।।छळ।।(शतशब्दकथा)

Submitted by mi manasi on 10 August, 2020 - 11:07

।।छळ।।
(शतशब्दकथा)

शेजारी प्रफुल्ला रडत होती आणि तिच्या रडण्यामुळे प्रसन्नाची झोप चाळवत होती.

यापूर्वी उलटं व्हायचं.मार खाल्ल्यावर तिचं रडणं सुरू झालं की त्याला शांत झोप लागायची...

प्रेग्नंसीत नोकरी गेली.आता पिनाकिन वर्षांचा झाला. नोकरी बघायला तयार नाही. डोक्यावर फ्लँटचं, गाडीचं कर्ज आहे. राग नाही येणार?नोकरी करणारी म्हणून तर लग्न केलं !

आज त्याला दया आली..जाऊदेत! महिनाभर हाँस्पिटलमध्ये किती सोसलंय तीने!... झोपेतच त्याने तिला जवळ घेण्यासाठी हात लांब केला...बेड रिकामा होता..

तो दचकला. त्याने अंधारात डोळे ताणून पाहिलं. काही दिसेना. हळूहळू डोळे अंधाराला सरावले तेव्हा दिसलं. बेड रिकामा होता...
काळजात धस्स् झालं...एकदम आठवलं...

प्रफुल्लाला जावून आज तेरा दिवस झाले...
...................................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Predictable (मराठी शब्द काय वापरावा?) असली तरी मजा आली वाचायला.. आजकालच्या कथांमध्ये नावे वेगळीच असतात. प्रफुल्ला, प्रसन्नना.... पिनाकीन तर डोक्यावरून पाणी!

कथा आवडली, लिहीत रहा

सामो.. धन्यवाद!.. डोमेस्टीक व्हायलन्स.. कळला की डोक्यातून जात नाही म्हणून..

अजिंक्यराव पाटील..सहज, सविस्तर आणि प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिलीत..आभारी आहे.
Predictable ला शब्द अपेक्षित..हो! कथेत अनपेक्षित काहीच नाही. म्हणूनच वेगळेपणासाठी नावं वेगळी निवडली.

Mrunali samadhan.. धन्यवाद! अशा प्रफुल्ला आजही अव्यक्त आहेत !

बापरे!
चांगली लिहिली आहे पण.>>++११११

डेंजर
पिनाकीन चं काय झालं? की त्याला पण..

अशा धाटणीच्या शशक आधीही वाचल्यात. काहीतरी नवीन वाचायला मिळेल असं वाटलं होत, पण साफ निराशा झाली.

धनुडी विशेष पसंतीसाठी धन्यवाद!

mi_anu धन्यवाद! पिनाकिन आहे. प्रफुल्ला आजारी पडून गेली.

Akshay.. घाटणी नविन नव्हतीच..कथेत माडलेला विषय वेगळा होता..तो पोहचला असेल असं समजते. धन्यवाद!

निशब्द...
I can relate with someone who was very close to me . Sad
असे प्रसन्न समोर आले की डोक्यात तिडिक जाते पण काहिही करता येत नाही हे उमजून अजूनच चिडचिड होते. Angry

Cuty धन्यवाद!
मनिम्याऊ...कथा काल्पनिक आहे. पण प्रफुल्ला खरी आहे. ती डोक्यातून जात नव्हती. ती सगळ्यांना कळावी हीच अपेक्षा होती...धन्यवाद!

बापरे...
कथा जमली आहे..Well written..

ज्येष्ठागौरी
विनिता झक्कास
सनव निलुदा
प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद!
निलुदा...आणि त्या सुशिक्षित, स्वावलंबी आहेत तरिही...