मुंग्यांचा बंदोबस्त कसा करावा

Submitted by Priya ruju on 17 August, 2020 - 14:35

घरात प्रचंड प्रमाणात काळ्या मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेमनग्रास तेल आणा. ते पाण्यात मिसळून फवारा मारा मग कोरड्या फडक्याने पुसा.
सगळे पदार्थ बंद डब्यात ठेवा. किचन कॅबीनेट स्वच्छ करून २-४ थेंब टिश्यूपेपरवर टाकून त्याने एक-एक कप्पा पुसून घ्या.
प्रत्येक कप्प्याच्या कोपऱ्यात लेग्रा तेलात भिजवलेला कापसाचा गोळा ठेवा. मुंग्या घरात शिरतात ती जागा शोधून तिथेही ठेवा.
रोज रात्री सगळे आवरल्यावर ओट्यावर फवारा मारून पुसून घ्या.
दर वर्षी उन्हाळा सुरू व्हायच्या आधी जेव्हा मुंग्या घरात शिरतात तेव्हा मी हा उपाय करते. १ आठवड्याने त्या परत येत नाहीत.

माझ्याकडे पण सध्या काळ्या मुंग्या प्रचंड झाल्यात . कुठून आत येतात तेच कळत नाहीये .
पावडर , खडू , हिट असे उपाय चालू आहेत . पण रोज तेच ,
सध्या तरी पाऊस कमी झाला कि कमी होतील याची अपेक्षा करतीये

काळ्या बिनचावऱ्यांना हाकलत नाही. त्रास आम्हाला तरी नसतो.
>>>

आमच्याकडे काळ्या मुंग्यांना देवाच्या मुंग्या बोलतात.
हाकलायला हरकत नही. मारायला जीववर येते.