Submitted by द्वैत on 9 August, 2020 - 12:49
मी एक प्रवासी
मी एक प्रवासी माझ्या
पायांतून फुटती वाटा
वाटांना वाहून नेती
क्षितिजाशी वेड्या लाटा
क्षितीजाच्या पार असावे
एक शांत पुरातन गाव
माणूस नसावा कोणी
ना स्पंदविणारे भाव
ना सूर्याचा चंद्राचा
कुठला ना सक्त पहारा
नश्वर माझ्या देहाचा
देहाशी फक्त निवारा
श्वासांवर नाही सक्ती
ना ठोक्यांचा कानोसा
प्राणांतून प्राण उडावा
बंदिस्त पाखरा जैसा
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान..
खूप छान..
खूप सुंदर
खूप सुंदर
ना सूर्याचा चंद्राचा
कुठला ना सक्त पहारा>>>>>>अफाट
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
छान.
छान.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
मस्त..
मस्त..
खूप आवडली.
खूप आवडली. मला कवितांची तितकी आवड नाही पण तुमच्या कविता आवर्जून वाचते.
धन्यवाद गुरूदीप, अस्मिता आपला
धन्यवाद गुरूदीप, अस्मिता आपला आभारी आहे
खुपच सुंदर!!!! खूप छान छान
खुपच सुंदर!!!! खूप छान छान कविता वाचनात येतायत !!!!
धन्यवाद चंद्रशेखर जी
धन्यवाद चंद्रशेखर जी