डू लूप

Submitted by अनन्त्_यात्री on 9 June, 2020 - 07:00

माझ्या जुन्या पाऊस कवितांच्या व‌हीची शेकोटी केलीय‌
कशी रसरसून पेटलीय !
पण ना धग
ना धूर
मग
कसं येणार डोळ्यात पाणी ?
|
|
\/
मग
कशी होणार पाण्याची वाफ?
|
|
\/
मग
कसे बनणार वाफेचे ढग?
|
|
\/
मग
कसा बरसेल ढगातून पाऊस?
|
|
\/
मग
कशी लिहू पावसाची कविता?
|
|
\/
मग
कुठले कवितेचे कागद?
|
|
\/
मग
कुठली कागदांची शेकोटी
|
|
\/
मग
कुठला बेबंद धूर अन..

पण पण कसं आलं डोळ्यात हे अलोट पाणी?
|
|
\/
अन
का उसळतेय ही अनावर वाफ?-----> त्या वाफेचा गहिरा ढग?---->ढ‌ग‌फुटीचा पाऊस‍----->ओली कविता?---->भिज‌की व‌ही?--->विझती शेकोटी---->

Group content visibility: 
Use group defaults

Good

अफाट..

भिजकी वही ! अरुण कोलटकर आठवले.

इंद्रायणीत गाथा बुडवला तरी तरंगून येतोच वर
विश्वाचे आर्त बुडत नसते कधीच खोलवर
उसळून येतेच ठिणगी आणि दु:खाचे गहिवर
विसर्जन केले तरी सर्जनाची ओढ फोडतेच ऊर
आणि मोकाट सुसाटते बाहेर पुन: पुन्हा तशीच, तीच.