मी एक प्रवासी

Submitted by द्वैत on 9 August, 2020 - 12:49

मी एक प्रवासी

मी एक प्रवासी माझ्या
पायांतून फुटती वाटा
वाटांना वाहून नेती
क्षितिजाशी वेड्या लाटा

क्षितीजाच्या पार असावे
एक शांत पुरातन गाव
माणूस नसावा कोणी
ना स्पंदविणारे भाव

ना सूर्याचा चंद्राचा
कुठला ना सक्त पहारा
नश्वर माझ्या देहाचा
देहाशी फक्त निवारा

श्वासांवर नाही सक्ती
ना ठोक्यांचा कानोसा
प्राणांतून प्राण उडावा
बंदिस्त पाखरा जैसा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर
ना सूर्याचा चंद्राचा
कुठला ना सक्त पहारा>>>>>>अफाट

खूप आवडली. मला कवितांची तितकी आवड नाही पण तुमच्या कविता आवर्जून वाचते.