Submitted by अनन्त्_यात्री on 3 July, 2020 - 23:28
माझ्या क्षणभंगुर कवितेवर
प्रतिसाद देणार्या क्षमाशील वाचकांनो,
ह्या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन.
धन्यवादाचा.
अन् मग
विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर
ह्या कवितेचं
काळंशार मायाळू खत होवो.
अन् मग
उपेक्षेच्या झळा सोसून,
दुर्बोधतेचे आरोप झेलून,
कोमेजलेली
कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता
त्या खतावर
पुन्हा जीव धरून तरारो.
अन् मग
विचक्षण वाचकांनो,
त्या बावनकशी कवितेचं असणं,
गारूड टाकणं,
अस्वस्थ करणारे
प्रश्न पाडणं,
सारं सारं
तुमच्यात
अनिर्बंध साथीसारखं
पसरत जावो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सहीय हे... !.. कोलटकरांची
सहीय हे... !.. ... कोलटकरांची आठवण झाली..
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
छान लिहिलयं..
छान लिहिलयं..
तुमच्या सर्व कविता आवडतात. ही
तुमच्या सर्व कविता आवडतात. ही सुद्धा आवडली. मस्त आहे.
आमेन
आमेन
खूप सुंदर
खूप सुंदर
जबरदस्त...
जबरदस्त...
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
खुपच छान!!!
खुपच छान!!!
'चंद्र' शेखर, धन्यवाद.
'चंद्र' शेखर, धन्यवाद.