा मारत बसल्या होत्या. नील शेजारीच त्याच्या सर्व गाडय़ा मांडून traffic jam चा खेळ करत होता.सदैव मुंबईत राहील्या मुळे त्याने traffic jam सोडून रस्त्यावर काही पाहीलं नाही. असो.

तेवढ्यात खाली काही तरी गलका झाला म्हणून आई व शेजारीण आमच्या घराच्या पाचव्या मजल्यावरून परिस्थितीचा आढावा घेवू लागल्या. तळमजल्यावरच्या कदम बाई, मुलांना दुपारी खेळतात म्हणून त्यांच्यावर तोंडसुख घेत होत्या. झाल! आई आणि शेजारणीला नविन विषय मिळाला. कदम बाई कशा तापट आहेत. सोसायटीत कोणाशीच त्यांच पटत नाही. वाॅचमन, धोबी, दूधवाला आणि आता ही मुल सगळ्यांवर डाफरत असतात. मुल नाही खेळणार तर कोण खेळणार? इत्यादी.

विचार केला तर कदम बाई एका अर्थी बरोबर होत्या. तळमजल्यावरच्या लोकांना होणारा त्रास पाचव्या मजल्यावर राहणाऱ्यांना कसा कळणार? पण कानफाट्या नाव पडलेल्या कदम बाईंना ह्या बाबतीत benefit of doubt नाही मिळाला.

नीलने एकदाही ह्या संभाषणात भाग घेतला नाही की आपल अढळ पद सोडून तो वस्तूस्थिती पाहायला गेला नाही. अर्थात हे सगळं मला नंतर कळले.

तो विषय तिथेच संपला. फारस काही विशेष न घडल्यामुळे आईने मला ही गोष्ट सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नीलला सोडायला आईकडे गेले. मी लिफ्टची वाट पहात होते तेवढ्यात कदम बाई दार उघडून बाहेर जायला निघाल्या होत्या. नीलला शाळेच्या गणवेशात बघून चौकशी करू लागल्या, "शाळेत जायला लागला बाबू? मोठा झाला, छान दिसतो"

चिरंजीवांनी त्या विचारत असलेल्या प्रश्नांना बगल देऊन डायरेक्ट मुद्याला हात घातला, "काकू तुम्ही सगळ्यांशी सारख्या भांडत का असता?"

मला जाणवलं की माझ्या हाता पायातल अवसान गळाला आहे. मेली लिफ्ट पण लवकर येत नव्हती. आता आपल्या समोर काय वाढून ठेवलय ह्या विचाराने पोटात भीतीचा गोळा आला.

ह्या सोसायटीत राहायच तर भांडावच लागत अस काहीस कदम बाई नीलला सांगत होत्या पण ते शब्द माझ्या काना पर्यंत पोहचतच नव्हते. हे धरणीमाते मला पोटात घे अशी प्रार्थना मी मनातल्या मनात सुरू केली.तेवढ्यात लिफ्ट आली व आम्ही लिफ्ट मध्ये शिरलो.

कदम बाईंशी नजर मिळवायची हिम्मत माझ्यात नव्हती. जस जशी लिफ्ट वर जात होती कदम बाईं दिसेनाश्या होत होत्या आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका म्हणजे काय ह्याची प्रचिती मला येत होती .........

किस्सा क्रमांक 1
http://www.maayboli.com/node/58891

किस्सा क्रमांक 2
https://www.maayboli.com/node/58921

किस्सा क्रमांक ३
https://www.maayboli.com/node/76102

किस्सा क्रमांक ४
https://www.maayboli.com/node/76216

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Dhanyawad

खरंय।
मुलं कधी, कुठे काय बोलतील आपण अंदाज नाही लावू शकत.
असाच एक किस्सा.
माझा मुलगा 4 वर्षांचा होता तेव्हाचा, सासूबाई फोनवर त्याला विचारत होत्या, तू गावी कधी येणार? माझा मुलगा त्यांना म्हणाला आम्ही नाही येणार, माँ ला आवडत नाही तिकडे. नवरा समोरच होता. मला बाप रे।असं झालं.
मी नवर्याशी बोलताना मुलाने कधी ऐकले होते माहीत नाही. तेव्हापासून आम्ही मुलांसमोर खूप जपून बोलतो.
Happy