टि.बी मधून बाहेर पडताना भाग 3

Submitted by Rohini Sable on 15 August, 2020 - 08:06

माफ करा.भाग तिसरा पोस्ट करायला खुप उशीर झाला. आणि मला फुफ्फुसांचा टि.बी झाला होता.
भाग तिसरा.
सोमवारी आम्ही कुपर होस्पिटल ला गेलो. तिथे सर्व टेस्ट केल्या. या मध्ये 3 दिवस गेले. आणि रिपोर्ट पोसिटीव्ह आला.मला फुफ्फुसांचा टि.बी झाला होता. रिपोर्ट हातात आल्यावर मी गच्च डोळे मिटुन घेतले. आणि मनाची तयारी केली. मग डॉक्टरांनी सांगितले घरी च उपचार होऊ शकतात.मला 6 महिने लागतील यातून पूर्ण बरी होण्यासाठी. फक्त काळजी घ्यावी लागेल खुप. सर्वापासून अंतर ठेवावे लागेल. बाळाला दुध पाजता येणार नाही. भरपूर जेवण करावे लागेल. व्यायाम करावा लागेल. आणि महत्त्वाचे म्हणजे जरी बरे वाटले तरी औषध घ्यायचे बंद करायचे नाही.6 महिने औषधे पूर्ण घ्यायचे. मग झाला माझा टि.बी ला हरवण्याचा कार्यक्रम सुरु.........
मला रोज 9 गोळ्या खायच्या होत्या.3गोळ्या टि.बी च्या होत्या. आणि बाकीच्या अशक्तपणा कमी होण्यासाठी. गोळ्या शक्यतो सकाळी उपाशीपोटी च घ्यायच्या असतात.3 तासानंतर त्यांचा असर चालू होतो. खूप जेवण करावे लागते. नाहीतर तुमच्या शरीराला या गोळ्या पचवायला खूप जड जाते. इथे मी तुम्हाला माझा आहार सांगते.
सकाळी नाष्टा--------- 2सफरचंद,1संत्री 2 केळी. 1 ग्लास दूध, 2 उकळलेली अंडी.
11 वाजता------------ चपाती पालेभाजी ,भात ,डाळ
2 वाजता ------------- भाकरी ,चिकन आणि भात
4 वाजता ------------ चहा आणि पारले बिस्कीट
6 वाजता---------- 2 सफरचंद ,संत्री, केळी आणि द्राक्षे.
9 वाजता ---------- 2 उकळलेली अंडी, भाकरी, फिश/मटण/चिकन
11 वाजता परत 1 सफरचंद.
( टि.बी पेशंट ला भरपूर मांसाहारी जेवण खावे लागते. स्पेशली उकळलेली अंडी.)
जास्त तिखट नाही, तळलेले नाही, बेकरीचे पदार्थ नाही, थंड पदार्थ नाही ,बाहेरचे पदार्थ नाही खायचे. पाणी पण उकळून प्यायचे.
व्यायाम...........
रोज सकाळी 1 तास कोवळ्या उन्हात बसणे खूप गरजेचे आहे.( कारण औषधांमुळे हाडे कमजोर होतात.)
तसेच रोज सकाळी चालणे.( कारण औषधांमुळे सांधेदुखीचा त्रास होतो.)
जड अजिबात उचलायचे नाही.जमेल तेवढेच काम करायचे. कारण या आजारामध्ये शरीराची खूप झीज होते.
खोकताना, बोलताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरावा. मास्क सहसा वापरु नये,कारण त्याने खोकला वाढतो.( निदान माझा तरी अनुभव असाच आहे.)
जास्त बोलू नये.कारण बोलण्यामुळे आपली एनर्जी कमी होते.जेवढे शांत राहता तेवढे चांगले.
ताण तणाव अजिबात घ्यायचा नाही. कारण डिप्रेशन मधे जाऊ शकता.( मी डिप्रेशन मध्ये गेले होते.) सारखे मन कशात तरी रमवावे.संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा.
औषधांचा दुष्परिणाम
उपचार मधे च बंद केले तर टि.बी पुन्हा होऊ शकतो.
उपाशी राहून जर गोळ्या खाल्ल्या तर लिव्हर खराब होऊ शकतो.
उपचार जास्त दिवस चालले तर किडनी खराब होऊ शकते.
दिसायला कमी येते
ऐकायला कमी येते.
कोवळ्या उन्हात न बसल्या मुळे हाडे कमजोर होतात.
सांधेदुखी वाढते.
मी 6 महिने योग्य ती काळजी घेतली आणि औषधे वेळच्यावेळी खाल्ली म्हणून मी पूर्ण बरी झाले.
म्हणून मी सर्वांना सांगत आहे कि भरपूर जेवण करा. व्यायाम करा आणि आनंदी राहा. टि.बी फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना च होतो. त्यामुळे नेहमी हसत राहा. तंदुरुस्त राहा.
मी फक्त माझा अनुभव सांगितला आहे.टि.बी खूप प्रकारचे असतात. मी त्या बद्दल पन लेख लिहून पोस्ट करेन .मला वेळ मिळेल तसा.
टि.बी च्या उपचारासाठी सरकारने डॉट्स हि उपचार पद्धत अवलंबली आहे. या मधे मोफत उपचार होतात. आणि सरकार टि.बी पेशंट ला दर महिन्याला 700 रुपये देते. आणि मोफत राशन देते.
चला मग काळजी घ्या. आणि कोणाला टि.बी झाला तरी अजिबात घाबरून जावू नका. मनाची तयारी करा आणि लढा ..
टि.बी हारेगा ..देश जीतेगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णिता +१
घरच्यांची आणि तुमची परीक्षाच म्हणायची ही. आणखी लहान बाळ म्हणजे तर बापरे. निभावून गेलं हे बरं झालं!

ज्या प्रसंगातून तुम्ही गेलात खरतरं तो कुणावरचं येऊ नये. पण तुम्ही त्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिलं आणि टि.बी ला हरवलं आणि आता तुम्ही बऱ्या झाला आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन.. तुमचा अनुभव येथे लिहिलात आणि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.. काळजी घ्या आणि तब्येतीला जपा..

भाग 2 मध्ये तुम्ही लीहले आहे कूपर हॉस्पिटल च्या अगोदर ज्या हॉस्पिटल मध्ये होता तिथेच tb che निदान झाले होते.
रात्री 3 ला सोडले.
ह्या भागात कूपर हॉस्पिटल ला परत टेस्ट केल्या आणि 3 दिवसांनी टीबी चा रिपोर्ट आला अस लिहला आहे.
काही तरी गोंधळ होतोय

हेमंत मी कुपर होस्पिटल च्या अगोदर ज्या होस्पिटल मधे होते तेथे फक्त एक्स रे पाहून टि.बी असू शकतो असे सांगितले होते. पण confirm करण्यासाठी च ना कुपर होस्पिटल मधे जायला सांगितले होते. कारण अगोदरच्या होस्पिटल मधे टि. बी चे डॉक्टर नव्हते. तिथे फक्त 50% शक्यता सांगितली होती.पुढच्या सर्व टेस्ट कुपर होस्पिटल मध्ये झाल्या.

बापरे
आता व्यवस्थित आहे ना?तुम्ही चांगली माहिती दिली
संसर्ग कोणापासून वगैरे असे काही असते का?कारण कळले का?

हो. टी. बी साठी वेगळे डॉक्टर असतात.जे फक्त सरकारी हॉस्पिटल मध्येच असतात.प्रायव्हेट मध्ये नसतात.प्रायव्हेट मध्ये उपचार होत नाहीत. गोळ्या पण फक्त सरकारी हॉस्पिटल नाहीतर आरोग्य केंद्र मधेच मिळतात.

अनु मी बरी आहे आता एकदम. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मी खूप अशक्त झाले होते. म्हणून माझी प्रतिकार शक्ती कमी झाली त्यामुळे मला टी. बी झाला.आणि जास्त दिवस मी काही खात पण नव्हते.दिवसात 1 च वेळा जेवण करायचे आणि हेच कारण होते मला टी बी होण्याचे

तुम्ही पूर्ण बऱ्या झाल्या हे वाचून छान वाटले.
चांगली माहिती दिली आहे.
माझ्या बहिणीला आठ वर्षांपूर्वी झाला होता. आता ती अगदी ठणठणीत आहे.

Mrunali माझी मुलगी नाहीये माझ्या जवळ. ती 2 महिने झाले गावी आहे. इथे lockdown झाले .आणि Corona चे पेशन्ट वाढत होते म्हणून तिला आणि नणंद चे पण लहान बाळ होते ना मग त्या सर्वांना गावी पाठवले. ती राहत होती माझ्याशिवाय म्हणून. आता ती 11 महिन्यांची आहे. आता आम्ही जाणार आहोत तिच्याकडे. ती 4 महिन्यांची असल्यापासून माझ्यापासून दूर च आहे. ती तर आता तिच्या आत्या लाच मम्मी म्हणते.

तुम्ही छान बऱ्या झालात हे वाचून बरं वाटलं! टिबीचे जंतू बरेचदा आपल्या आसपास असतात पण जोपर्यंत आपली प्रतिकारशक्ती उत्तम आहे तोवर आपल्याला आजार होत नाही. त्यामुळे यापुढे छान चौरस आहार आणि आवश्यक व्यायाम असे चालू ठेवा.
काही वर्षांपूर्वी माझ्या आईला हाडाचा टिबी झाला होता. कंबर प्रचंड दुखायला लागली अचानक म्हणून MRI केला तेव्हा लगेच निदान झालं. बरोबर एक महिना गोळ्या घेतल्या तेव्हा दुखणे थांबले मात्र संपूर्ण कोर्स वर्षभराचा असतो आणि त्याची एकही गोळी चुकवून चालत नाही. आता ती एकदम बरी आहे. मध्यंतरी एकांना पोटात टिबी झाल्याचे पण ऐकले होते.

Tb चे निदान योग्य वेळी होत नाही ही पण एक समस्या आहे.
लक्षण कॉमन असल्या मुळे डॉक्टर बाकीचे औषध देतात त्या मध्ये महिना निघून जातो.
तेव्हा tb असावा असे वाटते आणि tb chi चेकिंग केले जाते.

Tb तसा अत्यंत भयंकर रोग आहे.
100% बरा होतो पण योग्य वेळी निदान नाही झाले तर हालत खराब करतो.
आणि दुसरे जरा बरं वाटायं लागले सर्व लक्षण निघून गेली की काही लोक औषद घेणे बंद करतात हे अती भयानक आहे.
त्या नंतर जो फिरून tb होतो त्याचे जंतू औषधाला दाद देत नाहीत .

तुम्ही बऱ्या झाल्यात त्या बद्दल अभिनंदन.

पण टी बी मध्ये मांसाहार करावा लागतो याच्याशी असहमत. मी स्वतः टीबी मधून संपूर्ण बरा झालो.मी पूर्ण शाकाहारी आहे.भरपूर दूध पिऊन सकस आहार घेतला कि आपण छान बरे होतो.अर्थात डॉक्टरांनी बास म्हणेपर्यंत उपचार न थांबवणे हे सगळ्यात महत्वाचं. मी सलग ९ महिने रोज ३ गोळ्या घेतल्या होत्या. शिवाय इतर टॉनिक च्या गोळ्या वेगळ्या.

खग्या. मला सांगितले होते डॉक्टरांनी च. खायला. मला पण सवय नव्हती . माझे पण मत आहे कि मांसाहार नाही केला तरी टि. बी बरा होतो. पण घरच्या लोकांनी जबरदस्ती केली.मग खावे लागले. पण नंतर माझे uric acid वाढल्यामुळे मला मांसाहार बंद करावा लागला.

रोहिणी, तुम्ही टीबीतून पूर्ण बऱ्या झालात हे वाचून बरे वाटले.

कोणे एके काळी टिबी हा गंभीर आजार होता असे वाचून वाचून आता टीबी तितकासा गंभीर नसावा असे मला उगीचच वाटत होते. पण तसे नाहीये हे हल्ली हल्ली कळले. टीबी हा अतिशय चिवट आजार आहे त्यामुळे त्याची औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात, चालढकल करून चालत नाही.

औषधोपचार करताना धरसोड झाली तर मल्टि ड्रग रेसिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो, ज्याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. एक जवळची नातलग टीबीने गेल्यावर दुर्लक्षित टीबी किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो हे कळले.

तुम्हाला शाररिक कमी आणि मानसिक त्रास जास्त झाला या टि बीमुळे असे लिखाणावरुन वाटत आहे.तुम्ही रोगमुक्त झालात व तणावमुक्त झालात हे ऐकुण बरे वाटले.काळजी घ्या!

तुम्ही पुर्ण बर्‍या झाल्यात वाचुन चांगले वाटले.

माझ्याही ओळ्खित एकिला टी बी झाला होता. बरेच दिवस तिल अधुन मधुन खोकला यायचा. पण तो सलग येत नसल्याने काहिच लक्षात आले नाही. त्या वेळी तिचे वय २३-२४ होते. बाकी काहिच त्रास न्हवता. एक दिवस अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होउ लागला म्हनून नेहमिच्या डॉक ला दाखवले. तेव्हा त्यांनी कही टेस्ट करुन घ्यायला सांगितले . त्यात तिच्या फुफ्फुसांन्मधे पाणि झाल्याचे कळाले. मग दुसर्‍ञा एका डॉक कडून हे पाणि काढुन घेतले. पाठिच्या मागिल बाजुने हे पाणी काढले. तिल नंतर बराच त्याचा त्रास झाला . पाणि काढलेली बाजू दुखायची. हे पाणि तपासणी साठी पाठवले असता रिपोर्ट पोझिटिव्ह आले. नेहमिच्या डॉक ने सांगितले की नुकतिच सुरुवात आहे सहा महिने औषध घेतले की बरे होउन जाईल. वर लेखात लिह्ल्याप्रमाने डॉक ने हे साम्गितले होते की मनाने कितिही बरे वाटले तरी मला विचारल्याशिवाय औषध बंद करयचे नाही.
गोळ्या चालू झाल्या. पण तिला खुप अशक्त्पणा आला. वजन झपाट्याने उतरू लागले. खरे तर तब्येतिने ती जाड होती. परंतु ईतकी बारिक झाली की असे वाटायचे अजुन बारीक झाली तर हिचे काही खरे नाही. अहारात फारशी पथ्य न्हवती. सहा महिने झाल्यावर पुन्हा डॉक ला दाखवले तसे त्यांनी आता ती बरी झाली म्हनुन सांगितले. परंतु अजुन एक महिना गोळ्यांचा डोस चालु ठेवला.
नंतर मात्र तिला काही त्रास झाला नाही. पण ते सहा महिने फारच वाईट होते.
लेखात वाचल्याप्रमाणे तिला टि.बी च्या उपचारासाठी सरकारने डॉट्स हि उपचार पद्धत अवलंबली आहे. या मधे मोफत उपचार होतात. आणि सरकार टि.बी पेशंट ला दर महिन्याला 700 रुपये देते. आणि मोफत राशन देते. या पैकी काहिच मिळाले नाही. औषध फक्त नाममात्र किमतित मिळत होती.

मला पैसे पण मिळाले आणि उपचार पण मोफत झाले. आणि हो 6 महिने खूप त्रासदायक असतात. मी स्वतः खूप त्रास काढला आहे. मी डिटेल मधे त्या त्रासाबद्दल नाही लिहिले या लेखात. कारण ते खूप भितीदायक होते. डिप्रेशन मधे गेल्यावर किती त्रास होतो जगायला हे फक्त त्या च मानसाला माहिती असते. मी देवाला आणि आशिष ला थँक्स म्हणेन कारण या सर्वांमधून मला त्यांनी बाहेर काढले.

रोहिणी तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालात, याबद्दल तुमचे अभिनंदन.
इथे प्रतिसाद वाचून कळले कि टीबी कोणालाही होऊ शकतो..
टीबी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा टीबी लक्षणे काय असू शकतात.

Pages