मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
माझ्या ब्रॉडबँडचे मॉडेम खराब
माझ्या ब्रॉडबँडचे मॉडेम खराब झालेय काल. केव्हा बदलतील अजून सांगितले नाही.
आणि माझ्या घरी सेलफोन नेट फार तुटक चालतेय. त्यामुळे नेट शोध निराशाजनक आहे सध्या.
जलवायुविज्ञान?
जलवायुविज्ञान?
जलवायुविज्ञान >>> येह !
जलवायुविज्ञान >>> येह !
हाच तो विजयी चौकार !
वा वा !
९. वातावरणीय आविष्कारांच्या
९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ). >>>>
७ अक्षरे + ३रे अक्षर वा ---- म्हणजे वातावरण विज्ञान लिहून साईसुट्ट्यो करणे होणे नाही.
मानव, भरत, देवकी, वावे. अवनी. साद, कूल अंजली, अनुराग, श्रवु, अस्मिता --- कोणी बघताय का?
हा शब्द लौकर आला....
चला सुटले कोडे !!!!!!!!!!!!
१. आमच्या अंगणात खूप गारा
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. करकापात
२. समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले. तेजःशर
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले. तुहिन
४. त्या वाऱ्यांचा वेग प्रचंड होता. प्रभंजन
५. हे गृहस्थ हवामानाचे अभ्यासक आहेत. वातावरणविज्ञ
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात. दूरचित्रपुनर्मुद्रण
७. या घटनेमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषण होते.
सूर्यप्रारण
८. नवी दिल्लीत दुपारच्या अंधाऱ्या हवेमुळे वाहन चालवता येईना. धूमिका (धुरातून झालेले धुके).
९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. जलवायुविज्ञान .
....................................................................................................................................................................
मस्त, मजा आली, जरी विशेष भाग
मस्त, मजा आली, जरी विशेष भाग घेतला नाही.
अशा तऱ्हेने ही हवामानकथा सुफळ
अशा तऱ्हेने ही हवामानकथा सुफळ संपूर्ण झाली !
कारवी, सर्वोत्तम खेळ. अर्थातच सामनावीर.
मानव, वावे, साद पण उत्तम.
इतर सर्वांनीही छान शब्दशोध घेतला आणि उत्तम झुंज दिली.
सर्वांना मनापासून धन्यवाद !
Kharach maja aali.
Kharach maja aali. प्रामाणिकपणे सांगायचे तर आता थोडा कंटाळा आला होता तितक्यात सर्व सुटलेही.
अहो मानव तुम्ही किती पटकन
अहो मानव तुम्ही किती पटकन सांगितलंत..
प्रभंजन शब्द सोडला तर कुठलाच
प्रभंजन शब्द सोडला तर कुठलाच शब्द आधी ऐकला नव्हता.. आज बरेच नवीन शब्द नवीन अर्थ कळले..
आणि उत्तम झुंज दिली. >>> छान
आणि उत्तम झुंज दिली. >>> छान होते कोडे...
झुंजायला लागले खरे.... तरीही मजा आलीच. सोपे लौकर सुटते म्हणून मजा आणि कठीण टप्प्याटप्प्याने सोडवण्यात मजा....
डोकं भिरभिरलं.
डोकं भिरभिरलं.
श्रवु, देवकी, तुम्हीही एक एक
श्रवु, देवकी, तुम्हीही एक एक कोडे बनवा.... १०च प्रश्न..... आणि आपण आरामात असतो. लोक शोधतात.
यावेळेस कूल अंजली, अनुराग,
यावेळेस कूल अंजली, अनुराग, श्रवु, यांची या परिवारात भर पडली आहे.
सर्वांचे स्वागत. जरूर द्या नवे खेळ.
मी तर सध्या खिडकीतूनच बघतेय.
मी तर सध्या खिडकीतूनच बघतेय.. वर्गात काय चाललंय ते..
कारवी, तुम्ही खरेच सुरेख
कारवी, तुम्ही खरेच सुरेख सोडवलं.
कारवी, तुम्ही खरेच सुरेख
कारवी, तुम्ही खरेच सुरेख सोडवलं>> हो ना.
मला एवढा पेशन्सच नाही शब्द शोधण्यासाठी!!
मी तर नेहमीच कस्काय जमतं बाई
मी तर नेहमीच कस्काय जमतं बाई ......या मोड
मधे असते
तुहिन ची शोधयात्रा सांगा बरं जरा..
मी तर नेहमीच कस्काय जमतं बाई
मी तर नेहमीच कस्काय जमतं बाई ......या मोड
मधे असते
तुहिन ची शोधयात्रा सांगा बरं जरा..
Submitted by अवनी >>>>>
थोडं लौकर विचारलं असतं तर लिंक देता आल्या असत्या. खूप सर्च हिस्टरी झाल्याने आणि आता ती कामाची नसल्याने साफ केली.
कस्काय जमतं बाई प्रश्नात गुरफटून घेण्यापेक्षा ..... सगळ्यांना जमतंय, यावेळेला मीपण जमके प्रयत्न करणार हे ठरवलं आणि कृती केली की जमतंच कधी ना कधी, काही ना काही. तेच आज झालं.
जो प्रवास,
तेज/सूर्य/ऊन प्राशन ----- पासून ----- सूर्यप्रारण पर्यंत;
XX चित्ररेखनतंत्र----- पासून ----- दूरचित्रपुनर्मुद्रण पर्यंत;
प्रकाशन ----- पासून ----- तेजःशर पर्यंत;
झाला, जो दिसतोय मागच्या पानांवर --- तसाच प्रवास तुहिनचाही झाला. फक्त दिसला नाही कारण दुय्यम ट्रॅकवर होता.
बर्फाशी संबंधित २ प्रश्न होते.
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का )
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न)
जेव्हा जेव्हा गारासाठी शोधले तेव्हा तेव्हा बर्फाचे कणही शोधले.
** थोडा भाषेचा ‘शासकीय’ चष्मा घालायचा !
** त्यावर संस्कृतचा प्रभाव दिसतो.
हे दोन सूचक मार्गदर्शक कोडेकर्त्यांनी दिले आहेत.
शासकीय शब्दकोश + गुगलच्या मदतीने मराठी-हिंदी- इंग्लिश-संस्कृत सर्व भाषांत समानार्थी शब्द शोधणे -- हे केले.
बाकी काम हे द्विभाषिक शब्दकोश नेटवर उपलब्ध करून देणार्यांनी उत्तम करून ठेवले आहे.
शब्द शोधणे, त्याचा अर्थ व अक्षरसंख्या जुळवणे इतकेच काम आपल्याला उरते.
शब्द स्वीकारला गेला नाही तर तोच मार्ग पुन्हा चालायचा.
रात्री करून बघा जरूर. कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा कमी वेळात आणि कमी श्रमात हुडकाल शब्द.
आणि स्वतः केल्याने कळेलही की नेमके कसेकसे टप्पे घेत पुढे जातो आपण..... पुढच्या कोड्यात कामी येईल.
शुभेच्छा.
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
कोडे मस्त होते सोडवायला.
कारवी, खूप छान खेळलात.
कोण देतंय पुढले कोडे?
कोण देतंय पुढले कोडे?
धन्यवाद सगळ्यांना....
धन्यवाद सगळ्यांना....
आज कोणी नाही देत, दमले सगळे?
होय, दमलो !
होय, दमलो !
ताज्या दमाच्या लोकांना आवाहन .
मी गूढ शब्दकोडी देइन २ वाजता.
मी गूढ शब्दकोडी देइन २ वाजता.
सोपा दहावी बारावीचा पेपर.
दहावी बारावीही नाही, आठवी
दहावी बारावीही नाही, आठवी-नववीचा पेपर आहे.
गूढ शब्दकोडी:
कृपया स्पष्टिकरणासकट उत्तरे द्यावीत. आधी उत्तर देउन मग स्पष्टिकरण देता येइल.
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४)
२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (4)
३ हो ला हो देण्यापूर्वी खाट देणारे धान्य. (३)
४. म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२)
५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३)
६. धिप्पाड यम हाका चुकवतो. (४)
७. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)
८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो. (४)
९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३)
१०. कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली तर मध्येच दोन ठेवून द्या एकसारख्या. (४)
शोधसूत्रात र्हस्व दीर्घाच्या
शोधसूत्रात र्हस्व दीर्घाच्या चूका नसाव्यात.
पण एखादा समानार्थी शब्द दीर्घ असेल आणि उत्तरामध्ये तो र्हस्व हवा असेल अर्थ न बदलता, तर तेवढे चालवून घ्यावे. ( पाणी / पाणि अर्थ बदलतो म्हणुन चालणार नाही.)
९. जळणारा कोळसा सूर मीठ
९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३)
>>>> निखारा ( खारा मीठ, नि सूर )
२. नवर्या मुला भोवती आले
२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (4)
>>> आ वर ले
दोन्ही बरोबर!
दोन्ही बरोबर!
५. संपत्तीच्या मागे सूर
५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३)
नि धन
नि सूर
थांबतो
Pages