Submitted by vijaya kelkar on 22 August, 2020 - 05:05
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा । गौरीच्या नंदना ।
भक्तांची वंदना । स्विकारावी ।।(१)
राजस रुपडे । वक्रतुंडा गणेशा ।
तूचि प्रथमेशा । गणाधीशा ।। (२)
भाद्रपद मास । तिथी ती चतुर्थी ।
आमुचा अतिथी । गणनाथ ।। (३)
सजवा मखर । रेशमी आसन ।
मूषकवाहन । विराजावा ।।(४)
शोडशोपचारे । पुजावे गुणिना ।
गावे गजानना । दश दिना ।। (५)
नित्य स्तवनांती । हे मयुरेश्वरा ।
नमो विघ्नेश्वरा । साष्टांगेसी ।। (६)
प्रमोदा,पुरुषा । ओंकार, स्वरुपा ।
श्वेत, योगधीपा । कृपा करा ।। (७)
कपाळू कवीशा । भिम महाकाय ।
महा मृत्युंजय । देव देवा ।। (८)
विजया केळकर__________
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विजयाताई खूप छान लिहिलं आहे
विजयाताई खूप छान लिहिलं आहे
छान!
छान!
गणपती बाप्पा मोरया. _/\_
गणपती बाप्पा मोरया. _/\_
ॐ गं गणपतये नमः
ॐ गं गणपतये नमः
___/\___
सुंदर स्तवन...
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली_विशे पाटील आणि शशांक पुरंदरेजी सादर नमस्कार आणि मनस्वी धन्यवाद
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली_विशे पाटील आणि शशांक पुरंदरेजी सादर नमस्कार आणि मनस्वी धन्यवाद
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली
द्वैत, मानव पृथ्वीकर,रुपाली_विशे पाटील आणि शशांक पुरंदरेजी सादर नमस्कार आणि मनस्वी धन्यवाद
सुंदर स्तवन
सुंदर स्तवन
मस्तच.
मस्तच.
खूपच छान लिहिलंय!!!!
खूपच छान लिहिलंय!!!!