हिरवे शिवार

Submitted by Santosh zond on 11 August, 2020 - 02:34

हिरवे शिवार

नभ दाटता आभाळी
पावसाची आली सर
काळ्या आईस पेराया
हाती घेतले पांभर

ओढ थेंबाची तृणांशी
जशी मखमली शाल
बाप राबतो शेतात
हाती जगाची मशाल

पायी नसतो आधार
चिखलाची त्याची वाट
झोपे चांदण्या रात्रीत
जगा वेगळाच थाट

पोंर आपली हुशार
बाप मायशी भांडतो
जिव ठेवून गहान
दिस उपाशी काढतो

बाप वाघाच काळीज
घेत नाही माघारं
घास जाताच तोंडाशी
दारी उभा सावकारं

हिरवे शिवार शिवार
पाना-फुलांनी सजले
दोन जिंवाच्या श्रमाने
स्वर्ग गालात लाजले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान