बदल

Submitted by मोहिनी१२३ on 19 August, 2020 - 14:26

अनंत प्रयत्नानंतर सुध्दा
माणसं आपल्याला फारशी धार्जिणी नाहीत
हे उमगल्यानंतर थोडे थांबावे

आपण दुसर्यासाठी न् दुसर्याला आपल्यासाठी बदलण्यासाठी होणारी तगमग थांबावी

आपल्याला आहे तसे लोकांना स्विकारता येत नाही हे ही मान्य करावे

आणि मग शाश्वत,अथांग अशा ज्ञानाच्या सागरात स्वत:ला झोकून द्यावे

ज्ञान - अपेक्षावाढीचे,अपेक्षापूर्तीचे आणि निरपेक्षतेकडे जायचे साधन

ज्ञान - रूक्ष सत्य आणि कल्पनांचे इंद्रधनुष्य

ज्ञान - माणुसघाणे न बनता दुसर्यांकडे आणि स्वत:कडे प्रेमळ, क्षमाशीलपणे बघण्याचा वास्तववादी मार्ग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान..
आपण दुसर्यासाठी न् दुसर्याला आपल्यासाठी बदलण्यासाठी होणारी तगमग थांबावी>> अगदी खरं..

>>>>>आपण दुसर्यासाठी न् दुसर्याला आपल्यासाठी बदलण्यासाठी होणारी तगमग थांबावी
छान विचार आहे. सत्य आहे.