माहिती हवी आहे

Submitted by Rani19 on 10 August, 2020 - 08:18

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की , मी २००९ मध्ये १२ वी पास झाली . मला पुढे शिकायचं आहे पार्ट टाईम. मग बी कॉम पूर्ण केलेलं चांगलं कि काही कोर्स ?. ११ वर्षाचा गॅप आहे .. मला अभ्यासाचं टेन्शन आलाय.. पुढे जमेल का? इ.... प्लीज काही सजेशन द्या किंवा काही कोर्सेस असेल तर सुचवा

Group content visibility: 
Use group defaults

बी कॉम पूर्ण करा व बरोबरीने टॅली नीट शिकून घ्या पुढे काम मिळायला सोपे जाईल. जीएस टी रिटर्न कसे भरायचे ते शिकून घ्या. ऑल द बेस्ट.

अमा नी चांगल सुचवलयं. तुम्ही GDC & A चा कोर्स हि करू शकता. तुम्हाला जमत असेल तर CA ऑफीसमध्ये पार्ट टाइम जॉब हि करणं उत्तम. बराच Account चा अनुभव मिळतो असा माझा अनुभव आहे. अभ्यास जमेल काही चिंता नका करू. शुभेच्छा तुम्हांला.

१२ वी कॅामर्स पूर्ण झालयं का?सध्द्याचा अनुभव कशात आहे? कोणत्या शहरात आहात? मुक्त विद्यापीठाचे अनेक कोर्सेस आहेत . पुण्यात रानडे इन्स्टिट्यूट मधून परकीय भाषा शिकू शकता.

http://www.unipune.ac.in/dept/fine_arts/foreign_languages/default.htm

मुंबई विद्यापीठाच्या मुक्त व दूर शिक्षण विभागातून पदवीचं शिक्षण घेता येईल. बी कॉमच केलं पाहिजे ,असंही नाही.

https://old.mu.ac.in/distance-open-learning/

हेही बघा
https://swayam.gov.in/about

शिक्षणासाठी कुठलेही वयाचे बंधन नसते. फक्त आवड लागते. आपल्या आवडिच्या विषयाचे धडे परत गिरवायचे असतिल तर नक्किच थोडा जास्त अभ्यास पुन्हा करावा लागतो ( गॅप असल्यामुळे). त्याची तयारी हवी. मग सगळे सहज जमुन येते. सर्वात पहिले नक्की काय करायचे आहे हे ठरवावे, म्हणजे १२ वी नंतर रहिलेले पुढील शिक्षण घ्यायचे आहे की वेगळे काही शिकायचे आहे. वेगळे काही कोर्स करायचे असतिल तर नेमकी कशात रुची आहे हे जाणुन घेउन त्याप्रमाणे कोर्स निवडावा. अभ्यासाचे टेन्शन घेउ नका कारण आत्ता बरेच पर्याय उपलब्ध असतात माहिती मिळवण्यासाठी.
पुढील शिक्षणास शुभेछ्चा!