झाड!!!!

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 24 August, 2020 - 07:00

ही कविता माझे लाडके भाऊजी आदरणीय नाना-श्री वसंत विठ्ठलराव भिसेकर हडपसर पुणे यांना समर्पित
सध्या ते JSPM college हडपसर येथे वृक्षारोपण व संवर्धनाचं खूप मोठं कार्य त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं करतायत.ही कविता त्या सर्वांसाठी...

एक पक्षी डोकावला घराच्या खिडकीतून,
चोचीनं टकटकला तावदानावर
आहेस का मित्रा ?
त्यानं विचारलं डोळ्यांनीच
मी दिसताच चोचभर हसला
आनंदानं मान फिरवली
इकडून तिकडं, तिकडून इकडं
नाचायचाच बाकी होता तो
माझ्या घराशेजारचं माळरान त्यानं उघडंबोडकं पाहिलं असावं आधी कदाचित
सध्या त्यात होत असलेले बदल
पहात असावा तो आभाळभर फिरून-
त्याच्या डोळ्यात साठलय बहुतेक
माझ्यासाठीचं आपलेपण
म्हणूनच आला असावा तो मला शोधत
.
.
.
त्याआधी तो त्याच्या घरट्यासाठी
झाडं शोधत होता

शेखर किसनराव पालखे
110720

Group content visibility: 
Use group defaults