कोरोना कधी जाईल असा तुमचा अंदाज आहे?

Submitted by केशव तुलसी on 6 August, 2020 - 08:34

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रोज लस कधी येणार याचे फक्त आडाखे येत आहेत .खात्रीशीर काही ठोस कुणीही सांगत नाही.फक्त अंदाज चालू आहेत.कधीकाळी आपण मुक्तपणे फिरायचो ,बाहेर जायचो ,बाहेर खायचो याचा विसर पडावा असं वातावरण झाले आहे.
माझा अंदाज असा आहे की कोरोना संक्रमण २०२० मध्येतर जात नाही. लस वर्षाअखेरीस येईल पण ती आपल्या दंडावर किंवा कु@@₹ बसायला सहा महीने तरी लागतील.काहींचे म्हणने आहे २०२२ उजाडेल.सेरो सर्व्हेनुसार दिल्ली मुंबैइत ऑक्टोबरापर्यंत हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल.एकंदर सगळेच अंदाज बांधत आहेत तर आपणही बांधूयात .तुम्ही वाचलेल्या बातम्या ,अपडेट्सनुसार कोरोना कधी जाईल असे तुम्हाला वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरोना कुठे जात नाही,
हा विषाणू म्युटेट होतो, लस आली तरी ती याच्या सगळ्या अपरूपांवर चालेल को नाही हे माहीत नाही.
तेव्हा आपल्याला जश्या आयुष्यात एकदा कांजिण्या होणार असे धरून चालायचो, तशी मनाची तयारी ठेवायला लागेल

लस आली नाही तर फेब्रुवारि २०२१ पासुन जगातील सर्वात जास्त कहर माजलेला देश ठरेल असं डब्ल्यु.एच.ओ. च्या एका अहवालात म्हटल्याचं टी.व्ही. वर बघितल्यापासुन डोकंच बधीर झालं आहे. Uhoh

बाकी, तुम्ही विचारलं म्हणुन मला असं वाटतंय की महाराष्ट्रात सर्वात आधी कहर सुरु झाला त्या अर्थी कदाचीत डेसेंबर २०२० पर्यंत इथे कोरोना बर्‍यापैकी काबुत येईल अन उर्वरीत भारतात मात्र हाहा:कार सुरुच राहील. महाराष्ट्र सर्वात जास्त सिविलाईजड स्टेट आहे आणि इथले पब्लिक बर्‍यापैकी पुढारलेलं आहे त्यामुळॅ कोरोना बाबत सर्वात जास्त जनजागृती महाराष्ट्रात आहे असे मला वाटत असल्यामुळे आपण लवकर यातुन बाहेर पडु असा माझा आपला अंदाज आहे.

Who वर काय म्हणत आहे त्याच्या शी स्वतःला जोडू नका.
स्वतः ची यंत्रणा निर्माण करून स्वतःच अभ्यास करून जो निष्कर्ष येईल त्या वर अवलंबून राहावे.

स्वतःची यंत्रणा निर्माण करायला माबोकर काही सरकार नव्हेत. डब्ल्यु.एच.ओ. का होइना पण कोणी आपल्याला सावध करत असेल तर आपण निदान थोडं तयारीत असलेलं बरं. काय होतंय त्याला असा अ‍ॅटिट्युड असेल अन घात झालाच तर मग थेट मरणाशी गाठ पडायची.

Who ni आता पर्यंत असंख्य कोलांट्या उड्या मारल्या आहेत.
त्यांचा इशारा खरा ठरण्याचे प्रमाण काही टक्केच आहे.
आज पर्यंत च्या अनुभव वरून हा निष्कर्ष सहज निघेल

भविष्यात मृत्यू कवेत घेऊनच जगावे लागणार असे वाटत आहे. आजच साम वाहिनीवरील बातम्यांना पाहिले. चीनमध्ये आणखी एका SFTS व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत.

इथल्या हॉस्पिटलमध्ये सांगितलंय की ही परिस्थिती तीन वर्षे अशीच राहू शकते. मानसिक तयारी ठेवा.

डॉकटरना 60 हजार चा जॉब देतो , 90 हजार देतो , कोविड मध्ये ..

वाल्या बाईचा फोन आला होता, एकदम फ्रस्टेट होती
म्हटली ऑफर लेटर्स केन्सल केली आहेत
हॉस्पिटल बंद होत आहेत

मलाही वाटतंय डिसेंबरपासून महाराष्ट्रात कोविड १९ माघार घेईल. समूळ नष्ट नाही झाला तरी भीतीदायक राहणार नाही.

माघार घ्यायला कोविड म्हणजे काही माणूस नव्हे.

माझ्या मते आता कोविड फ्लू सारखा अधून मधून डोकं वर काढत राहणार!
जशी फ्लू ची साथ येते तशी त्याची येत राहणार, फक्त हर्ड इम्मीयुनिटी मुळे फार त्रास होणार नाही.

आणि कुठली लस निघते याच्या वर अवलंबून आहे. (आयुष्यभर चालणारी निघाली तर कमी त्रास होईल पण फ्लू सारखी दार वर्षी वाली निघाली तर त्रास जास्त होईल.)

छान धागा
कोणी अभ्यासू मत मांडले तर वाचायला आवडेल.
Who वर तर विश्वास ठेवायच्या लायकीचे ते उरले नाही. जित्ये सावध करायचे तिथे करत नाहीत आणि नको तिथे घाबरवतात.

बाकी धागा ललितलेखनात चालेल का हे कन्फर्म करून घ्या.
त्या वादाच्या अवांतर पोस्ट नको उगाच.

अपडेट -

काल भारतात ६२१७० लोक नव्याने बाधित झाले (जो की कालच्या दिवसाचा जगातील इतर देशांच्या तुलनेत सगळ्यात जास्त इन्फेक्षन काऊंट होता)
एकाच दिवसात ८९९ रुग्ण मेले

ही माहिती https://www.worldometers.info/coronavirus/ वरुन घेतली आहे. आता ह्या साईटची सत्यता कशी पडताळायची ते मला माहित नाही पण बर्‍याच न्युज चॅनेल वर या साईट्चं नाव घेऊन बातम्या देतात.

मी आधी रोज दिवसातून दोन वेळा हि साईट बघून अकडे चेक करायचो
पर मिलिअन आकडे बघायचो. भारतात फारच कमी आहेत हे बघून दिलासा मिळायचा.
पण भारतात स्पेशली मुंबई महाराष्ट्रात थैमान सुरू झाले आणि मग बघणेच सोडले.

हो
धारावीचे आकडे दिलासा देतात हल्ली. प्रशासन आणि लोकांनी ठरवले तर आपण याला आळा घालू शकतो हे आशादायक वाटते. पण त्याचसोबत आता मनाची तयारीही केली आहे की झाला तर झाला. त्याचा बाऊ न करता त्यातून बाहेर यायचे.

हो... आपण डगमगलं नाही तर कोरोनातुन सहीसलामत बाहेर पडु.

परंतु त्या वर्ल्डोमीटर वाल्यांचे आकडे रोज भयावह रितीने वर वर जात आहेत ते बघुन धीर खचायला होतंय अगदी.. टाळु म्हटलं तरी रोज रात्री झोपण्या आधी बोटं या साईटवर जाऊन हालहवाल काय आहे ते डोळ्यांना दाखवुन देतातच Uhoh

आली आहे लास आता आणि किंमत पण जास्त नाही तर मला वाटत आता लवकर जाईन तो करोन. आता जास्त लोक बरे पण होत आहेत पुणे मुंबई सोडले तर बाकी ठीक आहे आता जास्त भीती पण वाटत नाहीय करोनाची. जास्त जास्त हे वर्ष जाईन असेच

मला आता वाटायला लागलंय तो आपल्या सगळ्यांना पोहचवूनच जाईल.>> नाही हो. कितीतरी जणांनी पचवलय त्याला. काहींना तर माहित पण नसेल.

रशियाच्या लशीवर WHO ने बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत म्हणे.
https://www.livemint.com/news/world/as-russia-announces-world-s-first-covid-vaccine-who-says-discussing-prequalification-11597141424975.html

जाणकार लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
टीप : जाणकार म्हणजे ह्या क्षेत्रात तज्ञ डॉक्टर वगैरे मन्डळी. उगीच त्या सुबोध खरे सारखी स्वयंघोशीत तज्ञ नकोत. सन्दर्भासाठी ह्या फालतू धाग्यात तोडलेले तारे पहावेत
http://www.misalpav.com/node/46182

लस आली तरी मी तरी तिचा वापर करणार नाही
पूर्ण अभ्यास न करता आलेली हुं लस आता corona मुक्त करेल पण काही वर्षा नंतर कायम स्वरुपी शरीराचे नुकसान केले तर..
त्या पेक्षा काळजी घेवून corona pasun स्वतःचा बचाव करणे ह्या मध्येच शहाणपण आहे

खरच कंटाळा आला आता, कधी पूर्ववत होणारे सगळं ?
सहा महिने होत आले,कुठे जायचं नाही, शाळा नाही. प्रवास नाही.नेहमी सतर्क राहा. भाजी, दुध घेऊन आले तरी धास्ती, निष्काळजीपणा तर नसेल ना झाला माझ्याकडून?
कोरोनाच्या बातम्या बघणे तर कधीच बंद केलय.

Antivaxxers मध्ये खोडा घालतील असा अंदाज आहे.सुदैवाने भारताती ही प्रजाती कमी आहे.
भारताची कोव्हॅक्सीन लस फेज ३ मध्ये गेली आहे व सप्टेंबरमध्ये इमर्जन्सी युजला परवागणी देता येईल असे ICMRे संचालक म्हणत आहेत .

सप्टेंबरला संपेल म्हणे कोरोना असं कोणीतरी म्हणत होतं.. पण निदान गेले ३-४ दिवस तरी भारतात २-२.२५ लाख लोक इन्फेक्टेड झालेत आणि दिवसाला १००० च्या आसपास मरत आहेत Uhoh . सप्टेंबर पर्यंत किती मरतील काय माहीत.

Pages