Submitted by द्वैत on 4 August, 2020 - 10:07
कंदील मुक्याने जळतो
कंदील मुक्याने जळतो
जा खुशाल तो ही विझवून
मी स्वप्न उषेचे बघतो
गर्भात तमाच्या राहून
दे शाप मला भोगाया
दे पीडा गतजन्मीची
मी कविता सांधेन त्यातून
तुटलेल्या अवशेषांची
जाळून जरी मी उरलो
मातीत गाडूनी टाका
धरतील तरी धरणारे
माझ्या गीतांवर ठेका
भेदून तुझी तटबंदी
तोडून पहारे सारे
हे सूर व्यापतील माझे
गगनातील स्वप्नील तारे
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर काव्यरचना...
खूप सुंदर काव्यरचना...
वा वा
वा वा
दे शाप मला भोगाया दे पीडा गतजन्मीची
मी कविता सांधेन त्यातून तुटलेल्या अवशेषांची>>>> अप्रतिम
धन्यवाद रुपाली, धन्यवाद तो मी
धन्यवाद रुपाली, धन्यवाद तो मी नव्हेच
खूपच छान.
खूपच छान.
खासच
खासच
सामो, अमित प्रतिसादांसाठी
सामो, अमित प्रतिसादांसाठी धन्यवाद
खूप सुंदर रचना
खूप सुंदर रचना
धन्यवाद मुक्ता
धन्यवाद मुक्ता
वाह सुरेखच
वाह सुरेखच
धन्यवाद अवल
धन्यवाद अवल